प्रेग्नन्सी मधील मिथ्या गोष्टी कोणत्या? कशावर विश्वास ठेवाल? Top Five Myths and Facts in Pregnancy

प्रेग्नन्सी दरम्यान आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो. आणि त्यातील कशावर विश्वास ठेवावा हे आपल्याला कळत नाही. अशाच काही myths and facts आपणासाठी.

1.Morning sickness हा केवळ सकाळीच असतो.

Morning sickness म्हणजे प्रेग्नन्सी दरम्यान बऱ्याचदा अन्न नीट न पचणे आणि उलटी होणे, वासाने मळमळणे, कोरडे उमासे येणे. पण जरी ह्याला morning sickness म्हणत असले तरी तो दिवसातून कधीही जाणवू शकतो किंवा दिवसभर असू शकतो. केवळ सकाळीच होतो असे नाही.

2. बाळाचे लिंग आईच्या पोटाच्या आकारावरून समजते.

बाळाचे gender म्हणजे लिंग हे ultrasound वर समजते. पण आपल्याकडे स्त्री भ्रूण हत्येमुळे ते सांगण्यास कायद्याने मनाई आहे जे की योग्यच आहे. पण म्हणून पोटाच्या आकारावरून ते किती मोठं आहे, खाली आहे का वर आहे ह्यावरून बाळाचं gender कळत नाही ह्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

3. प्रेग्नन्सी मध्ये व्यायाम व्यर्ज .

प्रेग्ननसीच्या ठराविक काळात गर्भावतीला जपणं गरजेचं आहे आणि बेडरेस्ट असेल तर काळजी घेणं गरजेचं आहे.पण इतर cases मध्येअजिबात हालचाल न करणं,चालायला न जाणं किंवा अजिबातच चलनवलन न ठेवणं चुकीचं आहे.

4. प्रेग्नन्सी मध्ये बायका सर्वाधिक खूष असतात.

हे देखील आपण ऐकतो. Tv वर पाहतो. बऱ्याच पुस्तकात वाचतो. पण प्रेग्नन्सी दरम्यान hormones हे अतिउच्च प्रमाणात कार्यरत असतात. त्यामुळे आपले moods बदलणं, morning sickness मधून जाणं, अधून मधून अंगदुखी होणं, शेवटच्या महिन्यातील जळजळ हे सगळं common आहे.

5.प्रेग्नन्सी मध्ये दोन जीवाचे खावे.

खरंतर प्रेग्नन्सीमध्ये उपवास करु नये.उपाशी राहू नये. आपल्या भुकेएवढं खावं. भूक मारू नये. पण बळेबळे दोन जीवांचे खावं ह्या समजेपायी अन्न पोटात ढकलू नये. आहार हा समतोल आणि पौष्टिक असावा ह्याची काळजी घ्यावी.

अशाच funny facts साठी वाचत राहा आईपण.

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!