बाळाच्या सर्दी साठी काय उपाय कराल?

लहान बाळाला सर्दी झाल्यास काय करावे

लहान बाळ म्हटलं की त्याच्या बरोबर दुखणी खुपणी आलीच. त्यातील एका गोष्टीची आईला बरेचदा काळजी असते ती म्हणजे बाळाची सर्दी. सर्दी म्हटली बाळं देखील बिचारं कासावीस होतं आणि ते पाहून आईला देखील नको वाटतं. तेव्हा लहान बाळाला सर्दी झाल्यास काय करावे ???

Prevention is always better than cure. तेव्हा सर्दी होणार नाही म्हणून काय उपाय कराल ते आधी पाहू.

  • बाळाला अंघोळ घालताना गरम पाण्यानी त्याची छाती आणि पाठ शेकवा. खासकरून हिवाळ्यात आणि पावसाळ्यात.
  • अंघोळ झाल्यानंतर वेखंड पावडर बाळाच्या अंगाला आणि खास करुन छातीला लावा आणि नाकाला त्याचा वास द्या. असं म्हणतात वेखंड पावडर नी सर्दी पासून बचाव होतों. बाळाला शिंका आल्या की सर्दी सुटते.
  • शक्यतो बाळाच्या कानाला वारं लागणार नाही ह्याची काळजी घ्या.
  • बाळाला जास्त वेळ ओलं ठेवू नका.

Read More : बाळाच्या गॅस साठी सोपे उपाय

आता सर्दी झाली असल्यास सोपे घरगुती उपाय कोणते ते पाहू.

  • ओव्याची पुरचुंडी :हा अतिशय प्रभावी उपाय आहे.छोटया फडक्यात ओवा बांधून त्याची पुरचुंडी करुन तव्यावर शेकवावी.आणि त्याने बाळाची छाती आणि पाठ शेकवावी आणि बाळाच्या नाकाला दुरून वास द्यावा.ह्याने त्याची सर्दी लगेच कमी होण्यास मदत होईल.
  • गरम पाण्याची पिशवी :आजकाल इलेक्ट्रिकल देखील मिळतात. नेहमीच्या वापरणार असल्यास आकारांनी लहान असणाऱ्या कापडात गुंडाळून बाळाची पाठ आणि छाती शेकवा. सर्दी कमी होण्यास मदत होईल
  • निलगिरी तेल :बाळाच्या छातीला निलगिरी तेल थोडंसं चोळल्याने देखील सर्दी बरी होते.

ह्या व्यतिरिक्त साधारण कोणतं औषध डॉक्टर देतात.??

Infant सिनारेस्ट : हे माझ्या मुलाच्या डॉक्टरांनी prescribe केलं होतं.त्याने देखील सर्दी बरी होते.तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लक्षात ठेवा prevention is always better than cure!!!तेव्हा लहान बाळाला सर्दी झाल्यास काय करावे ??? ह्यापेक्षा होऊ नये ह्यावर काळजी घेऊ . माहितीसाठी वाचत रहा आईपण!!!

Reference : https://www.mayoclinic.org/diseases-conditions/common-cold-in-babies/symptoms-causes/syc-20351651

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!