पाचव्या महिन्यातील बाळ कसे असेल? Marathi Guide to Newborn baby Fifth Month

पाचव्या महिन्यातील बाळ

आता तुमचं बाळ पाचव्या महिन्यात असेल. साधारण त्याचं वजन त्याच्या सुरुवातीच्या वजनापेक्षा दुपटीने वाढले असेल किंवा हळूहळू त्या दिशेने वाटचाल करत असेल. आता तुम्ही देखील त्याच्या सगळ्या सवयीनां used to झाला असाल. किंवा त्याचे पॅटर्न कळू लागले असतील.तर जाणूयात त्याच्या पाचव्या महिन्यातील गोष्टी.

आहार :आता साधारण डॉक्टरांनी green signal दिला असेल तर तुम्ही पाचव्या महिन्यातील बाळाला वरचे अन्न द्यायला सुरुवात करू शकता. बाळाला वरचं अन्न कसं द्यायला सुरुवात कराल?? ह्याचे हेल्प गाईड मी आधीच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.जरी वरच्या आहाराची सुरुवात करत असाल तरी देखील त्याच्या पोषणाच्या गरजा ह्या आईच्या दुधातून किंवा तुम्ही त्याला देत असलेल्या फॉर्मुलातुन पूर्ण होत असतात हे लक्षात घ्या.

बाळ वरच्या अन्नासाठी तयार आहे हे कसं ओळखाल??
 • हळू हळू व्यवस्थित बसायला लागेल.
 • डोकं आणि मान नीट सांभाळायला लागलंय.
 • नीट अन्न गिळू शकतं.
 • जेव्हा तोंडाजवळ चमचा न्याल तेव्हा तोंड उघडेल.

स्लीप : पाचव्या महिन्यातील बाळ ह्या दिवसात साधारण दिवसातून साडेअकरा तास ते चौदा तास झोप घेते. दिवसातून साधारण दोन ते तीन झोपा काढू शकते.काही बाळ छोटया छोटया डुलक्या काढणं पसंत करतात.

ह्या दिवसात तुमचं बाळ रात्री मोठी झोप घ्यायला सुरुवात करू शकते. केवळ अधून मधून प्यायला उठेल.तुम्ही आता त्याच्या bedtime routine वर फोकस ठेवा. पाचव्या महिन्यातील बाळाचे bedtime routine कसं बसवाल? आणि झोपवायच्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी आधीच्या हेल्प गाईड मध्ये सांगितल्या आहेत. जरूर वाचा. ह्याची तुम्हाला मदत होईल.

पाचव्या महिन्यातील बाळाचे वाढीचे milestones :
 • संपूर्ण पालथे पडून सरळ होऊ पाहिल.
 • पायावर त्याच वजन तोलू पाहिल.
 • खेळणी पकडायला पाहिल.
 • डोकं छाती आता नीट उचलू शकेल.
 • डोळ्यांनी वस्तूंचा मागोवा घेईल.
 • ह्या दिवसात बाळं ’cause & effect ‘शिकतील. एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया उठते हे लक्षात यायला लागेल. जसं की सारखं खेळणं ढकलून खाली पाडतील मग आई ते उचलून देते हे त्यांना कळायला लागेल. मग सतत तोच चाळा करतील.
 • वस्तू जेव्हा नजरेसमोर नसते तेव्हा ती गायब होत नाही ह्याचं ज्ञान येईल.
 • ओळखीच्या चेहऱ्यांकडे पाहून हसतील. Expression ओळखून तसें करायला शिकतील.
 • वेगवेगळे आवाज काढायला लागतील.

पाचव्या महिन्यातील बाळाबरोबर काय खेळ खेळाल??

 • Board books :रंगीबेरंगी चित्रं असलेली, वेगवेगळ्या स्पर्श देणारी पुस्तकं. आता रंगीबेरंगी पाहायला आवडतं खूप.
 • Cause and effect games :सारखं काहीतरी पाडून दाखवा. दही घ्या दही game. बुआ कु क game फार आवडेल. तेच तेच परत पाहणं आणि करणं हा आवडता छंद.
 • Follow the toy :खेळणं नजरेसमोरून फिरवणं. जसं की रॉकेट उडतंय ते कसं जवळ आलं?कसं लांब गेलं असा खेळ. लहान बाळांना फार आवडतो. So आईच्या creativity ला खूप वाव आहे.

अशाच माहितीसाठी वाचत राहा आईपण!!!!

Reference site : https://www.webmd.com/parenting/baby/baby-development-5-months

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!