चिऊताई दार उघड गोष्ट

चिऊताई चिऊताई दार उघड

छोटं बाळं आलं म्हणजे त्याची गायी गायी आली. काही बाळं अंगाई गीतांवर पटकन झोपी जातात. काही बाळं जशी मोठी होऊ लागतात तशी अजिबात दाद देत नाहीत. साधारण बाळं थोडं मोठं झालं की त्याच्या bedtime routine चा भाग म्हणूजे गोष्ट सांगणे. आणि सगळ्या बाळांना सांगितली जाणारी पहिली गोष्ट म्हणजे ‘चिऊताई चिऊताई दार उघड गोष्ट”!!!. माझ्या बाळाला ही गोष्ट ऐकायला आवडायची. म्हणजे त्यावर तो झोपी जायचा. पण सुरुवातीला सांगताना ह्याचा शेवट नक्की काय आहे हे नीट आठवत नव्हतं. काहीजण म्हणतात ह्याचा नक्की असा शेवट नाही कारण तो येईपर्यंत बाळं झोपी जातं. तरीदेखील आईला विवानला सांगताना ऐकून थोडासा मनाने मी तयार केलेला शेवट घेऊन गोष्ट लिहीत आहे.

एक असते चिऊ आणि एक असतो काऊ. काऊचं घर असतं शेणाचं चिऊचं घर असतं मेणाचं. आणि एकदा काय होतं खूप मोठा पाऊस पडतो आणि त्यात काऊचं घर जातं वाहून आणि काऊदादा येतो चिऊताई कडे आणि म्हणतो ” चिऊताई चिऊताई दार उघड”

चिऊताई म्हणते “थांब माझ्या बाळाला आंघोळीचं पाणी काढते “

काऊदादा म्हणतो “चिऊताई चिऊताई दार उघड “

चिऊताई म्हणते “थांब माझ्या बाळाला तेल लावते “

काऊदादा म्हणतो “चिऊताई चिऊताई दार उघड “

चिऊताई म्हणते “थांब माझ्या बाळाला तोतो घालते “

काऊदादा म्हणतो “चिऊताई चिऊताई दार उघड “

चिऊताई म्हणते “थांब माझ्या बाळाचं अंग पुसते “

काऊदादा म्हणतो “चिऊताई चिऊताई दार उघड “

चिऊताई म्हणते “थांब माझ्या बाळाला पावडर टीटी करते “

काऊदादा म्हणतो “चिऊताई चिऊताई दार उघड “

चिऊताई म्हणते “थांब माझ्या बाळाला खाऊ करते “

काऊदादा म्हणतो “चिऊताई चिऊताई दार उघड “

चिऊताई म्हणते “थांब माझ्या बाळाला औषध घालते”

काऊदादा म्हणतो “चिऊताई चिऊताई दार उघड “

चिऊताई म्हणते “थांब माझ्या गोष्ट सांगते “

काऊदादा म्हणतो “चिऊताई चिऊताई दार उघड “

चिऊताई म्हणते “थांब माझ्या बाळाला झोपवते “

काऊदादा म्हणतो “चिऊताई चिऊताई दार उघड “

असं करत करत चिऊताई काही दार उघडत नाही आणि जेव्हा उघडते तेव्हा पाऊस असतो थांबलेला, काऊदादा गोठलेला. आणि मग गंमत होते अशी कि चिऊताई म्हणते तू चुलीपाशी बस, मी बाहेर जाते आणि पिलासाठी चारापाणी घेऊन येते.

Read More : बाळाची झोप How to put baby to sleep??

इथे काय गंम्मत होते, काऊदादा बसतो चुलीपाशी, पण त्याला लागलेली असते भूक. आणि मग त्याला येतो खिरीचा खमंग वास. विचार करतो व एक घास खाऊन पाहतो. मनात खीर खूप आवडते मग आणखी एक घास घेतो, आणखी एक घास घेतो, आणखी एक घास खाऊन पाहतो, असं करत करत सगळी खीर संपते.

इकडं चिऊताई येते. आता काऊदादाला वाटते भीती. झोपेचं सोंग घेतो. चिऊताई बघते तर खीर असते संपलेली. ती बघते तर पिल्लं निजलेली. काऊदादाला विचारते तर तो म्हणतो, “मी नाही खाल्ली, मी तर जोजो केलेली “.

पण त्याच्या तोंडाला खीर दिसते आणि चिऊताई लागते पळायला काऊ लागतो धावायला आणि गंम्मत होते अशी कि काऊदादाची शेपटी पडते निखऱ्यावर म्हणून तो ओरडतो “चिऊताईची खीर खाल्ली, शेपूट भाजली हाय हाय “

अशी आहे गंम्मत काऊ आणि चिऊताईची !!!!! आवडली का चिऊताई चिऊताई दार उघड गोष्ट ??

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!