प्रेग्नन्सी मध्ये नक्कीच पाहा खालील सिनेमे | Must watch Pregnancy Movies list in Marathi

This blog posts talks about the must watch Pregnancy movie list in marathi and other options to watch during pregnancy for pregnant ladies.

प्रेग्नन्सी म्हटलं कि बऱ्याच गोष्टी आपण वेगळ्या करतो .दिवसातून स्वतःसाठी वेळ काढणं ,आराम करणे ,पुस्तकं वाचन आणि हो ह्या जोडीला movies बघणं देखील बरं का !!बऱ्याच प्रेग्नन्ट ladies ना प्रश्न पडतो कोणते movies प्रेग्नन्सी मध्ये पाहावे ??

मला देखील हा प्रश्न पडत होता .बघावंसं तर बरंच काही वाटायचं पण नक्की काय बघू हे कळत नव्हतं.ह्या दरम्यान आपण नकळत एक रोल मॉडेल शोधत असतो .अर्थात आपली आई हि आपल्या डोळ्यासमोर असतेच पण तिची प्रेग्नन्सी थोडी ना आपण पाहिलेली असते .मग आपल्याला वाटतं जरा आपल्या डोळ्यासमोर आपल्या वयाची ,आपल्यासारख्या विचारांची ,आपल्या सारखे struggle केलेली मुलगी जर असेल तर तिची प्रेग्नन्सी जर्नी पाहून नक्कीच आपल्याला काही तरी कळेल.एक आई होण्याची जाणीव आपल्यात आहे पण तिला बघताना ती आणखी फुलेल .आणि आपल्याला पडणारे प्रश्न तिला पडत असतील काय ???आणि काय बरं उत्तर शोधलं असेल तिनी ह्यावर ?? अशा विचारातून मी हि अशी रोल मॉडेल शोधायला बसले आणि थोडंफार गूगल आणि थोडंफार मैत्रिणींची suggestions घेऊन एक बऱ्यापैकी लिस्ट मला सापडली .एक्साक्ट रोल मॉडेल सापडली का ??तर नाही पण बऱ्याच पात्रात तिचे pieces सापडले .
तीच लिस्ट मी तुमच्या समोर ठेवत आहे .इ होप कि तुम्ही तुमचीवाली रोल मॉडेल शोधाल….

मग प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही कोणते movies व कशाप्रकारचे shows television वर पाहू शकता ?? |What type of movies and tv shows you watch during pregnancy??

प्रेग्नन्सी दरम्यान गर्भवतीचे मन हे हॉर्मोनल बदलामुळे नाजूक अवस्थेत असते .अशामध्ये त्याच्यावर कोणताही आघात होणे टाळणे खूप गरजेचे आहे .त्यामुळे कोणत्याही पद्धतीचे भडक किंवा भीतीदायक दृश्ये असलेले सिनेमे बघणं आपणास पूर्णपणे avoid करणे गरजेचे आहे .

दृश्य हि कायम आपल्या मन:पटलावर उमटत असतात .आपण जे बघतो ते घडतो असं बऱ्याच अनुभवातून आपल्या समोर आलेलं आहे .मग त्यामुळे आपल्याला पॉसिटीव्ह काही घडवायचे असेल तर पॉसिटीव्ह चित्र आपल्या मन:पटलावर उमटणं देखील खूप गरजेचे आहे .त्यामुळे ह्यासाठी फील गुड movies किंवा series हे चांगले ऑपशन्स आहेत .

साधारण कुणत्याही गंभीर विषयावरील गंभीर ,भडक ,horror ज्याने मनावर विनाकारण ताण येईल असे movies किंवा shows बघणं टाळा .लक्षात ठेवा आपलं मन प्रसन्न ठेवणं हे उद्दिष्ट आहे तेव्हा हलके फुलके, मनाला सकारात्मक भावणारे ,विनोदी असे movies तुम्ही नक्कीच पाहू शकता .काही movies तुम्ही तुमच्या spouse सोबत जोडीने देखील पाहू शकता .It will be a good quality time for both of you. तुम्हालाच छान रिलॅक्स वाटेल आणि तुमचं bonding आणखी छान होईल .

