Maternity Insurance घेताना काय विचार कराल ??All about Maternity Insurance

aaipan.com:maternity insurance

आपण आई होणार हे कळल्यावर आपल्याला खूप आनंद होतो तसं थोडं दडपण देखील येतं.नवीन जीवाची चाहूल खूप आनंदायक असते तितकीच काळजी वाढविणारी असते.आता पूर्वी सारखं जग नाही .जिथे आपल्यातील बरेच जण केवळ ७ रुपये ह्या वार्षिक शुल्कावर दहावी पर्यंत शिकले (आणि पुढं जाऊन नाम रोशन पण केले बरं का!!) तिथे आता नर्सरी पासूनच इंजिनीरिंग च्या फी प्रमाणे तयारी ठेवावी लागत्ये आईबापाला .अर्थात हि वास्तविकता आहे मी घाबरवत नाहीये तुम्हाला पण मग आपल्याला खेळी देखील जरा तयारीनिशीच हाताळावी लागेल नाही का ??
मग ह्यातील पाहिलं पाऊल म्हणजे मॅटर्निटी इन्शुरन्स प्लॅन !!!!

लक्षात घ्या ,जेव्हा आपलं वय वाढत जातं तेव्हा प्रेग्नन्सी मधील काही गोष्टी बदलतात ,complications वाढू शकतात .
एरवी देखील प्रेग्नन्ट झाल्याच्या पहिल्या दिवसापासून खर्च चालू होतो.त्यासाठी देखील एक आई म्हणून आपण विचार करून ठेवणं गरजेचं आहे .लक्षात ठेवा प्लांनिंग केलं कि सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात.मग मॅटर्निटी इन्शुरन्स चे प्लांनिंग करताना काय विचार कराल ???किंवा कशा पद्धतीने कराल हे प्लांनिंग ???

साधारण अशा policy बद्दल आपणास पडणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे .| Common questions asked about such policy and its answers

साधारण अशा maternity insurance plans च्या policy बद्दल आपल्याला काय कॉमन प्रश्न मनात येतात ते पाहू आणि त्याची उत्तरे समजावून घेऊ .

Maternity insurance म्हणजे काय ?? | What is Maternity Insurance

सर्वात प्रथम मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे समजून घेऊ.हि अशा प्रकारची insurance policy असते जी प्रेग्नन्सी मधील डिलिव्हरी आणि त्यानंतरचा काही काळापर्यंतचा खर्च कव्हर करते.काही पोलिसी prenatal म्हणजे बाळाच्या जन्माआधीच्या काही अँपॉईंटमेंट्स आणि टेस्ट देखील कव्हर करतात पण अशा पोलिसी फार कमी आहेत .

stand alone पोलिसी म्हणजे केवळ प्रेग्नन्सी साठी ची policy असते किंवा तुमच्या हेअल्थ इन्शुरन्स साठी add on मॅटर्निटी कव्हर आपण जास्तीचे प्रीमियम देऊन घेऊ शकतो .

आता सोप्या भाषेत सांगायचं झालं कि जशाप्रकारे आपण हेअल्थ इन्शुरन्स घेतो कि जर आपल्यावर कोणते शस्त्रक्रिया किंवा तत्सम उपचार करावे लागले तर त्याचा होणारा खर्च जसा आपण दर महा किंवा दर वार्षिक रक्कम भरून तरतूद करून ठेवतो ,त्याचप्रमाणे मॅटर्निटी इन्शुरन्स मध्ये एक ठराविक रक्कम भरून आपल्या प्रेग्नन्सी मध्ये पडणाऱ्या खासकरून डिलिव्हरी साठीच्या खर्चाची तरतूद करता येते .अशा विविध कंपन्यांच्या पोलिसी असतात .त्यासाठी त्या दर वर्षाला साधारण एक रक्कम आपल्याकडून घेतात त्याला प्रीमियम असं म्हणतात .

तुम्ही प्रेग्नन्ट असाल तर तुम्हाला हेअल्थ इन्शुरन्स मिळेल का ?? | Can you apply for health insurance if you are already pregnant ??

ह्याबद्दल तुम्ही फार वेळ दवडू नका .ह्याचे कारण असे कि waiting period शिवाय maternity insurance मिळवणे कठीण आहे .अशा पोलिसी फार उपलब्ध नाहीत आणि साधारण आपल्याला ३ ते ४ वर्षे मॅटर्निटी coverage वापरात आणण्यासाठी थांबावे लागते.त्यामुळे जेवढा उशीर कराल मॅटर्निटी coverage घेण्यासाठी तेवढे तूम्हाला benefit मिळवण्यासाठी थांबावे लागणार आहे .

