कोरोना विशेष : लहान मुलांची आणि स्वतः ची काळजी कशी घ्याल? Covid-19 Special:how to take care of urself and kids during pandemic??

सध्या आपला महाराष्ट्र हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून चाललांय. पहिल्या लाटेच्यातुलनेत ही लाट मोठी आणि सर्वत्र पटकन पसरणारी आहे. सध्या ओळखीतील बरीच माणसे कोरोना पॉसिटीव्ह आल्याचे आपणास समजते. आणि आपण मनातून घाबरून जातो. ह्या भीतीने गेला महिनाभर आम्ही घरातच आहोत. पुण्यातील संख्या सतत वाढत असल्याने केवळ दूध आणि भाजीशिवाय कुठे बाहेर पडणं होत नाही. माझं मुलं लहान असल्याने आम्ही लॉकडउन लागण्या आधी पासूनच दोन आठवडे कामाशिवाय बाहेर जाणं बंद केलं. दिवस दिवस घरात काढणं अवघड आहे. आणि अशा परिस्थितीत लहान मुलास सांभाळणं देखील. म्हणून आम्ही काही काळजी घेण्यास सुरुवात केली.

सध्याच्या ह्या परिस्थितीत कोणती काळजी घ्याल??

 • बाहेरून आलेलं सामान हे तुमच्या बाळाच्या हाती लागणारं नाही अशा टेबलवर दिवसभर पसरून ठेवा.आणि मग वापरायला सुरुवात करा.
 • दुधाची पिशवी गरम पाण्यानी अथवा डेटॉल च्या पाण्याने धुवून मग वापरायला घ्या.
 • बाहेरचं सामान शक्यतो सकाळी अंघोळीच्या आधी घेऊन या. म्हणजे बाहेरून आल्यावर अंघोळ होणं गरजेचे आहे.
 • लहान बाळाच्या अंघोळीस ह्या दिवसात सुटी देऊ नका आणि उन्हाळा जरी असला तरी फार कोमट पाणी वापरू नका. शक्यतो सर्दी खोकला टाळणं गरजेचं आहे.
 • फार गार स्वतःही खाऊ नका.लहान मुलांना देण्याचा प्रश्न येतच नाही.
 • बाहेर जाताना मास्क वापरा. मास्क शिवाय कुठेही जाणं टाळा. जवळ sanitiser बाळगा.

ही झाली साधारण काळजी. ह्या गोष्टी सोप्या आहेत आणि मागच्या वर्षी आपण ही सर्व काळजी घेतच होतो. पण दिवसभर कुठेही बाहेर न जाता केवळ घरातच राहणे हे आपल्यालासाठी कंटाळवाणें जातेच आणि हे आपल्यासाठी जितकं अवघड आहे तितकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त लहान मुलांसाठी देखील कठीण आहे. खासकरून अशा दिवसात जे त्यांचे बाहेर खेळण्याचे, बाहेरचं जग पाहण्याचे दिवस आहेत.त्यामुळे त्यांच्या न पूर्ण होऊ शकणाऱ्या ह्या इच्छा त्यांची होणारी चिडचिड, वाढणारा हट्टीपण आणि सततची कुरकुर ह्यातून ते व्यक्त करतात. आणि मग आपल्याला वाटायला लागतं आपलं मूल आता हट्टी झालंय म्हणून पण वास्तविक त्याच्या routine मधील हा बदल ते व्यक्त करत असतं.

ह्यावर काय मार्ग काढाल?

Activities प्लॅन :

 • तुम्ही दिवसातील थोडावेळ त्याच्यासोबत रोज न चुकता spend करा. जसं की बाळ लहान असेल तर गाणी, गोष्टी, गप्पा मारू शकता.
 • थोडं खेळतं मूल असेल तर त्याच्यासोबत लहान मूल होऊन खेळू शकता. जसं की tower making किंवा बॉल रोलिंग, लपाछपी असे सिम्पल गेम्स खेळू शकता.
 • थोडावेळ त्याला खिडकीतून मजा दाखवणं, गॅलरी मध्ये घेऊन जाणं. एक वेळचं जेवण तिथं भरवणं अशा गोष्टी करु शकता. ज्याने त्याला सुद्धा थोडा change मिळेल. आणि त्याला बरं वाटेल.

स्वतः साठी काय कराल?

 • Reading / वाचन :सध्याचा वेळ आपण कुठे बाहेर जाऊ शकत नाही तर घरात बसून एन्जॉय करा. आणि वाचन हा त्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. सध्या kindle व storytel वर खुप छान पुस्तकं उपलब्ध आहेत त्यांचा आस्वाद आपण नक्की घेऊ शकतो. प्रेग्नन्सी मध्ये कोणती पुस्तकं वाचाल? ह्यासाठी मी वाचलेल्या पुस्तकांचे reviews मी आधीच्या पोस्ट मध्ये share केलेले आहेत तुम्ही पाहू शकता.
 • कूकिंग :घरी असल्यावर सतत काहीतरी खायची इच्छाही होतेच. खासकरून ह्या दिवसात जेव्हा सतत उठून बाहेर जाता येत नाही. तेव्हा तुम्ही त्या dishes घरी बनवून पाहू शकता. Cooking is itself therapy. तुमचा कंटाळा दूर करायला मदत होईल.
 • Exrercise आणि मेडिटेशन :सध्याच्या दिवसात आपणास कोणत्या गोष्टीचे महत्व कळले असेल तर ते म्हणजे व्यायाम. त्याने शरीराची ताकद वाढते. रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. मेडिटेशननी कंटाळा, frustration दूर होयला मदत होते. सध्याचा वेळ घरच्याघरी आपण हेअल्थ गोल्स अचिव्ह करण्याकरिता वापरू शकतो. व्यायामाने मनं देखील प्रसन्न होतं. तेव्हा रोज किमान 20 मिनिटे व्यायाम करु शकता. मग हळूहळू आपोआप जास्त करावासा वाटेल.
 • छंद :एखादा छंद जोपासू शकता. जो घरच्या घरी पूर्ण होऊ शकतो. ज्यासाठी तुम्हाला पूर्वी वेळ मिळाला नाही. आता आहे त्या वेळेचा सदुपयोग नक्कीच करु शकता.
 • Television :हा ऑपशन कायम आहे. पण सतत निगेटिव्ह गोष्टी पाहण्यापेक्षा अधून मधून हलके फुलके सिनेमे नक्कीच बघा. It always helps.

नक्की try करुन पाहा. फरक जाणवेल. ह्या दिवसात चांगला आहार, घरच्याघरी व्यायाम, बाहेरून आल्यावर वाफ आणि प्रसन्न मनं (मला माहित्ये सांगायला सोपं पण जरा जमायला अवघड पण प्रयत्न नक्कीच करु शकतो )ह्या गोष्टी करुन आपण कोरोनाला हरवू शकतो. कोरोना हारील!!महाराष्ट्र जिंकल!!!!(हे वाक्य माझ्या माहेरच्या घरातून पूर्वी पोस्ट ऑफिस च्या रंगवलवलेल्या भिंतीवर दिसायचं आणि मी आणि श्री रोज रात्री काढा पिताना मजेत म्हणतो )

Stay home!!stay safe!!

अशाच माहितीसाठी वाचत राहा आईपण!!!!

1 thought on “कोरोना विशेष : लहान मुलांची आणि स्वतः ची काळजी कशी घ्याल? Covid-19 Special:how to take care of urself and kids during pandemic??”

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!