Thanks for joining me!!!आईपण काय असतं हे बरंच ऐकलं होतं.. आईकडून, कथाकवितातून, इतरांकडून.. पण अनुभवताना त्याची खोली लक्षात आली..त्याचा अनुभव सांगावासा वाटला की जेणेकरून इतरांना त्याचा थोडाफार फायदा होईल.आई होण्याच्या पहिल्या गोड बातमीपासून प्रत्यक्षात आई झाल्यावर अनुभवलेल्या गोष्टींना कुठेतरी शब्दरूप मिळावं. आई ही नुसती आई नसून ती एक जिवंत अनुभव आहे बऱ्याच गोष्टींचा.त्यातील प्रत्येक गोष्ट शब्दात मांडणं कधीच शक्य नाही तरीही त्यातील व्यवस्थापन, शिस्त अशा गोष्टी इतरांसमोर मांडाव्यात ज्याचा त्यांच्या नवीन प्रवासात फायदा होईल..अशा सगळ्याच जणींसाठी ज्याना आईपण खूप सोपं वाटतं किंवा खूप अवघड वाटतं.आणि अशा आज्यांसाठी ज्यांना मुली सुनांचं बाळंतपण येऊ घातलं आहे.. तुमचा अनुभव नक्कीच मोठा आहे पण त्यात माझा थोडासा हातभार.
माझ्या आईस समर्पित….