Father’s Day marathi 2022 Special :एक जगवेगळा बाप जो खुप काही शिकवून जातो ‘Atticus Finch’

Review केलेले पुस्तकं Amazon वर उपलब्ध :

Paperback: https://amzn.to/2TUizLQ

Kindle: https://amzn.to/3j1StAY


‘Father’s Day marathi 2022 ‘बद्दल लिहावं म्हणून बसले आणि अचानक पूर्वी वाचलेल्या एका कांदाबरीची आठवण झाली. Harper lee ह्या लेखिकेने लिहिलेली ‘To Kill a Mockingbird ‘ही कांदबरी एक timeless Classic आहे. मला स्वतःला Classic वाचायला आवडत असल्याने हे पुस्तकं माझ्या वाचनात आलं आणि त्यातला Atticus Finch हा खरंच मनावर छाप सोडून गेला.

Atticus Finch हा Maycomb county, albama ह्या fictional छोटया गावातील वकील आणि widower आहे. तो आपल्या दहा वर्षीय जेमी ह्या मुलाचा आणि scout ह्या सहा वर्षीय मुलीचा बाप आहे. त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन, शांत छबी तरीही पुरोगामी असलेले विचार हे सारंच भाव खाऊन जातं.1930 मधील हा south अमेरिकन माणूस आपल्या मुलांना social conventions ना बळी न पडता integrity नी वागण्याचे संस्कार करतो. एका प्रसंगात मुलाच्या आत्यालादेखील आश्चर्य वाटतं कि Atticus ने मुलांना आपल्या दक्षिण अमेरिकन कौटुंबिक वारस्याची काहीच जाणीव किंवा वळणं लावलेली नाहीत. उलटअर्थी atticus मुलांना हे शिकवतो कि माणसांना त्यांच्या गुणांवरून तोललं पाहिजे ना कि त्यांच्या पूर्वज्यांच्या कर्तृत्वावरून. स्वतःच्या inborn talent विषयी त्यांचं साधेपण मुलांना दिखावा करणं किती चुकीचं आहे हे शिकवून जातं. Atticus हा सतत आपल्या मुलांना समोरच्याच्या shoes मध्ये स्वतःला घालून पाहा, दोन्ही बाजूच्या कहाण्या ऐकून घ्या आणि कितीही कठीण प्रसंग उभा राहिला तरी शांततेने त्याला सामोरे जा हे धडे देतो.

Father's Day marathi 2022

कथेला कलाटणी तेव्हा मिळते जेव्हा Atticus Finch हा Tom Robbinson ह्या कृष्णवर्णीय तरुणाचा संपूर्ण श्वेतवर्णीय jury समोर वकील म्हणून बचाव करतो ज्याच्यावर एका श्वेतमुलीवर बलात्कार करण्याचे खोटे आरोप दाखल असतात.ह्या केसमुळे Atticus गावातील बऱ्याच श्वेतवर्णीय लोकांचा रोष घेतो पण आपल्या सहा वर्षाच्या मुलीच्या डोळ्यात आदर आणि कौतुक कमावतो. कथेची निवेदक ही मुलगीच आहे. Atticus Finch हा एक स्वतः आदर्श पिता आहे जो आपल्या वागण्यातून मुलांवर नैतिकतेचे संस्कार करतो.पुस्तकात Atticus आणि मुलांचे संवाद, मुलांना अनाकलनीय असणाऱ्या गोष्टींवर Atticus ने मांडलेली खरी मतं, काही प्रसंग आणि त्यांचं आणि मुलांमधील प्रेम हे सारंच वाचण्याजोग आहे.

50 वर्षांपेक्षा जास्त Atticus Finch हे अमेरिकन साहित्यातील आवडतं आणि प्रसिद्ध character आहे. एक Principled White Man जो वर्णभेदी अन्यायाबद्दल वाचा फोडतो आणि एक कोमल पिता जो दहशतीऐवजी आपल्या वागण्यातुन मुलांना घडवतो.आज Father’s Day marathi 2022 बद्दल ‘आईपण ‘चा अशा पित्यास सलाम!!!!

Harper lee ह्यांचं ‘To Kill a Mockingbird’ ही कांदबरी पालकत्वाचे उत्तम मॅन्युअल आहे आणि पालकांनी वाचलीच पाहिजे असं वाटतं

Read More : अशा माता ज्यांनी जग बदललं

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

1 thought on “Father’s Day marathi 2022 Special :एक जगवेगळा बाप जो खुप काही शिकवून जातो ‘Atticus Finch’”

  1. 3 stars
    Wow, wonderful weblog format! How long have you ever been running a blog for?
    you make running a blog glance easy. The overall glance of your website is excellent, as
    smartly as the content material!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!