अशा माता ज्यांनी जग बदललं :नॅन्सी एलीओट (थॉमस एडिसनची आई )

आपल्या सगळ्यांनाच थॉमस एडिसन हे नाव माहित आहे. इलेक्ट्रिक बल्ब चा शोध लावणारा शास्त्रज्ञ ज्यानी जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकला.फोनोग्राफ, मोशन picture कॅमेरा आणि टेलिग्राफ व टेलिफोन संबंधितदेखील शोध लावले.84 वर्षाच्या कालावधीत एडिसनने 1093 patents मिळवले. आणि यशस्वी उद्योजक म्हणून देखील नाव कमावले. हे सारं केवळ नशिबाने मिळालं नाही तर हे शक्य झालं थॉमस एडिसनच्या आईमुळे.

लहानपणी थॉमस एडिसन हा ढ विध्यार्थी आहे अथवा तो बौद्धिकदृष्टया गतिमान नाही असा शिक्षकानी केलेला उल्लेख थॉमस एडिसनची आई नॅन्सी एलीओट ह्यांना पटला नाही.उलट माझा मुलगा खास आहे. आणि मी त्याला स्वतः शिकवेन असा चंग बांधत एडिसनच्या आईने एडिसनला शाळेतून काढले आणि स्वतः घरी शिक्षण दिले .पुढे हाच एडिसन जगविख्यात शास्त्रज्ञ बनला.

खुप वर्षानंतर एडिसनने देखील सांगितले कि, “माझ्या आईने मला घडवले आहे.तिला माझ्याबद्दल इतकी खात्री होती कि मला देखील असं वाटलं कि तिच्यासाठी तरी मी उभरून आलं पाहिजे, तिला निराश करुन चालणार नाही.”

aaipan.com best mothers
Thomas edison

आणि हे वास्तविकरित्या खरे आहे.कारण एडिसन हे चार चौघासारखे मूल नक्कीच नव्हते.जेव्हा जन्माला आले तेव्हा देखील त्याची तब्येत नाजूक होती.आईच्या सात मुलांपैकी सर्वात लहान मूल.वयाच्या बाराव्या वर्षी एडिसनला एका कानानी बहिरेपण असल्याचादेखील त्रास जाणवू लागला.अशा परिस्थितीत देखील एडिसनच्या आईने त्याला लिखाण, वाचन आणि गणित ह्यांचे शिक्षण घरीच दिले. नंतर त्याला तांत्रिक गोष्टी व रासायनिक प्रयोगात आवड वाटू लागली. आणि पुढे जाऊन जे काही घडलं तो इतिहास आहे.

आपल्या मुलातून एक असामान्य शास्त्रज्ञ, व्यक्ती निर्माण करण्याची जादू एका आईच्या आपल्या मुलावर असलेल्या विश्वासाने करुन दाखवली.जिथे जगाने दोष काढले तिथे आई खंबीरपणे पाठीशी उभी राहिली.व जग बदलून टाकणाऱ्या मुलाचा जन्म झाला.अशा आईस ‘आईपण’चा सलाम!!!

अशाच बऱ्याच गौरवी माता व त्याच्या कहाण्या ‘आईपण ‘घेऊन येत आहे ह्या नवीन सदरात. त्यामुळे वाचत राहा आईपण!!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!