बाळाला वरचं जेवण द्यायला कशी सुरुवात कराल??? | How to introduce solid food to little baby?? in Marathi

बाळाला वरचं जेवण द्यायला कशी सुरुवात कराल???How to Introduce food to little baby??

ह्या बाबत प्रत्येक मॉम च्या मनात प्रश्न असतात .खासकरून बाळाला वरचं अन्न काय देऊ ??कसं देऊ ??जास्तीत जास्त पौष्टिक करून कसं देता येईल अन्न ??आणि ते द्यायची योग्य वेळ कोणती ??बऱ्याच मॉम्स मला फेसबुक ,इंस्टाग्राम ह्यावर ह्या बद्दल बरेच प्रश्न विचारतात .एक्दम देऊ का ??किंवा माझं मुल अमुक तमुक खात नाही .किंवा अंगावरच पीत राहतं.वरचा आहार नीट घेतच नाही .दोनदाच देते आणि किती वेळा देऊ ??एक्दम पाच वेळा देऊ का ??? त्याला पचेल कि नाही ??ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन मी हे आर्टिकल लिहीत आहे ,जेणेकरून माझा अनुभव कसा होता आणि मी काय strategy वापरली ??ज्याचा बऱ्याच मॉम्स ना नक्कीच उपयोग होईल .तेव्हा हे पोस्ट संपूर्ण नक्की वाचा .आणि तुमची प्रतिक्रिया मला social मीडिया किंवा कंमेंट्स मध्ये कळवा.

आता पर्यंत साधारण पाच ते सहा महिन्याचे होईपर्यंत बाळ अंगावर असते किंवा फॉर्मुला आणि आईचं दुध इतकाच आहार घेत असते. त्याला पाणी किंवा वरचं कोणतंही अन्न आपण देत नाही. पण बाळ हळूहळू मोठं झालं की त्याची आहाराची गरज थोडी थोडी वाढू लागते. त्यामुळे त्याला आपल्याला आईच्या दुधा व्यतिरिक्त इतर आहार म्हणजे बाळाला वरचं जेवण introduce करायला लागतो. मग ह्यासाठी काय करावयाचे ते आपण पाहणार आहोत.

This article helps to understand that how to introduce solid food to baby?? in Marathi Language. It is the very common question encountered by so many moms today. I am sure there are lot of posts available online .But none of it provide practical solution to us. As Marathi Maharashtrian moms ,We know it does not relate to our culture and food recipes .I have experienced similar problem. I came up with solution and simple strategy after taking advises from my elderly moms ( as mom and mother-in-law),aunties and very important person that is -my babies doctor and my experiences. So I hope lot of you find it useful .Do take a look at it “balala varche anna kase dyal??” or ” balala solid food kase dyayla suruvat karal??or “balala varcha ahar kasa dyal?”. Do read and do comment.

सुरुवात पाण्यापासून करा.

म्हणजे बाळाला वरचं जेवण द्यायला सुरुवात करताना सुरुवात पाण्यापासून करा .लहान बाळाला पाणी कधी पाजावे??हा प्रश्न बहुधा सगळ्यांनाच असतो. जन्मापासून केवळ दुधावर असणाऱ्या बाळाला पाणी कधी पासून द्यावं??? साधारण बाळ पाच किंवा सहा महिने पूर्ण झालें की बाळाला पाणी देण्यास सांगतात. तोपर्यंत त्याला पाणी पाजायचे नाही असा सल्ला डॉक्टर देतात आणि तो योग्यच आहे. माझ्या बाळाच्या डॉक्टरांनी बाळ पाच महीने पूर्ण झाल्यावर बाळाला सर्वात आधी पाणी द्यायला सांगितलं. रोज पहिले दहा दिवस नुसतं उकळून थंड केलेलं पाणी चमचा चमचा बाळाला द्यायला सुरुवात केली.अर्थातच बाळ अंगावर असे पर्यंत त्याची पाण्याची गरज दुधातूनच पूर्ण होत असते. त्यामुळे आपल्यासारखं hydration साठी त्याला वेगळं पाणी द्यायला लागत नाही. तरीदेखील आपल्याला त्याला वरचा आहार म्हणजे बाळाला वरचं जेवण द्यायची सुरुवात करताना पाण्याची सवय करणं गरजेचे आहे.थोडं थोडं दिवसातून एकदातरी एक दोन चमचे देत पाणी द्यायला सुरुवात करा. बाळ सुरुवातीला पिणार नाही. ह्या वयात त्याला दुधा इतकं काहीच दुसरं आवडत नाही त्यामुळे अर्थात त्याला लगेच आवडणार नाही. तरीदेखील पहिले दहा दिवस पाणी देऊन पाहा. जर आवडलं नाही तर बळजबरी करू नका. काही दिवसांनी परत प्रयत्न करून पाहा.

Read More : बाळाला सुवर्णसिद्धजल कसे द्याल ??

Note: बाळाचे प्यायचे पाणी किमान दहा मिनिटे उकळलेले असू द्यावे.

बाळाला वरचं जेवण म्हणजे वरच्या अन्नाची सुरुवात

ह्याला इंग्लिश मध्ये बाळाला सॉलिड फूड देणे किंवा त्याची सवय करणे असं म्हणतात .ह्याचा एक उपयोग असादेखील होतो कीं बाळाला अंगावरून सोडवायची वेळ येते तेव्हा हळूहळू बाळाला अतिरिक्त पोषक आहाराची पूर्ण सवय झालेली असते .तेव्हा त्याच्या पुढे जाऊन दुधाच्या वेळा कमी करताना त्याचा उपयोग होणार आहे .आणि पुढे तुम्हाला सोपं होणार आहे .परत वरच्या आहाराने बाळाला देखील उत्तम पोषण मिळणार आहे ज्याचा त्याच्या वाढीसाठी उपयोग होणार आहे .

