जाणून घ्या गर्भवती महिलांसाठी सरकारी योजना कोणत्या ???| Know about government scheme for Pregnant ladies in Marathi???

government scheme for Pregnant ladies in Marathi

आपल्याकडे गर्भवती स्त्रियांसाठी काही निवडक योजना सरकार देखील राबवत असते .ह्याचा उद्देश असा असतो कि गर्भवती स्त्रियांना पोषक आहार आणि सर्व तपासणीस सहाय्य्य मिळावं,त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यामुळे होणारं मूलदेखील निरोगी आणि सुदृढ होईल . So want to know about government scheme for Pregnant ladies in Marathi???

आपल्याकडे प्रेग्नन्सी दरम्यान बऱ्याच सरकारी योजना कार्यरत आहे.खरंतर सरकारी काम म्हणजे दिरंगाईचें किंवा कागदोपत्री दाखवणारे अशी सर्वसामान्य समजूत .पण प्रेग्नन्सी दरम्यान हॉस्पिटल मध्ये सांगितली जाणारी प्रधानमंत्री मातृत्व योजना ह्या सगळ्याला अपवाद आहे ह्याची खात्री पटली.अर्ज केल्यानंतर काही महिन्यात खरंच पैसे जमा होतात .आणि बाळ झाल्यावर उरलेले संपूर्ण पैसे खात्यात येतात .ह्या योजनेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हि योजना सर्व जातीय आणि सर्व आर्थिक स्तरीय महिलांसाठी खुली आहे .अशा अनेक योजना गरजू महिलांसाठी आपलं सरकार राबवित आहे .पण आपल्याकडे वाईट म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारे आधार कार्ड मात्र सगळ्या महिलांकडे उपलब्ध नसल्याने गरजू स्त्रियांपर्यंत ती पोहोचत नाही .

आईपण च्या माध्यमातून सगळ्या महिलांना ह्याबद्दल माहिती करून देणं आणि जागृती करणं हे मी माझं देणं समजते त्यामुळे हे खास पोस्ट त्यासाठी .संपूर्ण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे .तुमच्या शंका ,प्रतिक्रिया कंमेंट करायला विसरू नका .”आपले सरकार,आपली योजना ,आपलं हक्क !!”

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र | PMMVY

साधारण हि योजना देशात सगळीकडे कार्यरत आहे . आपल्याकडील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील बऱ्याच गर्भवती स्त्रियांना संपूर्ण प्रेग्नन्सी किंवा बाळ जन्मल्यावर देखील मजुरी किंवा शारीरिक कष्टाची कामे करावी लागतात.तेव्हा अशा गर्भवती महिला आणि माता ह्यांना योग्य पोषण न मिळाल्याने त्यांच्या व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊं शकतो .त्यामुळे देशाच्या मातामृत्यू आणि बालमृत्यू दरात वाढ होते .

गर्भवती मातेस योग्य पोषक आहार न मिळाल्यास ,गर्भावर त्याचा परिणाम होऊ शकतो .बऱ्याच स्त्रियांना गरजेपोटी कष्टाची कामे करावी लागतात.घरात देखील त्यांना खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष संभवते.बऱ्याचदा प्रेग्नन्सी दरम्यान अनेक टेस्ट देखील कराव्या लागतात .आणि त्यांचा खर्च देखील खूप असतो .अशा बऱ्याच गोष्टींसाठी ह्या आर्थिक लाभाची महिलांना सहाय्यता होऊ शकते .

त्यामुळे १ जानेवारी २०१७ पासून केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात लागू केलेली दिसून येते .ह्या योजने मुले गर्भवती महिला आणि स्तनदा माता ह्यांना सकस आहार मिळावा व त्यांचे आरोग्य सुधारून बालमृत्यू दर कमी व्हावे ह्या साठी हि योजना राबवली जाते .

हि योजना थोडक्यात समजावून घेऊयात .

ह्याचा लाभ नक्की कोणाला ?? | Who is eligible for PMMVY??

पहिल्या अपत्यावेळेस प्रेग्नन्ट असणाऱ्या गर्भवतींना आणि स्तनदा मातांना ह्याचा लाभ घेता येतो .

लाभ नक्की काय आणि कसा दिला जातो ?? | How Money is given under PMMVY??

योजनेच्या अंतर्गत लाभाची रक्कम थेट DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते . सरकार खालील हप्त्यांमध्ये रक्कम भरते .

पहिला हप्ता: गर्भधारणेच्या नोंदणीच्या वेळी 2000 रुपये
दुसरा हप्ता: 2000 रुपये, जर लाभार्थीने गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर किमान एक जन्मपूर्व तपासणी केली असेल.
तिसरा हप्ता :2000 रुपये, जेव्हा मुलाच्या जन्माची नोंदणी केली जाते आणि मुलाने बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटीस-बीसह पहिली लस सायकल चालू करतात तेव्हा जमा होतो .

Read More : प्रेग्नन्सी दरम्यान financial प्लॅनिंग कसे कराल ?

संपूर्ण प्रेग्नन्सी साठीचे financial guide इन मराठी .अगदी प्रेग्नन्सी टेस्ट पासून ,डिलिव्हरी आणि बाळंतपणाचा खर्च ,त्यासाठी कशापद्धतीने savings आणि कोणते पर्याय उपलब्ध ह्याचे संपूर्ण माहितीपत्रक जरूर वाचा .

