सखे तुझ्या माझ्या मनीचा श्रावण कसा ??

आषाढाची वारी झाली कि श्रावणाची चाहूल हि लागतेच .निसर्गही उत्सुक असतो ऊन पावसाचे रंग भरायला.आणि आपलं मनही खुलवत असता हिरव्या पिवळ्या कुरणांची स्वप्न.अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नकळत वेगळ्याच जोशात असतात .लहानग्यांना मध्येच पडणाऱ्या उन्हामुळे बाहेर खेळायला जायचा आनंद असतो,शाळेत जाताना पावसाचे चीक चीक कमी झालेली असते .आणि मोठ्यांना कामाच्या गर्ततेतून कुठंतरी वीकएंड वर फिरायला जावं असं वाटत असतं.कॉलेजच्या मुलामुलींचे भिजायला जायचे प्लॅन्स बनत असतात .आणि वृद्ध मंडळी धार्मिक व्रत वैकल्यात मग्न होण्याच्या खुशीत असते.बऱ्याच घरातील बायकांना मंगळागौर ,जिवती ,उपास तपास ह्याची हुरहूरदेखील असते.काही जणींकामाच्या वेढ्यात संस्कृती जपत मार्ग काढण्याच्या विचारात असतात .पण प्रत्येक जण श्रावण ह्या भावविश्वात मग्न असतो .

आपण सगळेच वेगवेगळ्या वातावरणातून येतो .वेगवेगळं आयुष्य आपल्या सगळ्याच जणींचं असतं .आणि वेगवेगळ्या वाटांची ओढ आपल्या सगळ्यांनाच असते .आजकालच्या पिढीचा सगळाच पसारा हा वेगळा आहे .आजकालचे lifestyle ,त्यातून आता कुठे जरासं आपण मागे टाकू लागलेलो covid लोकडाऊन,काहींना आवडणारे आणि काहींना नावडणारे workfromhome culture आणि आपलं अतिशय वेगाने बदललेलं डिजिटल जग ह्या सगळ्यात आपली पिढी अगदी मध्यस्थी आहे .ना आपण जुने ९ ते ५ च्या पिढीतील आहोत ना आपण पुढे येणाऱ्या सुपरफास्ट प्रगतीसाठी शंभर टक्के तयार आहोत .आणि जेव्हा तुम्ही कुठंतरी दोन्ही बदलांच्या मध्येच असतं तेव्हा तुमची ओढाताण सर्वात जास्त होते .असेच काही चालेंजेस आपल्या सध्याच्या लोकांचे म्हणा किंवा पिढीचे म्हणा आहेत .

तरी देखील आपण आपली वाट शोधात काही बदल जपत काही गोष्टी मागे ठेवत जातच असतो.अगदी श्रावणाचेच बघा ना ,पूर्वी श्रावण आला कि बायकांची सणवार ,व्रत वैकल्य ह्यात पुरती तारांबळ असायची .श्रावण आला कि आई काकू आपल्या वेगळ्याच तोऱ्यात .अर्थात त्यांची लगबग बघायला मजाही वाटायची आणि गोड दिंड पुरण खायला मिळायची ती वेगळीच .नागपंचमीचा सण नागोबा पेक्षा मला कल्पना साडी घालून शाळेत कसं जात येईल आणि नटता थटता येईल ह्याचाच विचार करण्यात जायचा.आणि रक्षाबंधनाला आपल्याला सर्वात मोठी राखी बांधताना काय भरून कॉलर टाईट होई ह्याचा विचार करण्यात जायचा.अर्थात लहानपणच ते .कशात आनंद शोधेल ते काय सांगता येणार नाही .आईचं भावविश्व सगळं नीट पार पडलं ह्यात भरून सुख पावे .आणि बहिणीचा शेतावर काका कधी भिजायला नेतो आणि कधी ओढ्यात भिजतो ह्यात.आजीला आपलं आमच्या वेळेस असं होतं बाई आणि आम्ही तसं केलं ह्या जुन्या आठवणीत भरून येई .पण स्त्री मन ते त्यामुळे प्रत्येकीचं भावविश्व वेगळं.पण वेगळं जरी असलं तरी सगळ्यानच्या मनात दाटून येतो तो श्रावण !!

त्यातून स्त्रीचं भावविश्व हे तर ऋतूंपेक्षाही सतत बदलणारे आणि भरून पावणारे.पण म्हणून ते उथळ आहे असं मुळीच नाही बरं का.ते हि तिच्या भावनांसारखे खोल आणि उद्दात आहे.पीरिअड्स ,पोस्टपार्टम,बाळंतपण ,प्रसूती ह्या सगळ्यातून जाताना कधी कधी नकोहि वाटतात ह्या सगळ्या भावना.पण ह्या भावनांशिवाय आपण अपूर्ण आहोत असंही वाटतं.बालपणीच्या अवखळपणातदेखील आनंद आहे आणि म्हातापरपणीच्या पोक्तपणात देखील.एखादी साडी नसते का आजीच्या पैठणीसारखी ,नवी कोरी असते तेव्हाही डौलदार आणि रुपेरी घडीची वाटते आणि जुनी होते तेव्हा भावनेचे कंगोरे मऊ झाल्यासारखी उबदार गोधडी होते तशीच.तसंच आहे सगळ्या स्त्रियांचं भावविश्व .प्रत्येक जण आपल्या वाटेवर काहींना काही तरी धडपडत चालतच असतो .कुणी लग्न संसारात असतात ,कुणी आई म्हणून मुलं जपत असतात ,कुणी नोकरी कर्तव्य पार पाडत असतात.कुणी बिनधास्त स्वतःच्या निर्णयावर स्वतःच स्वातंत्र्य जपत जगू पाहत असतात .पण म्हणून ह्या वेगळ्या त्या वेगळ्या असं थोडी ना ??शेवटी मऊ गोधडी ही सगळ्यांना खुणावतेच.

काही जणी श्रावणात संस्कृती जपतात ,काही जणी ट्रेकिंग,काहींना जिवती खुणावते ,काहींना निसर्ग.काहींना जुन्या आठवणी ,काहींना नवीन बदल .पण सगळ्यांना भिजवितो तो श्रावणच!!!

तुझ्या माझ्या मनीचा श्रावण श्रावण
वेगळा कि सारखा तूच तुझे जाण
ऊन पावसाच्या सरी तुझ्यावर नि माझ्यावर
तरी मनोमानातुनी फेर धरी जसा
सखे तुझ्या माझ्या मनीचा श्रावण असा !!!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!