सहाव्या महिन्यातील बाळ कसे असेल??Marathi Guide to Newborn Baby Sixth Month

aaipan.com:sixth month baby guide

Congrats!!!तुम्ही आता बऱ्यापैकी used to झाला आहात. बाळाचे पॅटर्न तुमच्या लक्षात आले असतील. त्याला कधी झोप लागते. कधी दुधू मागतो. आणि काय खेळायला आवडतं? कधी खुश असतो.. हे सारच तुम्हाला उमगायला लागलं असेल आणि सोपं झालं असेल.

बाळं देखील ह्या दिवसात आनंद छान व्यक्त करायला लागतात. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तरी ते तसं express करू लागतात. आणि त्यांची curiosity ही सगळ्या छोटया छोटया आसपासच्या गोष्टीं मध्ये दिसून येते.

त्याच्या शारीरिक हालचालींमध्येदेखील तुम्हाला छान बदल जाणवेल. आता बाळ थोडं मोठं झाल्यासारखं वाटेल. साधारण तुमचं आणि त्याचं timetable आता बसू लागलं असेल. आणि जरी अजून तसं बसलं नसेल तरी काळजी करू नका. काही दिवसात तुम्हाला सगळं उमजू लागेल .

त्याच्या वाढीचे milestones पाहू

 • तुमचं बाळ आता खेळताना, तुमच्याशी बोलताना नीट लक्ष देऊन पाहतं हे तुम्हाला जाणवू लागेल.
 • Support घेऊन किंवा सपोर्ट शिवाय देखील आता बसू लागेल
 • हातांचा चांगला वापर आता करू पाहिल.
 • हळू हळू गोष्टीचा स्पर्श आणि चव पाहण्यासाठी त्या तोंडात घेऊ पाहील.
 • हळू हळू तोंडातून काहीतरी बडबडल्यासारखा आवाज करू पाहील
 • आडवं असताना पुढे सरकू पाहिल.
 • पायावर वजन तोलू पाहील.
 • थोडंसं दोन हातावर पायावर मागे पुढे करू पाहील.
 • एका हातातून वस्तू दुसऱ्या हातात फिरवू लागेल.
 • वस्तूंची नावं ओळखू शकेल.

काळजी करू नका, तुमचं बाळ काही गोष्टी लवकर करेल, काही उशीरा त्यामुळे थोडा धीर धरा. बघा तुमचा चिमुकला कसा पटकन सगळं करू लागतो.

बाळाची झोप :ह्या दिवसात बाळ रात्रीचे पूर्ण वेळ झोपू लागेल. जर तुम्ही त्याचे bedtime routine सेट केले नसेल तर आता its high time, तुम्ही ते लवकर केले पाहिजे. म्हणजे मुलं रात्रीची नीट झोप घ्यायला लागतील. पुढे अवघड जाणार नाही.तुम्ही माझं बाळाचे bedtime routine कसे सेट कराल?? ह्यावरील पोस्ट वाचा.

आहार :बाळाच्या पोषणच्या गरजा आईच्या दुधातून किंवा फॉर्मुला मधून पूर्ण होतील तरी देखील त्याला वरचं अन्न द्यायला सुरुवात करायला घ्या. वरचं अन्न कसं द्याल ह्यावर माझं पोस्ट वाचा.

यातील बाळाशी कोणते खेळ खेळालं??

 • खुळखुळा :त्याच्या हातात आता एखादा खुळखुळा देऊन पाहा. तो ह्या हातातून त्या हातात करत त्याची मजा पाहील.
 • दही घ्या दही :तुमच्या किंवा त्याच्या डोक्यावर छोटं खेळणं ठेवून, पडलंपडलं करा. खळखळून हसेल.
 • अडगुळं, मडगुळं :आता पाठीला चांगला सपोर्ट आल्याने मांडीवर बसवून अडगुळ मडगुळं म्हणत, किंवा डोल बाई डोळाची म्हणत डोलवा. बाळाला खूप मज्जा येईल.
 • Playmat :त्यावर रंगीबेरंगी आकार पाहत सरकू लागेल.
 • Boardbooks :मांडीवर बसवून चित्रांची पुस्तकं दाखवत गोष्ट सांगा. Amazon वर अशी touch and feel पण मिळतात.

अशाच माहितीसाठी आणि गमती जमतीसाठी वाचत राहा आईपण!!!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!