बाळाची खिमटी हि अतिशय पौष्टिक रेसिपी आहे . बाळाला वरचं द्यायला लागलं कि त्याला खिमटी देखील देतात .डाळ तांदुळाची खिमटी साजूक तूप घालून बाळाला दिली कि बाळाचं पोट चांगलं भरतं आणि बाळाच्या पोटाला पचायला देखील हलकी असते .त्यामुळे तुम्ही त्याला रात्री झोपताना दिली कि त्याला पोटाला जड जाणार नाही आणि पोट हि छान भरेल व बाळ शांत झोपी जाईल .
खिमटीचे फायदे :
- बाळासाठी खिमटी हि तांदूळ आणि मूगडाळीने बनते त्यामुळे अतिशय पौष्टिक
- पचायला हलकी त्यामुळे गॅस होत नाहीत .
- रात्री द्यायला उत्तम .किंवा पोट बिघडले असल्यास द्यायला चांगली .
Read More : बाळंतिणीसाठी अळिवाची खीर


बाळासाठी खिमटी
बाळाची खिमटी हि अतिशय पौष्टिक रेसिपी आहे . बाळाला वरचं द्यायला लागलं कि त्याला खिमटी देखील देतात .
Equipment
- १ कढई
- १ झारा
- १ वाटी मापाची
- २ भांडी डाळ तांदूळ धुवून ठेवायला
Ingredients
- 2 वाटी तांदूळ
- 1 वाटी मुगडाळ
- 1/2 चमचा जिरे
Instructions
- दोन वाटी तांदूळ, एक वाटी मुगडाळ घ्या.
- तीन पाण्याने धुवून घ्या.
- धुतलेले तांदूळ व डाळ स्वछ कपड्यावर पसरवून उन्हात वाळवा.
- वाळलेल्या तांदूळ व डाळीत अर्धा चमचा जिरं घालून कढईत छान भाजून घ्या.
- मिक्सर मध्ये गार झालं कि वाटून घ्या
- दोन चमचे तयार केलेली खिमटी ,गरजेनुसार पाणी ,चवीनुसार मीठ आणि तूप घालून बाळाला द्यायला खिमटी तयार