तुम्ही प्रेग्नन्ट आहात आणि तुम्हाला bed rest सांगितलाय. आजकाल bedrest during pregnancy कॉमन आहे .काळजी करण्यासारखे काहीच नाहीये. आजकाल बऱ्याच प्रेग्नन्ट बायकांना बेड रेस्ट सांगितला जातो. पण नुसतं दिवस दिवस बेड वर बसून राहणं किंवा पडून राहणं जमत नाही. वेळही जाता जात नाही तेव्हा काय कराल जेणेकरून तुमचा वेळ चांगला जाईल आणि आराम ही मिळेल.
1. Reading
पडून वाचणं अतिशय सोपं आहे. ह्यात कोणतीही activity करायला लागत नाही आणि वेळही आरामात जातो. सध्या kindle वर खूप छान पुस्तकं available आहेत. किंवा ऑडिओ बुक्स सुद्धा ऑनलाईन मिळू शकतात. प्रेग्नन्सी मध्ये वाचन हे खासकरून सांगितलंच जातं. पूर्वीच्या बायकादेखील ‘हरिविजय’ व ह्यांसारखी अनेक पुस्तकं वाचत. तेव्हा तुम्ही देखील try करुन पाहा. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर काही reviews मी already share केले आहेत ते खालच्या पोस्ट मध्ये पाहू शकता.
Read More : प्रेग्नन्सी मध्ये कोणती पुस्तके वाचाल ??
2.Movies
एरवी आपण खूप ठरवतो पण ठरवूनही आपल्याला फारसा वेळ मिळत नाही. आणि अपल्या आवडीचे movies बघणं राहूनच जातं. तेव्हा आता तुम्हाला वेळ आहे. एखादी छान movies ची लिस्ट काढून. दिवसातून एखादा movie बघायला हरकत नाही. फक्त फार मनावर ताण येतील असे किंवा मारझोड असलेले अथवा horror बघणं टाळावे. एखादा चांगली series देखील पाहू शकता.
फक्त डोळ्यांवर ताण येणार नाही ह्याची काळजी जरूर घ्या.
3. Knitting प्रोजेक्ट
हो बसल्या बसल्या फार काही हालचाल न करता एखादा छंद जोपासू शकता.त्यात भरतकम सर्वात छान option आहे. तुम्ही तुमच्या होणाऱ्या बाळासाठी एखादं छान दुपटं बनवू शकता. एखाद्या blouse piece वर सिम्पल design भरलं तरी त्याचं पुढे शिवून छान दुपटे होऊ शकतं. ज्यांनी लोकरीचे जमते ते पण करू शकता. जरा वेळ जाईल आणि आराम सुद्धा मिळेल.
4.blogging/लेखन
जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर थोडंफार लिखाण करू शकता. कविता, गोष्टी लिहू शकता.


5.music/संगीत
तुमच्या आवडीचं संगीत ऐकण्यात देखील तुमचा चांगला वेळ जाईल. रिलॅक्स करणारी एखादि playlist तुम्हाला आनंद देऊन जाईल.
6. Online surfing
तुमच्यासाठी व होणाऱ्या बाळासाठीच्या गोष्टी, नर्सरी कशी सजवावी, maternity photoshoots ह्या सगळ्यावरील माहिती, प्रेग्नन्सी ब्लॉग्स ह्या गोष्टी ऑनलाईन वाचू शकता.
7. Walk
दिवसातून ठराविक वेळ अगदी काही मिनिटे अर्थातच काही त्रास होतं नसल्यास घरातल्या घरात एखादा walk घेऊ शकता. ज्याने गॅसेस होणार नाही. व तुम्हाला फ्रेश वाटेल.
8. पत्ते /व्यापार /बुद्धिबळ
कोणताही एखाद्या बैठया खेळाचा डाव तुम्ही बसल्यासल्या खेळू शकता.
bedrest during pregnancy काय काळजी घ्याल :मी बेडरेस्ट मधून गेल्यामुळे मला माहित्ये की गॅसचा खूप त्रास होतो. सतत एकाच ठिकाणी जर बसून राहिलं की तसं होणं साहजिकच आहे.तेव्हा भरपूर पाणी प्या आणि काही मिनिटांचा घरातल्या घरात walk घ्यायला हरकत नाही.एक routine ठेवा आणि दिवसाची झोप कमी ठेवा म्हणजे रात्री झोप लागते.
तुमचा बेडरेस्ट पण एन्जॉय करा. पुरेसा विश्राम घ्या. डॉक्टरांचा सल्ला ऐका आणि कोणत्याही प्रकारची दगदग टाळा.
अशाच माहितीसाठी वाचत राहा आईपण!!
References : https://www.webmd.com/baby/guide/bed-rest-during-pregnancy