तर कोणते pregnancy movies पाहाल ??| Top Pregnancy must watch Movies in Marathi

1. सलाम नमस्ते / Salaam Namaste

must watch Pregnancy movie list in marathi

हा एक २००५ मधील प्रिती झिंटा आणि सैफ अली खान ह्यांचा विनोदी रोमँटिक मूवी आहे .ह्यातील प्रिती झिंटा हिचे अंबर हे character व सैफ अली खान ह्याचे निखिल हे character एकत्र येतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात .अंबरची pregnancy त्यांच्या प्रेमाला challenge करते .पण तरीही तिची pregnancy ,ती हॅन्डल करताना एक आई म्हणून तिच्यात होणारे बदल ,तिचं बदलतं भावविश्व सारंच काही पाह्ण्याजोगं आहे .हा movie खरंच तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये बघायला हरकत नाही .तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल.

एका आयुष्याकडे खुल्या मनाने पाहणाऱ्या युवतीचा आई म्हणून परिपक्व होत जाणारा बदल ,निखिल पॅनिक झाल्यावर एकटेपणाने single mom होत सगळ्या जवाबदाऱ्या पार पडू पाहणारी अंबर तेवढीच भावते .तिकडे बाप म्हणून आधी घाबरलेला पण नंतर बदलांना सामोरा जाताना बाप म्हणून बदलला निखिल हि चांगला साकारलाय .हा चित्रपट आता थोडा जुना झाला तरी अजूनही बघताना मजा येते ,खासकरून प्रेग्नंसी मध्ये जेव्हा तुम्ही खरंच एकत्र आयुष्य पाहू लागतात .

https://www.imdb.com/title/tt0456165/

2.मुंबई पुणे मुंबई 3 / Mumbai Pune Mumbai 3

must watch Pregnancy movie list in Marathi

हा मुंबई पुणे मुंबई ह्या सिरीजमधील तिसरा movie आहे .हा मूवी गौतम आणि गौरी ह्याच्या pregnancy phase वर फोकस करतो.त्यांचा आनंद ,त्यांना पडणारे doubts ,घरच्यांचा आनंद व एका मराठमोळ्या कुटुंबातील pregnancy तुम्हाला पाहायला मिळेल.

पुणे मुंबई पुणे मधील गौरी जेव्हा प्रेग्नन्ट होते आणि गौतम जेव्हा बाप बनतो तेव्हा बघताना जरा आगळं वेगळं पण छान वाटतं .गौरीचं आयुष्य ,करिअर आणि pregnacy ह्या सगळ्या गोष्टी छान रेखाटल्यात .गौतम च फ्री बर्ड nature आणि आता येऊ पाहणारी जवाबदारी मांडण्याचा चांगला प्रयत्न केलाय .काही ठिकाणी थोडं cheesy वाटतं पण मराठमोळी प्रेग्नन्सी ,घरचे ,घरच्यांचं वातावरण ,ह्याबाबतीत मतं मतांतर चांगलं रेखाटलंय .त्यामुळे पाहावा एकदा असा नक्की सिनेमा आहे .

https://www.imdb.com/title/tt7748494/

3. जेन दि वर्जिन / Jane The Virgin

must watch Pregnancy movie list in Marathi

हा एक रोमँटिक विनोदी televsion show आहे.ज्यात एका चुकून प्रेग्नन्ट होणाऱ्या जेन ह्या मुलीची कथा आहे.तिचं चुकून प्रेग्नन्ट होणं हा देखील एक विनोदी किस्सा आहे .त्यानंतर शो मधील drama ,जेनची प्रेम कथा आणि तिचं आई म्हणून परिपक्व होत जाणं हे सारंच हलकं फुलकं आणि छान रंगवलंय तर हा शो तुम्ही नक्की एन्जॉय कराल.