ह्या योजनेस कोण पात्र नाहीत ?? | Who is not eligible for PMMVY?

वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.

योजनेचा लाभ कसा मिळेल?? | How to get benefit of PMMVY??

पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे.लाभासाठी महिलेचे व तिच्या पतीचे सहमती पत्रे, दोघांचीही आधार संबंधित माहिती (आधार) आणि लाभार्थी महिलेचे आधार संलग्न बँक खाते अथवा पोस्ट खाते क्रमांक तसेच तिचे / पतीचे / कुटुंबातील सदस्याचा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी :

PMMVY | Ministry of Women & Child Development (wcd.nic.in)

इथे मला आवर्जून सांगावेसे वाटते ते म्हणजे आधारकार्ड हि आपली गरज आहे .आणि बँकेत तुमच्या नावावर अकाउंट हे देखील खूप गरजेचे आहे .ह्या दोन्ही गोष्टींमुळे तुमचे काम सोपे होणार आहे आणि केवळ ह्याच नाही तर अन्य सरकारी योजनांसाठी तुम्ही एलिजिबल होणार आहात .तेव्हा तत्परतेने आधार कार्ड काढून घ्या .

आधारकार्ड कसे काढाल ह्याबद्दल माहिती खालील लिंक वर चांगल्या प्रकारे मांडलेली आहे ,गरज पडल्यास जरूर वाचा .

click the link : आधार कार्ड कसे काढाल ह्याची महाराष्ट्र टाइम्स वरील संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए) | PMSMA

गरोदर स्त्रियांसाठी २०१६ पासून हि एक नवीन योजना राबविण्यास सुरुवात झाली .ह्या योजने अंतर्गत माता आणि शिशु मृत्युदर कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे .

ह्या अभियानाचा लाभ काय ?? | योजनेचा लाभ कसा मिळेल?? | What is the benefit of PMSMA?

हा कार्यक्रम अशा सर्व गरोदर महिलांपर्यंत पोहोचण्याचे काम करतो ज्या गर्भावस्थेच्या २ आणि ३ ट्राइमेस्टर मध्ये आहेत. पीएमएसएमए योजनेनुसार सर्व सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रावर प्रत्यके महिन्याच्या ९ तारखेला सर्व गर्भवती महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते .

योजनेसाठी पात्र कोण ?? | Who is eligible for PMSMA??

हि योजना फक्त गरोदर महिलांसाठी लागू आहे.गर्भावस्थाच्या ३ ते ६ महिन्याच्या दरम्यान महिला या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घेण्यास पात्र राहतील .खासकरून ग्रामीण भागात गर्भवती महिलांना या मोफत आरोग्य देखभाल मिळवण्यासाठी प्रेरित केले जाईल.

अधिक माहिती साठी:

https://pmsma.nhp.gov.in/

तुम्ही instagram वर देखील ह्या बद्दल संपूर्ण माहिती सांगणारे पत्रक वाचू शकतात किंवा ह्या योजनतेशी निगडित माहिती घेऊ शकता .

मी स्वतः ह्या PMMVY योजनेचा लाभ घेतला असून मी माझा अनुभव प्रत्यक्ष मांडत आहे .आपल्याकडे अशा सरकारी सेवेत रुजू असणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत ज्या चांगलं काम करण्याचा प्रयत्न देखील करतात.अशाच सरकारी इस्पितळातील nurse ताई ,त्यादिवशी तपासणीस येणाऱ्या प्रत्येक महिलेस ह्या योजनेची माहिती करून देत होत्या .सगळ्या बायकांना तिचा कुठेतरी फायदा व्हावा अशी तिची मनापासून तळमळ होती .बरेचदा आपण सुशिक्षित असूनही आपल्याला त्याची माहिती नसते किंवा आपलं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो म्हणून आपण अशा योजनांना मुकतो आणि बरेचदा आधार कार्ड सारखे महत्वाचे document अजूनही सर्व लोकांकडे उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही .
त्यामुळे जागृत व्हा ,सगळ्यांसोबत हि माहिती उपलब्ध करा आणि योजनेचा लाभ घ्या .

आपल्यापैकी सर्व जणींना ह्या योजना माहिती असणे आणि त्या गरोदर गरजू महिलांपर्यंत पोहोचवणे नक्कीच आपण करू शकतो ,जेणे करून जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेऊ शकतात आणि त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.अगदी घरी कामाला येणाऱ्या मावशी पासून ते शेजारीण ,नातेवाईक,प्रेग्नन्सीसाठी नोकरीतून ब्रेक घेतलेल्या मैत्रिणी ह्या सर्वांपर्यंत हि माहिती आपण नक्कीच पोहोचवू शकतो ,जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना ह्या योजनेचा फायदा घेता येईल .
अशाच नवनवीन माहितीसाठी वाचत राहा आईपण !!!आणि तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करायला विसरू नका !!! तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर follow करू शकतात .तुमचे प्रश्न मला लिहून ई-मेल देखील करू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा.

माझा ई-मेल id आहे पुढीलप्रमाणे आहे : aaipanblog2@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!