सातव्या महिन्याचे बाळ कसे असेल??Marathi Guide to Newborn Baby Seventh Month

तुमचं बाळ आता सात महिन्याचं झालं म्हणजे बाळंतपणातून आता तुम्ही बऱ्या पैकी बाहेर पडला आहेत आणि आता तुम्ही तुमच्या बाळाचे खेळ ,त्याच्या लीला ,त्याच्या आणि घरच्या जवाबदाऱ्या चांगल्यापैकी पार पाडत आहात.मग कसे असेल तुमचे सातव्या महिन्यातील बाळ ??

आता बाळ देखील छान ऍक्टिव्ह झालं असेल ते रांगू लागेल किंवा रंगायचा प्रयत्न करू लागेल .पुढे चांगल्यापैकी सरकू लागेल .त्याचं त्याचं बसू पाहिलं .खेळणी पकडू पाहिलं किंवा पकडायला जाईल .कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेणं त्याला चांगलं जमेल .आणि त्याबरोबर गोष्टी तोंडात घालू पाहणं देखील त्याचं चालू होईल .आता जसं जसं दिवस जात राहतील ,डोळ्यात तेल घालून पाहणं तुमचं वाढतच जाईल .

पण त्याच्या ह्या बाळलीला तुम्हाला पाहायला आवडतील आणि त्याच्यासोबत खेळायला आता तुम्हाला आणखी मजा येईल .

त्याच्या वाढीचे milestones पाहू .

 • काही बाळं रांगू लागतील ,काहींना रांगण्यासाठी जरा आणखी वेळ लागेल .
 • आधाराशिवाय बसू लागतील .
 • बऱ्या पैकी दोन पायावर वजन तोलू लागतील .
 • आता ओळखीच्या चेहऱ्यांना पटकन ओळखतील .
 • चांगल्यापैकी लोळू शकतील .
 • डोळे आणि हाताचा उत्तम ताळमेळ बसवायचा प्रयत्न करतील .टाळी वाजवण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न तुम्हाला ह्या दिवसात दिसू लागेल .
 • बाळ तुमचे आवाज ऐकून त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल .

सातव्या महिन्यातील बाळाचा आहार:

जाणून घेऊया सातव्या महिन्यातील बाळ कसे असेल आणि त्याचा आहार साधारण काय असेल ??सातव्या महिन्यातील बाळ अजून अंगावर पीत असेल किंवा फॉर्मुला घेत असेल .त्याच्या त्या सवयी एक्दम बदलणार नाहीत .पण तरीही तुम्ही आता त्याला solid food म्हणजे वरचे अन्न नक्कीच आता देत असाल .साधारण ह्या दिवसात त्याचे प्रमाण दिवसातून तीन वेळा पर्यंत तुम्ही आणू शकता.कारण जसंजसं बाळ मोठं होईल त्याची पोषण आणि भूक वाढणारे .त्यामुळे येणाऱ्या दिवसांसाठी तुम्ही सवय केलेली चांगली .

चांगले ऑपशन्स कोणते आहेत ??

सर्वात उत्तम भाताची पेज ,खिमटी (नुसती मीठ साखरेशिवाय जर मीठ अजून देत नसाल तर),नाचणी सत्त्व (मार्केट मध्ये कुठेहि मिळतं पण मी पूर्णानंद आणि पुष्कर चं वापरलं होतं),फळांची प्युरी ह्यात सफरचंद ,केळी,चिकू व पपई हे पर्याय आहेत .( माझ्या मुलाला केळं आवडायचं नाही ,पपई आणि नंतर सफरचंद आम्ही द्यायचो .उष्ण -थंड ,हवामान आणि बाळाची प्रकृती ह्याचा विचार करून तुम्ही देऊ शकता ).भाज्यांमध्ये पालक आणि टोमॅटो सूप तुम्ही देऊ शकता .फक्त काळजी घ्या .कसं पचतं??पचतं कि नाही ह्याचा अंदाज घेत देणं योग्य .सुरुवातीला भरपूर नाही एखादी बशी ,किंवा छोटी वाटी इतकंच खाईल.मुलाच्या कलाकलाने घेणं योग्य ठरेल .रवा किंवा कणिक देताना शी कडक होऊ शकते त्यामुळे नीट विचार करून द्या .

Read More :बाळाला वरचं अन्न म्हणजे solid food कसे द्याल ??

बाळाची झोप :

सध्याच्या दिवसात सातव्या महिन्यातील बाळ साधारण १४ ते १५ तास झोपते .त्यातील ते ६ ते ११ तास रात्रीची झोप घेते आणि उरलेले तास दिवसातून दोन किंवा तीन nap मध्ये पूर्ण करते .काही बाळ रात्री सलग झोपतात काही बाळ प्यायला उठतील .तरीदेखील बाळाची रात्रीची झोप मोठी असली पाहिजे आणि दिवसां कमी ह्याकडे भर द्या .
जर दिवसां बाळ जास्त झोपत असेल तर रात्री नक्कीच झोपणार नाही हे साधं सोपं गणित आहे .पण त्यांच्या कलाकलाने घेत त्यांना रात्री झोपायची सवय ठेवा .
ह्या दिवसात बाळ teething मुले रात्री उठण्याची शक्यता असते .

Read More : सोप्या टिप्स बाळाचा teething चा त्रास कमी करण्यासाठी

बाळासोबत कोणते खेळ खेळाल ??

 • टाळ्या टाळ्या टाळ्या : सर्वात सोपा,लहान मुलांना आवडणारा आणि त्यांना हसवणारा खेळ ,जय बाप्पा करत किंवा विठ्ठल विठ्ठल करत बाळाला टाळ्या वाजवायला शिकवणं.सगळ्या मुलांना हा खेळ आवडतो.तुम्ही करून दाखवा .तुमचं अनुकरण करून पाहिलं .
 • बोर्ड बुक्स : रंगीत रंगीत चित्रांची पुस्तकं ,touch अँड फील बुक्स लहान बाळांना आवडतात .
 • cause and effect game : दही घ्या दही किंवा पडलं पडलं हे लहान बाळाचं आवडतं आहे .
 • प्ले मॅट: आवडती खेळणी पसरवून ठेवा ,नक्कीच घ्यायला पुढे सरसावेल .

अशाच माहिती साठी वाचत राहा आईपण !!! कंमेंट्स करायला विसरू नका !!

Reference : healthyChildren.org

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!