अळीवाची खीर : बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय Easy to make Breastfeeding Recipe

आपल्याकडे बाळंतिणीला अंगावर दूध येण्यासाठी किंवा दूध वाढविण्यासाठी एक गोष्ट आपण कायम करतो ते म्हणजे तिला अळीव खाऊ घालणं .अळीव हे स्तनपानासाठी पौष्टिक समजले जातात .ते कधी लाडू मधून तर कधी खिरी मधून बाळंतिणीला खाऊ घातले जातात .त्यांच्या सेवनामुळे आईच्या अंगावरचे दूध वाढण्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो .

माझं मुलं सहा महिन्याचं झाल्यावर चहाच्या वेळात किंवा मधल्या वेळात मी देखील हि खीर स्वतः बनवून घेत असे .चहा बनवण्या इतकी सोपी असल्याने ह्याचा मला फायदाच झाला .अळीव स्तनपानासाठी नक्कीच खूप फायदेशीर आहेत व शरीराची झीज भरून काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

अधिक माहितीसाठी तुम्ही हे article पाहू शकता.

खीर हा प्रकार करायला सोपा आणि कुणीही सहज करू शकतं.बरेचदा परदेशात किंवा परगावी दूर राहणाऱ्या व्यक्तींना बाळंतपणात अपेक्षित मदत मिळू नाही शकत तेव्हा त्यांच्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे आणि तुमचे spouse देखील सहज करू शकतात हि recipe!!!!!!!!

स्तनपानासाठी नक्कीच वाचा मी लिहिलेला संपूर्ण ब्रेअस्टफीडिंग गाईड नव्याने झालेल्या आयांसाठी

अंगावर दूध येण्यासाठी उपाय

हळिवाची खीर

बाळंतपणात आईच्या अंगावर दूध येण्यासाठीचा सोपा आणि उपयुक्त उपाय म्हणजे बाळंपणातील हळिवाची खीर .आईच्या आहारात तिचा समावेश असणं खूप गरजेचे आहे .करायला सोपी अगदी घरात करणारं कुणी नसेल तर नवरेदेखील बनवू शकतात.किंवा नंतेरदेखील तुम्ही तुमची बनवून घेऊ शकतात.
Prep Time 5 mins
Cook Time 5 mins
Total Time 10 mins
Cuisine Indian
Servings 1 cup

Equipment

 • उकळायला भांडे
 • हलवायला चमचा
 • गॅस

Ingredients
  

 • 1 मोठा चमचा हळीव
 • 1 cup दूध
 • 1 चमचा तूप
 • 1 चमचा साखर
 • 1/2 cup पाणी

Instructions
 

 • थोडंसं तूप गरम करून घ्या .
 • त्यात हळीव भाजून घ्या .
 • त्यात पाणी घाला .
 • पाणी उकळून हळीव भिजू दे .
 • दूध घाला .
 • दूध उकळून वर येऊ दे
  अंगावर दूध येण्यासाठी उपाय
 • खाली उतरून साखर घाला .
Keyword easy to make, आईच्या अंगावर दूध येण्यासाठीचा सोपा उपाय, बाळंतपण, बाळंपणातील खीर

Leave a Comment

Your email address will not be published.

Recipe Rating
error: Content is protected !!