जगातील प्रत्येक स्त्री साठी बाळा चे आगमन आणि तिचे आईपण हे लक्षणीय अध्याय आहेत. हे अनुभव घेत असताना त्या बरोबर येणारे आर्थिक गणितही ते कुटूंब आखत असते. त्या मधील महत्वाचे पाऊल म्हणजे Maternity Insurance.
Maternity insurance मध्ये pregnancy दरम्यान झालेले एका ठराविक रकमे पर्यंत चे सगळे खर्च कव्हर होतात.
भारतात ही संकल्पना नवीन आहे आणि maternity health insurance असा इन्शुरन्स बहुधा फारसा मिळतं नसला तरी बऱ्याच विमा कंपन्या ही सुविधा आपल्या इतर पॉलिसी मध्ये उपलब्ध करून देतात.
त्यापैकी आम्ही विचार करून ठेवलेले ऑपशन्स खालील प्रमाणे :
SBI GENERAL AAROGYA PREMIERE
ह्या पॉलिसी मध्ये maternity expenses कव्हर होतात.. बाकी इन्शुरन्स च्या तुलनेत ह्याचा waiting period हा सगळ्यात कमी म्हणजे 9 महिने आहे. ह्याचा अर्थ डिलिव्हरी 9महिन्यांचा waiting period संपल्यावर झाली कि त्या संबंधी चे सगळे खर्च इन्शुरन्स कंपनी कव्हर करते.
TATA AIG MEDICARE PREMIERE
ह्या अंतर्गत 50000/- पर्यंत चा खर्च (मुलगा ) आणि 60000/- पर्यंत चा खर्च (मुलगी ) इन्शुरन्स कंपनी करते.
माझ्या माहिती नुसार Waiting period- 4 वर्ष असतो ..
RELIGARE HEALTH INSURANCE
ह्या पॉलिसी अंतर्गत जास्तीत जास्त 1,00,000/- पर्यंत चा maternity खर्च कव्हर केला जातो. ह्या कंपनी चा waiting period हा देखील 4 वर्ष आहे.
ह्या व्यतिरिक्त Max Bupa, Star Health, Bharati Axa, Bajaj Allianze Health Guard Gold Family Floater हे पर्याय पण तुम्ही विचारात घेऊ शकता.
Read More: प्रेग्नन्सी आणि financial planning
महत्वाची गोष्ट:
Maternity benefit हे पॉलिसी विकत घेताना च घ्यायचे असतात. जर तुम्ही already प्रेग्नन्ट असाल तर pre-existing condition च्या अंतर्गत ते ग्राह्य धरले जातं नाही.
ह्या कंपन्या hospitalization आणि त्या दरम्यान चे खर्च कव्हर करतात. OPD EXPENSES ( डॉक्टर VISITS ) ह्या मध्ये ग्राह्य धरले जातं नाहीत.
*वरील सर्व माहिती ही अभ्यास आणि अनुभवाच्या आधारे दिलेली आहे. आम्ही कोणत्या ही कंपनी चे promotion करत नाही.आपण स्वतः कंपनी च्या customer care कडे चौकशी करून मग च निर्णय घ्यावा.
This post is written by Shweta Vaidya who is successfully working in finance field for last 10 years as share broker.
Reference Links :
SBI General Insurance :: Arogya Plus
Health Insurance Plans | Buy Medical Insurance Online | Tata AIG