पहिल्या महिन्याचे बाळ कसे असेल??read आईपण Guide to newborn baby first month

तुमच्या बाळाचा पहिला महिना कसा असेल? जाणून घ्या.तुम्हाला सगळे प्रश्न पडत असतील. बाळ कसं दिसेल? माझ्याकडे कसं पाहिल? त्याच्याशी काय खेळ खेळू? टीव्ही मध्ये दाखवतात आणि प्रत्यक्षात कसा असेल अनुभव??

जाणून घेऊयात.

पहिल्या महिन्यातील तुमचं बाळ छान गोंडस, नुकतच जगात आलेलं आणि हळूहळू आकार घेऊ पाहणारं मऊ नाजूक असेल. काही बाळ डोळे उघडणार नाहीत लगेच, हळू हळू उघडतील. काही लगेच डोळे उघडतील.अजून त्याचे facial features लगेच जाणवणार नाहीत. नाक थोडं बसलेल वैगरे वाटेल. डोळ्यावर थोडी सूज जाणवेल. केस कदाचित फार नसतील. काही मुलांना जावळ चांगलं असेल काहींना हळूहळू केस येतील. पण हळूहळू वेळ जाईल तसा त्याच्यातील फरक तुम्ही पाहाल.

Vision:ह्या दरम्यान बाळाची दृष्टी पूर्ण धरलेली नसते. थोडं blur स्वरूपात त्याला गोष्टी दिसतात. तरीदेखील डोळ्यापासून काही इंचावर धरलेली गोष्ट ते हळुहळु पाहू शकतं. त्याला रंग आवडतात. खास करुन काळा आणि लाल. तेव्हा उठवदार रंगांची खेळणी त्याला नक्कीच खूप आवडतील. वेगवेगळे shapes त्याला पाहायला आवडतात. त्याची उत्सुकता चाळवतातं.

Hearing :बाळाची ऐकण्याची क्षमता हळूहळू develope होते. तरीदेखील पोटात ऐकू येणारे आवाज तो ओळखू शकतो.काही मुलांची ऐकण्याची क्षमता इतरांच्या तुलनेत कमी अधिक प्रमाणात जास्त असू शकते.बाळासाठी तेव्हा खुळखुळे आणा ते त्याला खूप आवडतील. ऐकायला आणि रंग पाहायला देखील.

Smile :बाळाचे हास्य हे पहिल्या काही दिवसात gas reflex मुळे असेल. पण हळूहळू त्याचे पहिले हास्य उमगायला लागेल.

Reflexes :बाळाला जन्मतः काही reflexes म्हणजे प्रतीक्षिप्त क्रिया असतात. जसं कि rooting reflex. ह्यामुळे त्याला आईचे nipple शोधणे सोपं होतं. आणि दुसरा म्हणजे moro reflex. साधारण मोठा आवाज, movement किंवा पडल्याचे फीलिंग ह्यामुळे बाळ दचकल्यासारखे हातापायाच्या हालचाली करते. हे नॉर्मल आहे. Basically बाळ बाहेरच्या जगात adapt करायच्या प्रयत्न करत असते हा सर्व ह्याचाच एक भाग आहे.

Posture :साधारण ह्या दिवसात बाळ आपले हातपाय पोटाशी घेऊन राहील. आईच्या पोटातील सवय पहिल्या महिन्यात तुम्हाला नक्कीच दिसेल.

शरीरमान :पहिल्या दिवसात बाळाच्या अंगावर वळ्यास्वरूपात त्वचा असेल.हे अगदी नॉर्मल आहे.उलट आमच्यावेळेस विवानला अंघोळ घालणाऱ्या ज्या आजी यायच्या त्या म्हणत जेवढया बाळाच्या अंगावर वळ्या जास्त तेवढं बाळ जास्त अंग धरेल.पहिल्या दहा दिवसात बाळाचे वजन कमी होईल पण घाबरू नका असे होतेच मग परत त्याचे वजन वाढेल.

नखे:बाळाला नखे देखील असतील आणि ती भरभर वाढतात देखील. ती वेळच्या वेळी कापत जा.त्याच्या अंगावर लव असेल. पण ती काही दिवसात गळून जाईल.आपल्याकडे असं म्हणतात डाळीच्या पीठाने ती लव निघून जाते. माझ्या मुलाच्या वेळेस देखील मी वापरले होते. तुम्ही जरूर वापरून बघा.

नाळ :बाळाची नाळ असेल. ती साधारण चवथ्या किंवा सातव्या दिवशी गळेल. त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

ब्रेस्टफीडिंग :बाळास आणि आईस नवीनच असेल. ह्या संदर्भात काही टिप्स हव्या असल्यास माझ्या बाळंतपण आणि स्तनपान ह्या post मध्ये वाचू शकता.

बाळाची शु शी :पहिले काही दिवस बाळाला डार्क रंगाची शी होईल. आईच्या पोटात असतानाचे सर्व काही साफ होईल. मग थोडी पाणीदार फिकत पिवळ्या रंगाची शी होईल. साधारण फॉर्मुला किंवा आईच्या स्तनपानानुसार त्यात फरक जाणवेल. बाळाला शु होणे अतिशय गरजेचे आहे. दिवसात त्याची सात ते आठ diapers ओली होणे गरजेचे आहे. ह्यावर लक्ष ठेवा.

ही आणि अशीच माहिती घेऊन येत आहे तुमच्यासाठी. तेव्हा वाचायला विसरु नका आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत जा.

माझा मेल id आहे…aaipanblog2@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्कीच आवडेल.

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!