चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?Marathi Guide to Newborn Baby fourth Month

आता तुमचं बाळ चौथ्या महिन्यात आलं असेल जाणून घ्या चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?? साधारण ह्या दिवसात त्याचं वजन त्याच्या जन्माच्या दुप्पट असेल. त्याचं वागणंदेखील तुम्हाला predictable वाटायला लागलं असेल. त्याच्या naps, feeding, bedtime हे सारं तुम्हाला सवयीचं झालं असेल. आता त्याची रात्रीची झोप प्रदीर्घ असेल. पण अजूनही प्यायला किंवा दचकून अधूनमधून ते उठत असेल. Congrats!!!आता तुम्ही बऱ्यापैकी ह्या आईपणाला used to झाला असाल.

चौथ्या महिन्यातील बाळाचा आहार काय असेल?:अजूनही बाळ अंगावर असेल. आणि त्याच्या वाढीसाठी तेच योग्य आहे. डॉक्टरांना consult केल्याशिवाय त्याला वरचे पाणी देखील अजून पाजू नका.

चौथ्या महिन्याचे बाळ व वाढीचे milestones:

 • बाळ कुशीवरून पालथे होयला लागेल. हा एक महत्वाचा टप्पा आहे.
 • सपोर्ट देऊन बसायला लागेल.
 • हातात खुळखुळा धरायला पाहील.
 • डोकं आणि छाती पालथे असताना उचलून धरायला पाहील.
 • एका हातानी वस्तूचा वेध घ्यायला पाहील.
 • दृष्टी आणि हालचाल ह्यात समतोल साधायला शिकेल.
 • तोंडाजवळ हात न्यायला शिकेल.
 • दृष्टी फिरणाऱ्या वस्तू बरोबर चांगली वळवायला शिकेल.
 • आणखी पॅटर्न, shapes, colors डोळ्यात साठवायला शिकेल.
 • दूरवरची माणसं ओळखू लागेल.
 • तुमच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून थोडी नक्कल करायला शिकेल, जसं कि तुम्हाला हसताना पाहून हसेल.

ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला खूप कौतुक वाटेल. आणि ह्यातील काही गोष्टी जमत नसतील तर काळजी करू नका.प्रत्येकाची वाढ थोडयाफार फरकाने वेगळी असते. शंका वाटल्यास तुम्ही डॉक्टरांना नक्की विचारू शकता. ते तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठीच आहेत.

Read More : बाळाचे गॅस आणि घरगुती उपाय Simple reliefs for baby gases and colic

aaipan.com: चौथ्या महिन्याचे बाळ

आता आईला वाटत असेल कि काय बरं खेळावं मी कि चौथ्या महिन्याचे असणाऱ्या बाळासोबत??

 • Playmat:ह्या वयात बाळाला playmat वर ठेवून खेळवणे योग्य ठरेल. ते पालथे पडू पाहील. टांगती खेळणी पाहील आणि ती धरायला सरसावेल. आणि रंग व आकार, स्पर्श ह्याचं ज्ञान मिळवेल.
 • बुआ कु कुक /peek-a-boo:ह्या वयातल्या ते मोठया बाळापर्यंत सगळ्यांचा आवडता खेळ. तुमच्या तोंडावर हात ठेवा आणि कुक करा. त्याचं निखळ हास्य अनुभवाल. तुम्ही गायब होता आणि परत येता. ह्याचा त्याला आनंद आणि कुतूहल वाटतं.
 • Colorful board books :ह्यात वेगवेगळे रंग आणि आकार असतात. ते बघत, निरीक्षण करत बाळाचा चांगला वेळ जाईल.

काळजी :बाळाची diapers किती ओली असतात? त्याला शी रोज किंवा तीन चार दिवसातून होते का? आणि दात येऊ पाहत असतील तर थोडा त्रास होतो. ह्या सगळ्यावर आईचे लक्ष असणे गरजेचे आहे.

अशाच माहितीसाठी वाचत राहा आईपण!!!

Reference site : https://www.webmd.com/parenting/baby/baby-development-4-month-old

2 thoughts on “चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?Marathi Guide to Newborn Baby fourth Month”

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!