आजारी असताना बाळाचा सांभाळ कसा कराल ? |How to take care of baby while sick??in Marathi

आईपण | How to take care of baby while u sick??

आईचं आजार पण आणि बाळाचं timetable कसं सांभाळाल ??आजारी असताना बाळाचा सांभाळ कसा कराल??

आई आजारी पडली कि झालं ,सगळे प्रश्नच प्रश्नच .खासकरून अशा दिवसात आपल्याला आपल्या आईची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.पूर्वी कसे निवांत पडून राहायचो ,सगळं हातात मिळायचं ,पण तसं होत नाही.बाळाच्या संगोपनाची जवाबदारी हि आई वर राहतेच .मग कसं करावं बरं सगळं manage ???आजारी असताना बाळाचा सांभाळ कसा कराल ?

काही महिन्यांपूर्वी पुण्यात covid ची तिसरी लाट आली आणि मी देखील त्या दरम्यान आजारी पडले.माझ्या spouse ना वर्क फ्रॉम होम चा पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा मार्केटिंग मधील जॉब असल्याने सतत online मिटींग्स ,फोन कॉल्स ह्यामुळे विवानकडे लक्ष देणं त्यांना देखील तितकंसं शक्य नव्हतं.उठत बसत मी आमचं आणि मुलाचं खाणं वैगरे सांभाळत होते तरीदेखील आईपण हा फुल्ल टाइम जॉब सांभाळणं अशावेळेस कठीण जात होतं.तेव्हा मी काय शिकले आणि काय सोपं वाटलं आम्हाला ते मी शेअर करत आहे जेणे करून सगळ्या अशा phase मधून जाणाऱ्या मॉम्स ना त्याचा फायदा होईल.तेव्हा नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया शेअर करा .

This article helps you to understand how to take care of baby while you are sick in Marathi language. It is often difficult for parents to perform parenting duties while they are not feeling better themselves. It gets more problematic when you don’t have any help at home to look after child while you are taking rest. I have faced this problem myself while third Covid wave hit Pune during month on January during 2022.Since I went through the problem, I came up with effective strategy and tips to solve this problem. Take a look at it.

काही सिम्पल टिप्स आणि काही गरजेच्या गोष्टी :


बाळाचे ठरलेले routine असणे गरजेचे आहे :


जेवढे predictable routine ,तेवढं आपल्यासाठी सोपं.जसं कि कधी खातो ?केव्हा खेळतो ?कधी झोपतो ?हे जेवढे रोजचे माहिती असेल तेवढे आईला आणि इतरांना manage करणे सोपे.routine सवयीचं असलं कि नक्की कधी खाईल ??तेव्हा त्याच्या थोडं आधी करून ठेवा ,काय आवडतं??म्हणजे पटकन खाईल ??मग ते बनवा म्हणजे सहज पटकन भरवणं सोपं .झोपतो कधी ??त्याचं फिक्स routine माहित असलं कि कसं तो वेळ मोकळा आहे मग तेव्हा दुसरी कामं ठेवा किंवा तेव्हा फिक्स आराम मिळणारे हे माहित असलं कि सोपं सगळ्यांनाच जाईल .

बाळासाठी जेवण बनवून ठेवा आणि स्वतःसाठी हलका आहार किंवा डब्याची सोय:


बाळाला भरवायचा आहार ,जसं कि लहान असेल तर खिमटी ,सत्त्व,खीर असे पदार्थ आगाऊ बनवून ठेवा ,जास्त वेळ घेत नाहीत .भरवायच्या वेळेस गरम करून भरवणे सोपे जाते.मोठे असेल बाळ तर त्याचा भात वैगरे शिजवून ठेवा.म्हणजे त्याला भूक लागली कि कुणाच्या मदतीने त्याला पटकन भरवू शकता .उदाहरण म्हणून सांगते ,रव्याचा मऊ शिरा किंवा तत्सम खीर वैगरे आहारात घेत असेल तर , एक्दम भाजून ठेवला कि त्याच्या बाबाना पण वेळप्रसंगी पटकन खीर वैगरे बनवता येईल .तशी सोय झाली कि तुमचं काम सोपं होणारे आणि बाळाचं पोट पण नीट भरणारे .

स्वतःसाठी मऊ भात ,वरण भाताचा कुकर लावा किंवा सरळ घरगुती डबा(अर्थातच आजारी आहात म्हणून )बाहेरून मांगवुन घ्या म्हणजे स्वयंपाकाचे कष्ट वाचतील .

