बाळाला सुवर्णसिद्धजल कसे द्याल??Marathi Guide to make suvarnasiddhajal

साधारण पाहिले सहा महीने बाळ अंगावरचे दूध पिते.त्याला तेव्हा वरचे पाणी लगेच लागत नाही. पण हळु हळु बाळ मोठे होयला लागेल तसं आपण त्याला पाणी पाजायला सुरुवात करतो.

आता आपल्याकडे सुवर्णप्राशन चा संस्कार करतात. बाळ जन्माला येते तेव्हादेखील मधात 24 कॅरेटचे वापरात नसेलेले वळे मधात वळसे घेऊन बाळाच्या जिभेला चाटवतात.ज्याने कसलीही बाळास बाधा होत नाही असं सांगितलं जातं.

नंतरदेखील दर महीन्याच्या ठराविक दिवशी आयुर्वेदिक डॉक्टर सुवर्णप्राशनासाठीची पावडर देतात जी मधात बुडवून बाळाला चाटवतात. आयुर्वेदात ह्यांचे भरपूर फायदे आहेत. सोन्यामुळे बाळाची बुद्धी तीक्ष्ण होते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

सुवर्णसिद्धजल

Read More : बाळाला वरचा आहार कसा द्याल ?

आता वरील गोष्टी शक्य नसतील तर काय कराल??

ह्यावर आम्ही सुवर्णसिद्धजल हा उपाय काढला.सगळ्यांना माहिती आहे कि बाळाला पाजवायचे पाणी हे आपण उकळून देतो. साधारण दहा मिनिटे उकळी आलेले पाणी डॉक्टर द्यावंयास सांगतात. तेव्हा आम्ही पाणी उकळताना त्यात सोन्याचे 1 gram चे वळे टाकून आणखी दहा मिनिटे पाणी जास्त उकळतो.पाणी साधारण दिवसभर पुरेल इतके घ्यावे.त्यामुळे पाणी सुवर्णसिद्ध होते. आणि असे पाणी थंड करुन दिवसभर बाळाला जेव्हा लागेल तेव्हा देणे चांगले.

सुवर्णसिद्धजल देण्याचे फायदे काय ??

  • बाळाची बुद्धी तल्लख होते .
  • त्याच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते .
  • बाळाचे आरोग्य सुधारते .

Note:पाण्यात घालायचे वळे वापरात नसलेले आणि वेगळे स्वच्छ ठेवा.

सुरुवातीला पाणी पचायला हलके होण्याच्या दृष्टीने पहिले काही महिने त्यात चिमूटभर ओवा किंवा वावडींग घालू शकता. मी ओवा घालत असे.

अशाच माहितीसाठी वाचत राहा आईपण!!!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!