बाळाला दात येत आहेत का?? | Simple teething tips for Indian parents

खुप दिवसापासून ह्या वर लिहायचं ठरवलं होतं. कारण माझ्या बाळाच्या बाबतीत जी एक गोष्ट मला हॅन्डल करायला tough गेली ती म्हणजे त्याची teething phase.बऱ्याच आयांना ही गोष्ट जाणवत असेल. एरवी जे मूल अतिशय खुशालचेंडू असतं ते मध्येच एकदम कुरकुरं चिडचिडं होयला लागतं. आणि असं झालं की आपल्याला नक्की काय होतंय हे कळत नाही. आपण गॅस आहेत का पाहतो, पोट दुखतय का बघतो. सगळं ठीक असतं पण मूल मात्र मध्येच चिडतं कधी रडतं देखील. अशावेळेस जर ते हातात येईल ते तोंडात चावायला पाहत असेल तर तुमचं मूल हे teething phase मधून जात आहे.म्हणजे त्याला दात येऊ पाहतायेत.अशावेळेस त्याला हिरड्यांची हुळहुळ थोडी त्रास देते आणि ते सारखं काहीतरी तोंडात चावायला पाहतं आणि त्यातून त्याचं नीट समाधान नाही झालं तर ते चिडचिड करतं.तुमच्याही बाळाला दात येत आहेत का ??

दात येणं अगदी साधं सोपं वाटतं तसं नाही .काही मुलं खूप त्रास देतात ,काहींना कधी आले ते नाही कळत.दात सळसळतात ,हिरड्या सुजतात किंवा डोकंही दुखतं मग अर्थातच मूल चिडचिड करतं.बरेचदा नीट खात पीत नाही .त्रास देतं खूप .बिचारं,त्यालाही त्रास होतच असतो .पण हि एक natural प्रोसेस आहे .त्याला कोण बदलणार ??ती तर होणारच .पण मूल रडायला लागलं,चिडचिडे झालं कि आईला रहावत नाहीच .तिला त्याचा त्रास होतोच .मग ह्यावर काही उपाय आहेत का ???
हो नक्कीच आहेत .त्यांना होणार त्रास आपण नक्कीच कमी करू शकतो ,त्यासाठीची काळजी घेऊ शकतो आणि मग हळूहळू हि phase हि निघून जाते .मग नक्कीच वाचा हे पोस्ट पूर्ण !!!

आता साधारण ह्याची सुरुवात कधी पासून होते??|When does teething start in babies??

साधारण 6व्या महिन्यापासून बाळाचे पहिले दात येतात पण कधी कधी ह्याची सुरुवात अगदी 4थ्या महिन्यापासून सुद्धा होऊ शकते. काही मुलांना लवकर दात येतात काहींना उशीरा पण साधारण खाली दिलेल्या चार्ट नुसार त्यांचे दात येण्याची सुरुवात असू शकते.

तुमच्याही बाळाला दात येत आहेत का ??

दात येण्याची लक्षणे काय असु शकतात | Common teething symptoms

  • चावणं /biting :सतत तोंडात येईल ते चाववंसं वाटतं. कोणतीही वस्तू तोंडात घालून मुलं चावताना दिसतात. कधी कधी कडेवर असल्यास आपले खांदे पण चावायला पाहतात. Its normal. दात येताना हिरड्या शिवशिवत असल्याने त्यांच्याकडून तसं होतं.
  • खाणं न घेणं /refusal to feed :हे पण खूप common आहे. ह्या दिवसात कधी कधी मुलं नीट खात पित नाही. किंवा खायला त्रास देतात.पण म्हणून घाबरून जायचं कारण नाही. त्यांचा peak period ओसरला की ते परत नीट खायला प्यायला लागतील.
  • तोंडातून लाळ गळते /drooling : दात येताना साधारण तोंडातून खूप लाळ गळते. आणि बरेचदा ती गालावर पसरून त्याच्यातून गालावर लाल लाल rash दिसू शकतात. त्यामुळे त्याचे तोंड,गाल स्वच्छ रुमालने पुसले तर तसं होणार नाही.
  • ह्या व्यतिरिक्त रडणं, रात्री झोपेत वेळीअवेळी जागं होणं, चिडचिड हे सगळं common आहे.

आपल्याकडे बाळाला ताप येणं, जुलाब होणं हे देखील दात येताना होतं असं बायका सांगतात. पण त्याचा संबंध सरळ दातांशी नसून बाळ वाटेल ते तोंडात ह्या दिवसात घालतं त्यामुळे इन्फेकशनमुळे ह्या गोष्टी घडतात. तेव्हा त्याच्या आसपासचा परिसर, खेळणी हे सगळं स्वच्छ ठेवलं तर असं फारसं होणार नाही.

Read More : बाळाच्या सर्दीवर घरगुती उपाय : बाळाच्या सर्दीने हैराण झाला असाल ??तर नक्कीच वाचा हे आर्टिकल खास तुमच्यासाठी.अगदी साधे आणि सोपे घरगुती उपाय ज्याने सर्दीला पटकन अराम मिळेल आणि बाळ परत हसरं खेळतं होईल .