Co-parenting :

Co-parenting म्हणजे आई आणि वडील ह्या दोन्ही पालकांनी बाळाचं एकत्र मिळून केलेलं संगोपन .आता एरवी आपण म्हणतोच कि एकत्र संगोपन तर करतो आपण.पण सगळ्याच जवाबदाऱ्या शेअर करणं म्हणजे कॉ-पॅरेंटिंग.जर घरात आई शिवाय वडिलांना देखील बाळाला भरवायची,त्याचे diaper बदलण्याची आणि अशा इतर छोट्या छोट्या गोष्टींची थोडीफार सवय असेल तर अशा वेळ प्रसंगी आईला देखील जरा सोपं जाईल नाही का ???त्यामुळे सगळ्या नाही तरी थोडं फार बाबांना माहित करून देणंदेखील गरजेचं आहे .

आता मध्यंतरी उर्मिला निंबाळकर ह्या मराठी मॉम सेलिब्रिटी आणि youtuber ने coparenting ह्या विषयावर इंस्टाग्राम पोस्ट मध्ये ती आणि तिचा life पार्टनर दोघं कशा ह्या जवाबदाऱ्या शेअर करतात ह्याबद्दल खूप छान पोस्ट लिहिली होती .तेव्हा coparenting हि काळाची गरज आहे.थोडंफार काम शेअर केलं,अशी सवय ठेवली तर तुम्हाला पण सोपं होईल अशावेळी.तेव्हा त्याचं सकारात्मक विचार करा .

बैठे खेळ

जर बाळांना थोडे फार बैठे खेळ माहित असतील खासकरून toddlers ना तर ह्या दिवसात तुम्ही त्याच्यावर पडून लक्ष ठेवत नक्कीच थोडा आराम करू शकता .ठोकळ्यावर ठोकळे रचणे ,puzzle सोडवणे ,मोठ्या ठोकळ्यांचा लेगो सेट ,सोप्यात सोपं माझा मुलगा बसून बरच वेळ गाड्या चालवतो ,तो हि त्याचं आवडता timepass आहे .असे खेळ देऊ शकता .

गोष्टीची वेळ /Read a book :

जर तुमच्या मुलास गोष्टी आवडत असतील तर तुम्ही नक्कीच त्याला गोष्टी सांगू शकता .एखादं छान गोष्टीचं त्याला आवडेल असं बुक तुम्ही नक्कीच वाचून दाखवू शकता . इंस्टाग्राम वर @architechtmata नावाचं अकाउंट आहे त्यात खूप छान पुस्तकांचे बुक reviews आहेत जी लहानमुलांसाठी चांगली आहेत.किंवा तोंडी तोंडी पण तुम्ही आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगू शकतात .

तात्पुरते tv time नियम जरा शिथिल करा .

थोडा वेळ तात्पुरतं जो पर्यंत तुम्ही आजारी आहेत तुम्हाला आपणुन काही करणं अजिबात होत नाहीये .फारशी मदत नाहीये तर थोडा वेळ त्याला त्याच्या आवडीची गाणी किंवा गोष्टी अर्थात तो किंवा ती जे काय आवडीने एन्जॉय करते ते लावून द्या .आणि नंतर परत सवय सोडवा.

Read More : Baby Video Guide लहान मुलांसाठी मनोरंजक मराठी बालगीत

काही गरजेच्या गोष्टी :

  • बाळा पासून होत असल्यास थोडं अंतर राखा.
  • ह्या दिवसात आपल्याला कितीही माया आली तरी आपलं infection त्याला होणार नाही म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे .
  • आपली अंथरूण पांघरूण वेगळी ठेवा .
  • भरवताना एरवी देखील आपलं उष्ट त्याला देऊ नका .

अर्थातच ज्यांना मदत आहे ,घरी सपोर्ट आहे त्यांना काही फार त्रास नाही होणार किंवा त्यांची सोय नक्कीच होईल पण ज्यांना केवळ नवरा बायको असं काम निमित्त राहावं लागतं किंवा परगावी राहावं लागतं जिथे फार काही मदत उपलब्ध नाहीये किंवा सोय नाहीये अशा मॉम्स ना वरच्या टिप्स नक्कीच उपयोगी येतील .आजारी असताना बाळाचा सांभाळ कसा कराल ? हा प्रश्न अशा मॉम्स ना जास्त पडतो.

मी देखील अशा अनुभवातून गेले आहे सो अशा मॉम्स ना आईपण वर अनुभवातून शिकलेल्या काही टिप्स .अशाच टिप्स आणि माहिती साठी वाचत राहा आईपण !!!!!

Reference : parents.com

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!