बाळाला अंगावरून कसं सोडवाल?How to successfully stop breastfeeding??

बाळाला अंगावरून सोडवणं म्हणजे बऱ्याच moms ना हे एक खूप मोठं struggle वाटतं. इतके दिवसाची बाळाची सवय असते आणि त्यांना अंगावर आईचं दूध पिणं हा एक मोठा comfort वाटतो. त्यातून त्यांना त्याची इतकी सवय असते की त्यांच्या नेहमीच्या वेळा झाल्याकी त्यांना हुक्की येतेच. मग ती गोंधळ घालून आईने दिल्याशिवाय शांत होत नाहीत. आणि आपलं बरोबर साध्य करून घेतात.मग आईला प्रश्न पडतो की बाळाला अंगावरून कसं सोडवायचं???

पर्यायी वरचे अन्न: सर्वात पहिले तुम्हाला वरचं अन्न देणे चालु करणं गरजेचं आहे. पण ही एक long term process आहे. एकदम बाळाला वरचं चालु करता येत नाही.

मग कसं द्यायचं वरचं अन्न??

बाळाळा पाचवा महिना पूर्ण होऊ लागला की सुरुवात पाण्यापासून करायची. काही डॉक्टर्स सहाव्या पासून सांगतात.पहिले दहा दिवस पाणी द्यायचे. मग तांदुळाची पेज म्हणजे (नुसतं त्यातलं पाणी) द्यायचं. मग मुगाच्या डाळीवरचं पाणी पुढचे दहा दिवस. मग हळूहळू पात्तळ खिरी, नाचणीसत्व असं करत करत सुरुवात करायची.

एखादी चव त्याला आवडली नाही तर force नाही करायचं. काही दिवस skip करायचं. दुसरं देऊन पाहायचं. असं करत करत आधी दिवसातून एकदा. मग दिवसातून दोनदा. जसं की सकाळ आणि संध्याकाळ असं वरचं feed करायचं. मग दिवसातून तिनदा, चारदा वय आणि भूक अनुसार सकाळी पाहिलं दूध झालं की, दुपारी जेवणासारखं, मग झोपेतून उठल्यावर चार वाजता आणि मग संध्याकाळी सातच्या दरम्यान वैगरे थोडंसं मोठया माणसाच्या routine वर आणायचं.

ह्याचा फायदा कसा होईल?? त्याचं पोट हळूहळू भरायला लागेल मग त्याच्या पिण्याचे प्रमाण हळूहळू कमी होईल.

आता ह्या दरम्यान आईने देणे बंद करायचे का?? तर नाही. पण हळूहळू एक वेळ कमी करायची. पहिले दर तासाला पित असेल तर मग दर दोन तासानी मागेल. हा फरक आईला आपोआप जाणवेल. मग जरा मोठा झाला आणि खिमटी, सूप, फळांच्या प्युरि असा थोडा थोडा जसा जड आहार घेईल तेव्हा त्याचं बरंच पिणं कमी झालेलं असेल.

aaipan.com:how to stop breastfeeding?

तरीदेखील राहतात ठरलेल्या क्रिटिकल वेळा:आता काही वेळा त्यांना अतिशय गरजेच्या असतातच. जसं की सकाळी उठल्यावर लागतच. अंघोळी नंतर लागतच. झोपताना दुपारी मागतातच. संध्याकाळी एकदा किंवा रात्री झोपताना हवं म्हणजे हवंच. आणि रात्रीतही प्यायला उठतातच.

मग कसं कराल??

इथे खरी तुमची कसोटी लागते. एकदम सगळया वेळा सुटणार नाहीत.