जेन हि कॅथॉलिक धर्मात वाढलेली मुलगी ,जेव्हा डॉक्टरांच्या चुकीमुळे चुकून प्रेग्नन्ट होते आणि त्याचा संपूर्ण मजेशीर किस्सा खूप मस्त रंगवलाय .तरीदेखील प्रेग्नन्सी मध्ये तिचे सिरीयस होणं ,बाळा बद्दल प्रेम जागृत होणं ,आणि करिअर ,जॉब ,लव्ह आणि मूल ह्यात तिचा रोल खूप छान रंगवलाय .तिची डिलिव्हरी देखील छान विनोदी तरीदेखील सिरिअस अशी मस्त रंगवलीये .नक्कीच पहा तुम्ही एन्जॉय कराल .

https://www.imdb.com/title/tt3566726/

4.व्हॉट टु एक्सपेक्ट व्हेन यु आर एक्सपेक्टइंग / What to Expect When You’re Expecting

must watch Pregnancy movie list in Marathi

हा एक चार स्त्रियांच्या प्रेग्नन्सी फेज आणि त्यातील प्रत्येकीची वेगळी कथा ह्यावर आधारित मूवी आहे. प्रेग्नन्सी मधील त्यांचे individual challenges ,त्यातील गमती जमती छान आहेत .एका working सेलिब्रिटी च्या प्रेग्नन्सी पासून ते एक काही वर्ष प्रेग्नन्सी साठी प्रयत्न करून प्रेग्नन्ट राहिलेल्या बाई पर्यंत ,मुल adopt घेऊ पाहणाऱ्या बाई ची सुद्धा स्टोरी ह्या movie मध्ये छान रंगवली आहे .त्यामुळे हा मूवी प्रेग्नन्सी मध्ये एकदा पाहायला काहीच हरकत नाही .

खूपदा प्रयत्न केलेली बाई जेव्हा प्रेग्नन्ट राहते ,तेव्हा तिला होणारा आनंद ,glamourous वाटणारी प्रत्यक्षातील प्रेग्नन्सी ,त्यातले किस्से ,ह्यात त्या बाईचा भावनिक खेळ ह्याची सुंदर सांगड आहे .दुसरीकडे चुकून राहिलेले दिवस त्यामुळे जवळ आलेलं मित्र मैत्रीण त्यांची कथा सांगितलेली आहे .तर adopt करू पाहणारी आई आणि तिच्या भावभावना अशी एक वेगळी स्टोरी देखील पाहायला बरं वाटतं .आणि वोर्किंग आणि प्रेग्नन्ट फिटनेस सेलिब्रिटी मॉम ची कथा देखील छान रेखाटली आहे .त्यांच्या pregnancy announcment पासून डिलिव्हरी पर्यंत सगळं काही छान रेखाटलंय .

https://www.imdb.com/title/tt1586265/

Read More : प्रेग्नन्सी मध्ये कोणती पुस्तके वाचाल ??

आणखी काही honorable Mentions :

Friends ह्या मालिकेतील rachel ची pregnancy छान बघण्याजोगी गमतीशीर आणि तितकीच सिरीयस अशी छान रंगवली आहे .त्याचबरोबर pheobe ची surrogate प्रेग्नन्सी देखील छान रंगवली आहे .बघायला मस्त वाटतं .त्यातील गंमत आणि सिरीयस issues चांगले मांडले आहेत .

त्याचबरोबर बिग Bang थेअरी मधील bernedett ची प्रेग्नन्सी पण पाहायला मज्जा येते .

तेव्हा नक्की पाहा हे प्रेग्नन्सीमधील हलके फुलके विनोदी movie आणि तुमची प्रेग्नन्सी एन्जॉय करा.असेच आणखी काही shows ची लिस्ट ,नवीन माहिती आणि गमती जमती घेऊन मी येणार आहे .तुम्ही कोणते movies पहिले ते comment करायला विसरू नका.आणि वाचत राहा ‘आईपण ‘ .

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!