1. खुळखुळे:लहान बाळांना रंग आणि आवाज ह्याचं फार आकर्षण असतं. खासकरुन वर्षाच्या आतील बाळांना. तेव्हा खुळखुळा म्हणजे rattlers हे त्यांच्यासाठी अतिशय आवडीचं खेळणं आहे. सुरुवातीला त्यांना ते बघायला, ते फिरेल तसं नजर फिरवायला, आवाज ऐकायला, कानोसा घ्यायला मग काही महिन्यांनी ते हातात पकडायला देखील पाहतात. किंवा त्यातून आवाज काढायला आवडतं.


2. चिमणाळ:पाळण्यावर लावलेलं, गोल गोल फिरणारं चिमणाळं हा देखील आवडता खेळ आहे. ते वाजतं आणि त्यातून आवाजही येतो.पडून बघायला त्यांना फार आवडतं.


3. Playgym:साधारण तिसऱ्या चौथ्या महिन्यात तुम्ही बाळाला play gym असलेल्या mat मिळतात, त्यावर ठेवू शकता. पडून लटकवलेली खेळणी पकडायला आणि पाहायला त्यांना फार आवडतात.


4. वाजणारे पिक पिके:हा देखील त्यांचा आवडता खेळ आहे. रंगीबेरंगी खेळणी पाहायला आणि वाजवायला त्यांना फार आवडतात.


5. Dancingduck/dancing dog:बटन दाबलं कि नाचणारं बदक आणि कुत्रा माझ्या मुलाचं आवडतं खेळणं होतं. त्याला भरवताना एकीकडे चालु केलं कि तो पाहत खात असे.


6.tower:थोडं बसायला लागला कि ते रिंग घालता येणारे टॉवर्स किंवा रंगीबेरंगी tins एकमेकांवर ठेवणं हा देखील त्यांचा आवडता खेळ आहे. त्यांना लगेच बनवता नाहीच येणार. पण पाहायला आणि उडवायला नक्की आवडेल.


7. Radio:वेगवेगळी गाणी म्हणणारा खेळण्यातील रेडिओ माझ्या मुलाचा आवडता आहे. हळु हळु तो त्याच्यावरील buttons दाबायला शिकला. कोणतं दाबलं कि कसा वेगळा आवाज येतो. ह्याची त्याला गंमत वाटायला लागली
8. वाजवणारे माकड :किल्ली दिली कि झांजा वाजवणारे माकड.हे देखील लहान बाळाचे favourite असते.
अशाच माहितीसाठी वाचत राहा आईपण!!!
Amazon वर वरील खेळणी उपलब्ध :
डाँसिन्ग डक :https://amzn.to/35MpCc8
खुळखुळे :https://amzn.to/3d1XTrF
चिमणाळं :https://amzn.to/3wU8eOC
Playgym:https://amzn.to/3j1a9N7
वाजणारे पीक पिके :https://amzn.to/3qrKGOE
Tower:https://amzn.to/3xFdfdy
Radio:https://amzn.to/3vUgUmt
झांजा वाजवणारे माकड :https://amzn.to/3zPec55