आपल्याकडे पहिल्यां सहा महिन्यात बाळाचे पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे.एक गंमत म्हणून बाळाचा जन्म झाला कि पाहिले सहा महीने त्याचा प्रत्येक वाढदिवस एक कौतुक म्हणून साजरा होतो. आता सध्या बाळाचा प्रत्येक महिन्याचा वाढदिवस साजरा करुन त्याचे प्रत्येक महिन्याचे फोटो काढण्याचा trend आहे. पूर्वी आज्यांची अशीच एक प्रथा चालायची. अजूनही बऱ्याच आज्या करत असतील. माझ्या आईनेदेखील बाळंतपणात केले होते. ते कसे करावे??


पहिला महिना :बाळ नुकतंच असतं आणि त्याचा पहिलाच वाढदिवस असतो. ह्या महिन्यात त्याची फार हालचाल नसते म्हणून गोडाचे कणिकेचे घावन करतात.
दुसरा महिना : बाळ दोन महिन्याचं झालं कि त्याचे गाल पुरीसारखे टम टम फुगतात म्हणून दुसऱ्या महिन्यात वाढदिवसाला आजी पुरी करते.
तिसरा महिना :तिसऱ्या महिन्यात बाळ कुशीवर वळतं म्हणून आजी गोड करंजी करते.
चौथा महिना :आता चौथ्या महिन्यात बाळ मुठी वळायला लागते म्हणून त्या वाढदिवसाला आजी लाडू करते.
पाचवा महिना :पाचव्या महिन्याचा वाढदिवस आपल्याकडे साजरा करत नाही.
सहावा महिना : सहाव्या वाढदिवसाला गोडाची पुरणपोळी करतात.
अर्थातच हे सगळं आईलाच खायला मिळतं. कारण बाळ अजून सहा महीन्यापर्यंत दुधू वरचं असतं.


साधारण प्रत्येक महिन्याच्या वाढदिवसाला आईच्या मांडीवर बाळाला औक्षण करतात. आणि औक्षण केल्यावर ‘हरळीसारखा तरुण हो आणि कापसासारखा मऊ हो’असं म्हणत बाळाच्या पाठीवरून दुर्वा आणि कापूस सोडतात.
ह्या आपल्याकडील काही पारंपरिक गंमती आहेत. आणि इतर फोटोसेशन सोबत हे ही करायला वेगळीच मजा आहे.
अशाच माहिती साठी वाचत राहा आईपण!!!!