दोन महिन्याचे बाळ कसे असेल??

आता तुमचं बाळ साधारण दोन महिन्याचं झालं असेल. त्याला बाहेरच्या जगाची जाणीव होईल. इतरांकडे बघावं त्यांना हुंकार द्यावेत असं थोडं थोडं त्याला वाटायला लागेल तेव्हा त्याची झोप थोडी कमी होईल. आणि त्याला आता जागं राहून आसपास पाहावंसं वाटेल.तर बघुयात कसं असेल दोन महिन्याचं बाळ आणि त्याच्याबरोबर काय activities कराल??

Developement :ह्या काळात साधारण मुलींचे वजन 11.3 pounds आणि मुलांचे 12.3 pounds असते. त्याच्या उंची 22.5 इंचेस मुलींसाठी तर 23 इंचेस मुलांसाठी अशा असतात. पण लक्षात ठेवा सतत अशा तुलना करु नका कारण प्रत्येक बाळाची वाढ ही वेगळी असते आणि स्वस्थ बाळंदेखील वेगवेगळ्या वजनाची आणि उंचीची असू शकतात. त्यामुळे बाळाच्या डॉक्टरांकडे असणाऱ्या उंची आणि वजन पत्रकावर आपल्या बाळाच्या वाढीचा दर हा सहज वाढत आहे ह्यावर केवळ लक्ष देणे गरजेचं आहे.

Developement milestones :

  • ह्या काळात बाळ त्याची नजर हळूहळू स्थिरावू शकेल. ते 180 डिग्रीच्या कोनात नजर वळवू शकेल. त्याच्या समोरील हलणाऱ्या वस्तू नजर वळवून पाहू शकेल. त्याला आता केवळ black आणि white च नाही तर वेगवेगळ्या रंगाचे complex patterns देखील कळतात. तेव्हा गंमत म्हणून किंवा तुमच्या बाळासाठी खेळ म्हणून तुम्ही त्याचे colorful खुळखुळे त्याच्या नजरच्या टप्प्यात ठेवून हळूहळू फिरवून पाहा. त्याला फार आवडेल आणि खेळणं जसंजसं फिरेल तसंतसं त्याला नजर वळवायला मज्जा येईल.
  • बाळाला तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय हे पाहायला ऐकायला खूप आवडतं. तुमचा स्पर्श आवडतो. आईचा चेहरा आवडतो. त्यामुळे तुम्ही जे काय बोलताय त्याला हुंकार द्यायला त्याला खूप आवडेल. ते cooing करु पाहिलं. थोडासा आवाज काढेल. त्याला तुम्हाला मज्जा येईल.
  • आता बाळ हळूहळू हसू लागेल. तुमच्याकडे पाहून. तुम्हाला खूप छान वाटेल. त्याचे पाय थोडेथोडे सरळ होयला लागतील. त्याला त्याचे हात कसे हलवायचे हे थोडंसं कळेल. त्याच्या हालचालीत हळूहळू स्पष्टता यायला लागेल आणि तुम्हालाच आठवड्यानुसार हा फरक जाणवेल. कदाचित तो बोटं चोखायला पाहिल. जेव्हा तुम्ही पोटावर ठेवाल तेव्हा मान सरळ वर करण्याकडे त्याचा कल असेल. अंघोळ घालणाऱ्या बाई तुम्हाला सांगतीलच. फक्त थोडावेळ आणि तुमच्या observation खाली त्याला पोटावर ठेवत जा.

दात येण्याची शक्यता :बाळाला ह्या दिवसात दात येण्याची सुरुवात होण्याची शक्यता असते.

बाळाची शी :फॉर्मुला पिणाऱ्या बाळांना दिवसातून दोनदा तर स्तनपान करणाऱ्या बाळांनादेखील दिवसातून दोनदा किंवा 4 ते 5 दिवसातून शी होऊ शकते.

अशाच माहितीसाठी वाचत राहा आईपण!!!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!