तिसऱ्या महिन्याचे बाळ कसे असेल?

आता तुमचं बाळ तिनं महिन्याचं झालं असेल. व जसे जसे दिवस जातील तसा त्याचा alertness, बाहेरील जगाचा awareness तुम्हाला वाढताना दिसेल. तुम्हाला तुमचं बाळ छान खुलून हसतं. हे लक्षात येईल. तुमचा चेहरा टिपतं. नुसतं टिपतच नाही तर ओळखतं हे जाणवेल. आणि आता त्याला अंगावर पाजण्यात, त्याची काळजी घेण्यात आणि त्याला सांभाळण्यात तुम्ही चांगल्यापैकी expert झाला असाल. पूर्वी बापरे ह्या डायपर बदलण्याच्या भानगडीपासून त्याला अंघोळ घालण्यापर्यंत आपणास जमणार का? असे पडणारे प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण आता आपण व्यवस्थित करतोय हा confidance तुम्हाला आला असेल. आणि बाळ ते तर रोज दिवसांगाणिक मोठं होतच आहे. पण महीन्या महिन्यांनी त्यातील फरक तुम्हाला जाणवेल.

तर बघुयात तिसऱ्या महिन्यातील बाळ कसं असेल?

आता साधारण तुमचं बाळ 90 अंशात त्याचं डोकं उचलू शकतं. त्याला चांगल्या प्रकारे डोक्यावर नियंत्रण येण्यासाठी दिवसातून काही मिनिटे तुमच्या देखरेखी खाली पोटावर ठेवू शकता.त्यामुळे त्याला मान उचलायला मदत होईल व व्यायाम मिळेल.

आता ते हळूहळू कुशीवर होयला शिकेल किंवा तसा प्रयत्न करताना दिसेल. हळूहळू पालथे पडण्याकडे त्याचा कल असेल.

आता तुम्ही त्याला play gym किंवा activity mat वर ठेवू शकता. आणि डोक्यावर त्याला पाहता येतील. अशी खेळणी अडकवू शकता. पाळण्यावर देखील असलेलं चिमणाळं किंवा फिरणारं भिरभिरं ते enjoy करु शकेल. त्याला आसपासचे shapes बघायला फार आवडतील. मला आठवतंय माझं बाळ खिडकीचे पडदे, त्याच्यावर पडणाऱ्या रेषा आणि त्यातून जाणवणारा प्रकाश बराच वेळ न्याहाळायचं.

बाळाचे झोपेचे पॅटर्न develope होत असतील. पूर्वीचं कधीही जागणं आणि कधीही झोपणं हळूहळू कमी होयला लागेल. ह्या दिवसात तुम्ही हळुहळु त्याचं bedtime routine सेट करु शकता जेणेकरून ते रात्रीची झोप शांत घेईल. पण अजून ते लहान असल्याने दूध प्यायला मात्र उठेल.

Bedtime routine वर मी आधी एक post share केलेलं आहे ते वाचू शकता.

👉https://aaipan.family.blog/2020/10/02/how-to-put-baby-to-sleep/

अशाच माहितीसाठी वाचत राहा आईपण.!!!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!