केगल व्यायाम व प्रेग्नन्सी | Marathi Guide to kegel exercises

केगल व्यायाम

जसजसे पाचवा महिना संपून एक एक महिने पुढे सरकू लागतात तशी प्रसूती जवळ आल्याची भीती वाटू लागते ,पण घाबरू नका माझा ब्लॉग आहे तुमच्या मदतीला .आणि सुलभ प्रसूतीसाठी लागणाऱ्या सगळ्या सहज सोप्या आणि प्रॅक्टिकल टिप्स घेऊन आले आहे तुमच्यासाठी .आणि त्यातील एक महत्वाचा व्यायाम म्हणजे केगल व्यायाम पद्धती !!!

सध्या केगल एक्सरसाईसेस खूप फॅड आहे .प्रेग्नन्सी दरम्यान खूप जणींना सांगितले जाते .माझ्या नणंदेनि पण मला प्रेग्नन्ट असताना केगल ची माहिती दिली .ती इतकं भरभरून बोलल्यावर म्हटलं करून पाहू गूगल आणि केल्यावर youtube वरचे भराभरा खूप सारे विडिओ आले .पहिल्यांदा त्याच्या पोसिशन बघून काहीतरी वेगळंच नाटक आहे असं वाटलं .पण जेव्हा नीट पाहून समजून घेतलं तेव्हा सुलभ प्रसूतीसाठी नक्कीच ह्याचा उपयोग होऊ शकतो असा विश्वास बसला .

तेव्हा मला नक्की काय कळलं ते तुमच्यासाठी घेऊन आल्ये अगदी साध्या आणि सोप्या शब्दात ..

आजकाल सध्या केगल व्यायाम पद्धती बद्दल trend आहे. खास करून गरोदरपणात बऱ्याच स्त्रियांना ह्याचा सल्ला दिला जातो. कधी कधी डॉक्टर लोकं देखील ह्याबद्दल माहिती देतात. पण काय आहे हे केगल व्यायाम आणि काय आहे त्याचा उपयोग?? असा व्यायाम कधी करतात?? हा व्यायाम करायला सोपा आहे का?? ह्या सगळ्याची माहिती आपण घेणार आहोत.

केगल व्यायाम म्हणजे काय??

अरनॉल्ड केगल ह्या स्त्रीरोगतज्ज्ञच्या नावावरून ह्या व्यायाम पद्धतीला नाव देण्यात आले आहे. केगल व्यायाम हा आपल्या पेलविक फ्लोअर च्या स्नायूनां बळकटी आणण्यासाठी केला जातो.ह्या व्यायामामुळे तुमच्या पेलविक स्नायुंचा प्रेग्नन्सी मध्ये होणारा ताण कमी होतो आणि पेलविक फ्लोअर व योनीमार्ग मजबूत होतो.

केगल व्यायामाचा नक्की उपयोग काय?? का करावेत केगल व्यायाम??

प्रसूती दरम्यान आपल्याला योनीमार्ग व पेलविक रिजन मधील स्नायू मजबूत असणं ह्याची आवश्यकता असते जेणेकरून प्रसूती सुलभ होईल.जेव्हा कळा येतात ,तेव्हा बाळ आतून बाहेर येण्यासाठी पुश करत असतं,तसंच आईलादेखील पुश करावं लागतं.तेव्हा योनी मार्गावरील स्नायूंची आपल्याला जाणीव असेल ,ते रिजिड न असता नीट flexible असतील तर सुलभ प्रसूती होणं शक्य होतं.प्रसूतीनंतर देखील आपल्याला युरीन करतानाचा होणार त्रास कमी होतो .

