अंगाई मंगाई आणि आणखी काही गीतं My favourite Marathi lullabies

लहान बाळ म्हंटल कि त्याची अंगाई मंगाई आलीच. आणि खरंच त्याला झोपवायला देखील ती फार उपयोगी ठरते. आईच्या अंगाची उब आणि गाणं असं कॉम्बिनेशन असलं कि रडणारं बाळ देखील शांत होतं आणि झोपी जातंच.आपल्याकडे अशीच खुप गाणी प्रचलित आहेत. त्यातील अशीच काही गंमत म्हणून.. माझा अनुभव. ह्या गाण्यांवर माझं बाळ लगेच झोपी जातं असे. म्हणून तुमच्या सोबत share करत आहे.

1.अंगाई मंगाई
अंगाई मंगाई तान्हूल्या बाळाची अंगाई, जो जो रे तान्हूल्या बाळा.
ये गं तू गं गाई चरोनी भरोनी, तान्ह्या बाळास दूध देई
ये गं तू गं गाई वासराचे आई, तान्ह्या बाळास भूर नेई.

(हे गाणं पारंपरिक आहे. बऱ्याच आज्या गातात )

2.कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम

(हे माझं fav आहे. माझ्या बाळाच्या बारशाला मी पाळणा म्हणून गायले होते. आईने एखादं म्हणायचं असतं म्हणून. काळजी करू नका. बाळ झालं कि आईला आपोआप गळा फुटतो.)

3.निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई

(हे गाणं सगळ्यांनाच माहिती असेल.)

Read More : बाळाला झोपवायच्या tricks

4.मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला
इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावरी
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला

(हे गाणं खूप effective आहे. माझं बाळ हे youtube वर नुसतं ऐकवलं तरी लगेच झोपायचं. अर्थातच ते लतादीदींनी म्हटलेलं आहे.)

5.ये गं ये गं विठाबाई ।
माझे पंढरीचे आई ॥१

(ह्या दोन ओळी नुसत्या म्हटल्या तरी बाळ छान झोपी जातं.)

अजून बाळ sleeptrained होईस्तोवर ही कसरत आपल्याला करायची आहेच.अंगाई मुळे बाळ शांत होतं. त्याच्या मेंदूची देखील वाढ होते. आई मुलाचं नातं दृढ होतं. त्यामुळे हा देखील वेगळा आनंद आहे. घेऊन पाहा.तुम्हाला आवडलेली अंगाई गीत देखील कंमेंट बॉक्स मध्ये सांगा .तुमचा अनुभव सांगायला विसरू नका .

अशाच माहितीसाठी वाचत राहा आईपण!!आणि subscribe करायला विसरु नका!!

1 thought on “अंगाई मंगाई आणि आणखी काही गीतं My favourite Marathi lullabies”

  1. Pingback: 5 मराठी अंगाई गीत|Beautiful and Latest Marathi lullabies To Get Sleep Properly - palkatvainfo.com

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!