बाळंतपण:Post delivery mother and child care

काँग्रट्स काकू !!!तुम्ही आजी झाला आहात, तुमची लेक /सून बाळंतीण झालीये तुम्हाला गोंडस नातवंड झालय.किती आनंद होतो ऐकताना. मन अगदी भरून येतं. “नातवंड म्हणजे दुधावरची साय.”हे आपल्या आईचं वाक्य आठवतं आणि त्याची सार्थता पटते. आपल्या मुलांना नाही देता आलं ते सगळं काही ह्या जीवाला मिळावं असं भरभरून वाटतं. जेव्हा “ज्या चुका आपण आपल्या मुलांच्या बाबतीत अनवधानाने केल्या, त्या तुम्ही अजिबात करु नका “असं आपल्याला त्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं, तेव्हा तुमच्या मनाशीच तुम्ही खऱ्या अर्थानं आजी झाल्या आहात ह्याची खूणगाठ पटते आणि आनंद होतो. असं काही भावविश्व असतं आजीचं. आजीपण हे देखील आईपण आहे. Rather ती आईपणाची second inning आहे. मुलीला देखील आपल्या आईला आपण किती आयुष्यभर गृहीत धरत असतो ह्याची जाणीव होते. तिचं बाळंतपण येऊन ठेपतं आजीवर.जरा जवाबदारीचं वाटलं तरी हवहवसं वाटणारं प्रोजेक्ट तुमचं चालु होतं.

हे बाळंतपण तुम्ही नक्कीच छान पार पाडाल.. ह्यासाठी पूर्वतयारी ही महत्वाची. ती तुम्ही कशी कराल? अर्थातच बऱ्याच होऊ घातलेल्या आई-आज्यांना आमच्या अनुभवांची मदत व्हावी एवढाच हेतू.. थोडासा अनुभवांचा हातभार…

कोणकोणत्या गोष्टी डिसकस करणार आहोत?

  • बाळंतपणासाठी कपडयांची काय तयारी कधी व कशी कराल?
  • लेक /सुनेच्या प्रसूतीवेळची होऊ घातलेल्या आजीची काय तयारी असावी?
  • घरातली व्यवस्था कशी लावाल?
  • धार्मिक विधींची पूर्तता कशी कराल?
  • बाळंतिणीचं आहारपान कसं लावाल?
  • बाळंतिणीची शेक शेगडी
  • स्तनपानाचा आईचा पहिला अनुभव आणि आजीची तिला मदत
  • बाळाच्या गोपाळलीला आणि आई आज्यांच प्रेम

असं आणि बरंच काही… आई साठी आणि आजीसाठीपण..

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!