आपल्या संस्कृतीत साधारणपणे सगळ्याच गोष्टींना वळण पडावं ह्या दृष्टीने काही प्रथा आहेत.तशाच त्या बाळंतपणात सुद्धा आहेत .काही gratitude दर्शवण्यासाठी असतील असच मला वाटतं. तरीदेखील हा ज्याच्या त्याच्या आस्थेचा भाग असून केवळ माहिती म्हणून संदर्भ देत आहे .
काही गोष्टी ह्या गमतीशीर देखील आहेत .तर पाहुयात त्या नक्की कोणत्या ते ?
सोयर : बाळ जन्मल्यावर सोयर पाळण्याची रीत आहे.
पाळण्यात नारळ पेढे : बाळ बाळंतिणीला हॉस्पिटल मधून घरी आणण्यासाठी निघताना पाळण्यात नारळ व पेढे किंवा बर्फी ठेवण्याची पद्धत असते .
बाळ बाळंतिणीचे औक्षण : बाळ बाळंतीण घरात येताना त्यांच्यावरून तांदूळ पाणी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून टाकण्याची रीत आहे .मग त्यांचे औक्षण करून त्यांना घरात घ्यावे .
पाचवीची पूजा ,सहावीची पूजा : आपल्याकडे बाळासाठी पाचवीची पूजा करण्याची प्रथा आहे .बाळाच्या निरोगी ,सुखी आणि दीर्घायुष्यासाठी हि पूजा गुरुजींकडून केली जाते .असं म्हणतात सटवाई देवी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन बाळाचे भविष्य येऊन लिहून जाते म्हणून एक कोरा कागद आणि पेन ठेवतात .बाळाच्या गळ्यात घालावी जाणारी जिवती देखील पुजून ठेवतात .सहावीला रामरक्षा पाठ ठेवण्यात येतो .
कान टोचणे : आपल्याकडे हिंदू धर्मानुसार बाराव्या दिवशी बाळाचे मामाच्या मांडीवर कान टोचतात .


बाराव्या दिवशी बारसे : साधारण बाराव्या दिवशी बाळाला पाळण्यात घालून त्यांचं नामकरण केलं जातं.
चाळीसाव्या दिवशी देव दर्शन :साधारण बाळ होऊन चाळीस दिवस झाले कि बाळास व बाळंतिणीस देव दर्शनासाठी नेण्यात येते .साधारण चाळीस दिवसांनी बाळंतिणीचे सोयर संपले असं मानतात .
बाळाची दृष्ट :आपल्याकडे साधारण बाळ वर्षाचे होईपर्यंत फुलांनी संध्याकाळी बाळाची दृष्ट काढली जाते .
उष्टावळ / अन्नप्राशन :
आपल्याकडे बाळास वरचे अन्न देणे चालू करण्यासाठी उष्टावळ किंवा अन्नप्राशन करण्याची पद्धत आहे.साधारण पाचव्या महिन्यानंतर किंवा बाळास पहिली कणी फुटेल तेव्हा हा कार्यक्रम करतात .मामाच्या मांडीवर उष्टावळ करतात .चांदीच्या पात्रातील खीर सोन्याच्या वळ घेऊन बाळास चाटवतात .लक्षात ठेवा सगळं काही स्वछ असणं गरजेचं आहे .
जावळ : मामाच्या मांडीवर होणार मुलं मुलगा असेल तर त्याचं जावळ करण्याची रीत आहे .काही ठिकाणी वर्ष झाल्यानंतर किंवा काही ठिकाणी वर्षाच्या आत जावळ काढले जाते .
ह्यातील बऱ्याच गोष्टी प्रत्येकाच्या कुळधर्मानुसार थोडयाफार बदलू शकतात .तरीदेखील एक साधारण माहिती तुमच्यासमोर मांडत आहे .तुमच्या आणखी कोणत्या वेगळ्या प्रथा असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका .
Very nice information
Glad u liked it❤️