आणि नंतर बाळ झाल्यानंतरदेखील खासकरून बाळंतपणात जेव्हा सुरुवातीला बद्धकोष्ठचा त्रास होतो किंवा युरीन करताना अडचण वाटते अशा वेळेस, किंवा तेथील स्नायू थोडं ढील पडल्याने पटकन युरीन होणे अशा समस्या देखील उद्भवू शकतात. अशावेळेस हा व्यायाम केल्याचा फायदा होतो आणि त्या जगील स्नायू बळकट झाल्याने त्रास होणे कमी होते.बाळंतपण झाल्यावर पहिले काही दिवस जोपर्यंत उघडलेली जागा नीट भरून येत नाही ,झीज शरीराची पूर्ण होत नाही तेव्हा बाईला लघवी करताना किंवा मलविसर्जन करताना अडचण येते .नंतर देखील हसताना किंवा इतरवेळी पटकन लघवी होणं अशा गोष्टी काहींच्या बाबतीत सहज घडू शकतात .अशावेळेस आपल्याला स्नायू नियंत्रण असणं मोलाचे आहे .केगल व्यायाम पद्धतीने हे स्नायूनियंत्रण आपण सहज आणू शकतो ,किंवा ह्यावर नीट काम करू शकतो .त्यामुळे केगल व्यायाम ह्याचा नक्की फायदा होतो .

Note : गरोदर आणि बाळंतीण स्त्रियांनी कोणताही व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये .

हा व्यायाम साधारण कसा करतात??

आता केगल व्यायाम हा आपल्याला पेलविक रिजनशी निगडीत व्यायाम आहे. ह्या भागातील स्नायू हे कायम ऍक्टिव्ह असतात. आपल्या बऱ्याच daily routine मध्ये ह्यांचा वापर होत असतो.

Read More : प्रेग्नन्सी आणि आचरण :व्यायाम व विश्राम प्रेग्नन्सी दरम्यान व्यायाम आणि आराम ह्या दोघांना तितकेच सारखे महत्व आहे .आणि त्यासाठी मी माझ्या अनुभवातील सोप्या सहज आणि प्रॅक्टिकल टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे .त्याच्यासाठी तुम्हाला माझे वरचे आर्टिकल हे खूप फायद्याचे ठरेल.कोणतेही हाई-फनडू व्यायाम नाहीत .घरच्या घरी करता येणार सहज साधा सोपा व्यायाम !!!

साधारण हा व्यायाम कसा केला जातो?? सोपी आणि सहज पद्धती .

  • बाथरूम मध्ये जा.
  • तेथे गेल्यावर, मूत्र विसर्जित करताना (म्हणजे शु करताना )युरीन फ्लो सोडायचा मध्येच तीन सेकंडसाठी थांबवून ठेवायचा आणि परत सोडायचा.
  • हीच क्रिया सतत रिपीट करायची.
  • अर्थात थोडया वेळा करून पाहिल्यावर तुम्हाला कोणते स्नायू ताणायचे आणि कोणते सोडायचे ह्याचा अंदाज येईल आणि तुम्ही एरवी tv बघताना बसल्या बसल्या पण त्यांचा व्यायाम करू शकता म्हणजे contract व release अशा क्रिया स्नायूसोबत करू शकतात. ह्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला ह्या स्नायूवंर नियंत्रण प्राप्त होईल.

वर सांगितलेली पद्धती अतिशय सहज सोपी आणि प्रॅक्टिकल आहे आणि कोणीही कधीही त्याचा अवलंब करू शकतो .केवळ प्रेग्नन्ट बायकांनाच नाही तर नंतर वयोवृद्ध माणसांना देखील ह्याचा रास्त उपयोग होऊ शकतो .

केगल व्यायाम ह्याचे फायदे.

  • मजबूत पेलविक स्नायू
  • मूत्राशयावर चांगल्यापैकी नियंत्रण प्रस्थापित होण्यास मदत
  • मजबूत योनीमार्ग ज्याने लेंगिक सुखात वाढ
  • आतडी असंयमावर नियंत्रण

केगल व्यायाम पद्धतीचा अवलंब करताना किंवा कुठल्याही व्यायाम पद्धतीचा अवलंब करताना गरोदर व बाळंतीण स्त्रियांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे .

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

References: https://www.verywellfamily.com/kegel-exercises-during-pregnancy-4580549

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!