बाळाला दात येत आहेत का ??मग ह्यावर उपाय काय ?? | Five simple tips to ease teething pain

  • Chilled teether( रिंगणे ):हा एक प्रभावी उपाय आहे. बाळाचं teether जर फ्रिज मध्ये ठेवून ( फ्रीझर मध्ये नाही )थोडंसं गार करुन त्याला चावायला दिलं तर त्याला आराम मिळतो. बाळ थोडं मोठं असेल तर teether ऐवजी तुम्ही गाजर किंवा मुळा स्वच्छ धुवून, थोडा गार करुन त्याला चावायला देऊ शकता. त्याला बरं वाटेल. लक्षात ठेवा त्याला तोंडात धरायला द्यायच्या गोष्टी स्वच्छ धुवून (teether असेल तर डेटॉल नी )देत जा. म्हणजे infection होणार नाही.
  • मसाज :हलक्या हाताने बाळाच्या हिरड्यांना वरून मसाज केला तरी त्याला बरं वाटेल. तेल लावताना सुद्धा एरवी तुम्ही ओठावरून तोंडात बोटं न घालता करु शकता. थोडंसं कानाच्या खाली जिथून जबड्याची सुरुवात होते तिथेही हलक्या हाताने बोटांनी चोळून मसाज करु शकता.आणि डोक्याला कानशिलावर मसाज केला की देखील त्याला आराम मिळतो.
  • डीकेमाली :आपल्याकडे आयुर्वेदिक औषधलयात ही पावडर मिळते. ती वस्त्राने गाळून घ्यावी. आणि रात्री झोपताना बाळाच्या हिरडयांवर चोळून लावली तरी बाळाला बरं वाटतं. फक्त तुमचे हात स्वच्छ असतील ह्याची दक्षता घ्या. फक्त त्याची चव बाळास नावडू शकते.
  • Dentonic :बाजारात ह्या होमिओपॅथीच्या गोळ्या मिळतात.बरेच पेरेंट्स त्या देतात आणि काहींना त्याचा फायदाही होतो. सो हा तुमचा निर्णय आहे. Normally डॉक्टर त्या लिहून देत नाहीत.
  • Infant Paracetomol :माझ्या मुलाच्या डॉक्टरांनी खूपच रडत असेल, त्याला त्रास होत असेल. तर क्वचित कधीतरी दिलं तर चालेल असं सांगितलं होतं. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. फक्त शक्यतो अशी सवय नको.

माझा स्वतःचा अनुभव म्हणाल तर teething हे कॉमन आहे. त्याचा थोडाफार त्रास हा बाळांना होतोच. काही मुलांचे कधी दात आले हे कळतही नाही आणि काहींच्या बाबतीत ते प्रकर्षाने जाणवतं. हे सगळं कॉमन आहे. फार फार तर parents म्हणून आपण काय करु शकतो तर त्याचा त्रास कमी करू शकतो. त्यासाठी chilled teether हा सर्वात योग्य आणि प्रभावी उपाय आहे. सो बाकी कोणत्या गोष्टीकडे वळण्यापूर्वी त्या try करुन पाहा.दात येतानाचे देखील पीरिअड्स असतात. पीक चालु असेल तर बाळ थोडं जास्त त्रास देईल पण तो तेवढ्यापुरताच असतो. तो निघून गेला की बाळ देखील पाहिल्यासारखं नॉर्मल होतं.हळूहळू मुलांनादेखील त्याची सवय होते. आणि पेरेंट्सना देखील.तेव्हा फार काळजी करण्यासारखे काहीच नाही.

तुम्हाला अशीच बेबी care संबंधित संपूर्ण माहिती वाचायची असल्यास तुम्ही आईपण.कॉम वरचे बाळाची निगा ह्या संबंधित संपूर्ण page visit करू शकता .ज्यात बाळाच्या शु शी diaper पासून ते बाळाला अंगावरून कसे सोडवाल पर्यंत आणि बाळाच्या कॉलिक पासून त्याला वरचा आहार काय द्याल इथपर्यंत सगळं काही सापडेल .एका आईचा अनुभव इतर मॉम्स साठी .तर ह्या page ला visit द्यायला नक्कीच विसरू नका .बाळाच्या संदर्भात सगळी गाईड्स सापडतील तुम्हाला ह्या page वर .अगदी सहज आणि सोप्या भाषेत सगळ्या प्रॅक्टिकल टिप्स कोणत्याही हायफनडू गोष्टींशिवाय .तर वाचायला विसरू नका .खासकरून new मॉम्स साठी.

बाळाची निगा संपूर्ण गाईडस : Baby Care/बाळाची निगा – आईपण (aaipan.com)

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!!!!

reference : Teething in Babies: Symptoms and Remedies (webmd.com)

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!