  • पण सर्वात सोपी चार वाजता थोडं वरचं खाऊन झालं आणि सात ते साडे सात मध्ये जेव्हा परत आपण अन्न देतो तेव्हा मध्ये जी एक वेळ असते ती लगेच सुटते. सुरुवात तिथून करा.
  • नंतर दुपारची अंघोळी नंतरची वेळ. कितीही गोंधळ घातला तरी देऊ नका. त्यासाठी त्यांना वाटल्यास पुरेसं खायला घाला. मग अंघोळ घाला. आणि त्यानंतर परत त्यानी मांगितलं तर distract करा. तरीही मांगितलं तर आता दाताच्या कण्या वैगरे आल्या असतील तर वरचे चुरमुरे वैगरे असा फिंगर फूड्स मधील पदार्थ देऊन जेणेकरून नवीन curiosity मुले ते distract होतील आणि विसरतील असं करून पाहा. चार दिवस ते एक आठवडा सलग केल्यास ते पुढच्या दिवशी विसरलेले असतील आणि ती सवय सुटेल.
  • सकाळी उठल्यावर :आता ही वेळ सुद्धा पर्यायी अन्न देऊनच सोडवायला लागते.काहीतरी तोंडात टाकायला देऊन किंवा सरळ त्यांची खीर वैगरे तयार ठेवून ही वेळ ही त्यांची सुटते.
  • रात्री झोपताना किंवा दुपारी झोपण्यापूर्वी :आता हे सर्वात कठीण आहे. ह्यासाठी तुम्हाला त्यांच्या झोपेचं आणि अंगावरील दुधाचं connection मोडणं खूप गरजेचे आहे. बाकी सगळया वेळा सुटल्या तरी झोपताना मुलं मागतातच. आता त्यासाठी त्याचं झोपेचं routine असणं गरजेचे आहे. आणि झोपताना दूध पिणं हा संबंध सोडवणं गरजेचे आहे. त्यासाठी त्याला झोपवायच्या आधी खेळवा. कडेवर घेऊन फेऱ्या मारा. मग हालचाल शिथिल होईल. अंगाई म्हणा. गोष्टी सांगा. झोपण्या आधी पोटभर वरचं जेवला असेल आणि खेळून दमला असेल तर केवळ तुमच्या शांत करण्याने झोपेल. जरा अवघड आहे पण धीर धरून अंगावरच देऊ नका. वर सांगितलेलं routine प्रॅक्टिस करा. हळूहळू एक नवीन सवय तयार होईल. दमला, खाल्लं की शांत केलं की झोपतोय. मग अंगावरच दूध मांगणार नाही. तेव्हा वरचं बऱ्यापैकी खायला लागला असेल आणि दिवसातील शारीरिक हालचाल वाढली असेल जसं रांगणं, पुढे बसून सरकणं, खेळणं वैगरे की मग झोपताना दूध सोडवणं सोपं जाईल.
  • दिवसातून आणि रात्रीतून हुक्की येणं:आता ठराविक वेळा कमी झाल्या तरी हुक्की ही येतेच. मग त्यासाठी काय कराल??हा उपाय माझ्या मुलाच्या डॉक्टरांनी संगितला. की दिवसातून दोन वेळा ठरवायच्या. मग तुम्ही पिक करा कोणत्या ते? आणि मग फक्त आणि फक्त त्या वेळेस द्यायचं. ती वेळ निघून गेली की आणि वेळे आधी द्यायचं नाही. रडले तरी रडू द्यायचं. हळूहळू त्यांना ही सवय लागेल की आई आता तिच्या वेळेने देते. पूर्वी त्यांनी मागितलं की आई देते हे सुटून जाईल. आता आई देते तेव्हा घ्यायचं हे पक्क होईल. मग हुककीच प्रमाण किंवा सवय कमी होईल. एकदा त्या वेळा नक्की झाल्या की वरच्या tricks वापरून त्या सोडवणं सोपं आहे.
  • रात्री झोपेतून उठतो तेव्हा :मला ही वेळ सर्वात अवघड वाटते किंवा ही देखील एक तल्लफ असते..आता हे सोडवताना आधी त्याचा झोपायचा आणि दुधाचा संबंध सुटणं खूप गरजेचं आहे. आधी वर सांगितल्या नुसार तो सोडवा.आणि मग ही वेळ सोडवायला घ्या. रात्री जेव्हा झोपेत बाळ उठतं तेव्हा ही देखील एक हुक्कीच असते. रात्री झोपायच्या आधी त्याचं पोट पुरेसं भरणं गरजेचे आहे. त्यामुळे रात्रीचा त्याचा जो काही आहार असेल तो जसं की खीर म्हणा, खिमटी म्हणा किंवा भात म्हणा तो त्याला पुरेसा द्या जेणेकरून त्याचं पोट नीट भरेल. आता तो दमून खाऊन, गाणं ऐकत किंवा गोष्ट ऐकत झोपी जाईल तेव्हा तो दुध न पिता झोपेल. आणि थोड्यावेळाने किंवा रात्री त्याच्या वेळे प्रमाणे उठेल. तेव्हा मात्र त्याला दूध देऊ नका. त्याची झोप उडवा. बाहेर मोकळ्यात घेऊन जा किंवा पाणी पाजा. मग परत डोलवत किंवा फेऱ्या मारत जसं नॉर्मल्ली झोपतो तसं झोपवा. अशावेळेस आई शिवाय कुणी दुसऱ्याने घेतलं तर सोपं जाईल.आता त्याचा संबंध तुटल्यामुळे तो झोपेल. चार दिवस त्रासाचं नक्कीच जाईल पण पाचव्या दिवसापासून तो मागणार नाही. सवय सुटेल आणि रात्री सलग झोपायला लागेल.

आता अंगावरून सोडवताना बॉटल द्यायची का??

शक्यतो टाळा असं मी सांगेन. द्यायला हरकत नाही पण बॉटल मुळे गॅस होतात.दुसरं एक सवय मोडून ही नवीन सवय त्यांना लागते आणि मग ती सोडवताना सगळा नवीन खटाटोप दुसऱ्यांदा करायला लागेल. त्यामुळे शक्यतो देऊ नका. पाणी देखील चमच्याने द्या. बॉटल नको.

लक्षात ठेवा ही मोठी process आहे. एकदम result दिसणार नाहीत पण हळूहळू सुरुवात केली की बाळ काही दिवसात अंगावरुन नक्कीच सुटेल. साधारण वर्षाचं झालं की रात्रीचं सोडवायला घ्यायला हरकत नाही. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सुरुवात करा.

लक्षात ठेवा कोणी ही परफेक्ट नसतं.Patience is the key!!ऑल दि बेस्ट तुम्हा सगळ्यांना!!अशाच नवनवीन माहितीसाठी वाचत राहा आईपण!!!खाली कंमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका !!!You can follow us on instagram and facebook!!!!!!!and subscribe to website using email id for lot more informative stuff !!!!!!

1 thought on “बाळाला अंगावरून कसं सोडवाल?How to successfully stop breastfeeding??”

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!