तर हि सुरुवात कशी करतात ते पाहू

 • पाणी introduce झाल्यानंतर पुढचे दहा दिवस भातावरील पाणी. म्हणजे भात शिजताना त्याला वर जे पाणी येते ते बाळाला दहा दिवस देऊन पाहावे.
 • त्यानंतर पुढील दहा दिवस मुगाच्या डाळीचे पाणी म्हणजे डाळ शिजवून जे वर येते ते पाणी देऊन पाहावे.
 • मग पुढील दहा दिवस रवा भाजून त्याची अतिशय पातळ पाण्यातील खीर देऊन पाहावी.
 • त्यानंतर तांदूळ व मूग डाळ भाजून ती मिक्सरला वाटून जी खिमटी करतात ती पाणसर करून तूप घालून बाळाला द्यावी.
 • त्यानंतर हळूहळू पाण्यातील नाचणी सत्व बाळाला द्यावे.

असं दहा दहा दिवस करीत सगळे पदार्थ बाळाला खाऊ घालावेत. म्हणजे बाळाला वरचं जेवण आवडेल. एखादा आवडला नाही तर बळजबरी करू नये.

आता बाळाला वरचे पदार्थ खाऊ घालताना म्हणजे बाळाला वरचं जेवण देताना काय गोष्टी पाळाल??

 • सुरुवातीला बाळाच्या खिरी मध्ये द्रवांश जास्त असेल.
 • बाळ जोपर्यंत बसलं राहत नाही तोपर्यंत बाळाच्या खिरींमध्ये द्रवांश जास्त असेल.
 • जसं जसं बाळ मोठं होऊ लागेल आणि वर्षाकडे येऊ लागेल तसं तसं हळू हळू त्याचा द्रवांश कमी करत खिरी दाट करत जायच्या.
 • साधारण 6 महिन्याचे बाळ बसून खातं नाही. साधारण पहिले दोन तीन महीने त्याला जुन्या वळणानुसार दोन पायांवर घेऊन खाऊ घालायचं.
 • मग बसायला लागलं की तुम्ही feeding chair वापरू शकता. खाली जमिनीवर ठेवण्याची feeding chair पण असते आम्ही तींच वापरायचो जेणेकरून बसून खाऊ घालता येईल.
 • सुरुवातीला दिवसातून एकदा, मग दोनदा असं करत करत त्याच्या वेळा वाढवत जायच्या. शक्यतो रात्री उशिरा द्यायचं नाही. साधारण 7 ते 8 च्या दरम्यान द्यायचं.
 • कोणताही नवीन पदार्थ introduce करताना पहिले किमान 3 दिवस सलग द्यायचा म्हणजे त्याची पचनाची सवय होते.
 • कोणताही नवीन पदार्थ दिवसा द्यायचा, संध्याकाळी नाही. बाळाला रात्री चलन वलन नसल्याने अवघड जाऊ शकतो.
 • थोडं बाळ मोठं झालं की तुम्ही त्याला अधून मधून फळांची प्युरि, भाज्यांचं सूप असं अन्न देऊ शकता.
 • शक्यतो वाटी चमचा वापरा.
 • आणि बाळाची भांडी वेगळी ठेवून आईने स्वतः धुवत जा.
 • बाळाला भरवताना आधी चव घेऊन भरवत जा ,खूप गरम खूप गार असं देऊ नका .शक्यतो ताजे बनवलेले असू दे .

सांगावेसे वाटले असे काही

खिरी मध्ये द्रवांश जास्त ठेवल्याने बाळाला गिळायला सोपं जाईल ,लक्षात ठेवा जोपर्यंत ते स्वतःच स्वतः नीट बसत नाही तोपर्यंत त्याला हार्ड सॉलिड फूड देणं योग्य ठरणार नाही .काही लोकांना पायावर ठेवून पाजणे अवघड वाटेल ते त्याला एक मांडी वर करून किंवा फीडिंग चेअर वापरून भरवू शकतात .पण लक्षात ठेवा आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या सगळ्याच पद्धती चुकीच्या नसतात .किंवा त्या जास्त एफ्फेक्टिव्ह देखील ठरू शकतात .तेव्हा माईंड ओपन ठेवा .आणि तुमचा comfort बघा .मी स्वतः विवानला तसं भरवलेलं आहे आणि आता तो केवळ दोन वर्षाचा आहे .

बाळाला वरचं अन्न देताना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ??

ते मी माझ्या इन्स्टा पोस्ट मध्ये एक छान गाईड शेअर केलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता .

दर काही दिवसांनी मी माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक page वर अशा useful पोस्ट लिहिते तेव्हा त्या वाचायला नक्की विसरू नका आणि जरूर follow करा .

काही महत्वाचे :

माझ्या बाळाच्या डॉक्टरांनी दूध नाही द्यायचं असं सांगतिल्याने आम्ही खिरी पाण्यात शिजवायचो अगदी नाचणी सत्त्व देखील .
आणि शक्यतो सुरुवातीला मीठ किंवा साखर देखील टाळा .

तर मग ऑल दि बेस्ट तुम्हाला!!!हळूहळू तुमचं मुलं वरचं खाऊ लागेल.आणखी अशा बऱ्याच गोष्टींसाठी वाचत राहा आईपण!!!

Reference : https://indianexpress.com/article/lifestyle/health/best-weaning-food-off-breast-milk-baby-nutrition-7401249/

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!