प्रत्येक किंवा बहुतांश पोलिसी ह्या एक ठराविक काळाचा waiting period ठरवतात .म्हणजे मी ह्या वर्षी पासून पोलिसी घेतली आणि लगेच प्रेग्नन्ट राहिले तर मला पोलिसी बेनेफिट देईल असे नाही .मी पोलिसी घेऊन तिचा waiting पिरियड पूर्ण केल्यावर प्रेग्नन्ट राहिले असल्यासच मला त्याचा फायदा घेता येतो .जो पर्यंत waiting पिरियड संपत नाही तोपर्यंत केवळ प्रीमियम भरावे लागते .waiting पिरियड संपल्यावर आपल्याला पोलिसी चा लाभ घेता येतो .

हेअल्थ इन्शुरन्स करता प्रेग्नन्सी हि pre-existing कंडिशन समजली जाते का ??|Is Pregnancy treated as pre-existing condition for insurance??

बऱ्याच संस्था ह्या तुम्ही already प्रेग्नन्ट असाल तर maternity insurance देत नाहीत .कारण बऱ्याच संस्था pregnancy हि pre existing कंडिशन समजतात आणि पोलिसी कव्हर मध्ये त्याचा समावेश करत नाहीत .

Read More: प्रेग्नन्सी आणि financial planning

प्रेग्नन्सी दरम्यान होणाऱ्या टेस्ट पासून ,डिलिव्हरी आणि त्यानंतर बाळंतपण आणि मुलाच्या भविष्याची तरतूद कशी कराल?? ह्याबद्दल detailed गाईड वाचा वरील लिंक वर .तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील अगदी साध्या आणि सोप्या भाषेत व सखोल स्वरूपात.

Maternity insurance मध्ये कुठल्या गोष्टींच्या खर्चाचा समावेश असतो ?? | What is Covered in Maternity insurance??

maternity insurance तुमच्या डिलिव्हरीमधील काही पूर्व निश्चित केलेल्या ठराविक मर्यादेपर्यंतचा खर्च पूर्ण करते .नॉर्मल आणि C-section अर्थात सीझर ह्या दोन्ही प्रकारच्या डिलिव्हरी साठी coverage मिळते .काही इन्शुरन्स पोलिसी prenatal म्हणजे डिलिव्हरी आधीचा आणि postnatal म्हणजे डिलिव्हरी नंतरचा खर्च आणि नवीनच जन्मलेल्या बाळाचे coverage काही विशिष्ट रक्कमेपर्यंत समाविष्ट करतात .अर्थात आपण जशी पोलिसी घेऊ तसा फायदा आपल्याला मिळतो .

मॅटर्निटी इन्शुरन्स कसा calculate करतात ?? | How maternity insurance is calculated

मॅटर्निटी इन्शुरन्स चे प्रीमियम हे regular health insurance पेक्षा नक्कीच जास्त असते .साधारण मॅटर्निटी इन्शुरन्स हा निश्चित पणे claim केला जातो .त्यामुळे मॅटर्निटी इन्शुरन्स देणारे ह्या इन्शुरन्स साठी जास्त प्रीमियम घेतात .हे coverage खरेदी करताना तुम्ही वेगवेगळ्या प्लॅन्स चा अभ्यास करून त्याचे cost benefit analysis करणे खूप गरजेचे आहे .

ह्याचा नक्की कितपत फायदा होतो ??? | Is it really beneficial ??

आधी ह्याचा फायदा समजून घेण्यापूर्वी आपल्याकडे डिलिव्हरीचा खर्च किती येतो ते समजावून घेऊयात .

डिलिव्हरी खर्च :हा साधारण मॅटर्निटी हॉस्पिटल व डॉक्टर्स नुसार बदलू शकतो तरी साधारण अंदाज.

नॉर्मल डिलीव्हरी :₹25000 – ₹75,000

सिझेरियन डिलीव्हरी :₹40,000-₹2,00,000

आता अर्थात तुमच्याकडे एखाद्या चांगल्या कंपनीचा मॅटर्निटी इन्शुरन्स प्लॅन असेल तर ह्यातील किमान ७५ टक्के खर्च आपल्याला इन्शुरन्स कंपनी देते.काही पोलिसी ह्या पेक्षा जास्त क्लेम भरून देतात .तेव्हा तुमचा ह्यात नक्कीच फायदा आहे .

ह्याला पर्याय काय ?? | What is other option ??

हा खर्च कव्हर करण्यासाठी आणखी एक ऑपशन म्हणजे employer group insurance. बऱ्याच कंपनीमध्ये तशी policy असते. व त्यातून तुमचा साधारण 50 ते 75 टक्के खर्च निघू शकतो. बरेच एम्प्लॉयर्स हि सुविधा देतात .

माझा अनुभव काय ??
माझ्या प्रेग्नन्सी मध्ये नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने ४२००० इतका खर्च झाला त्यातील ३५००० रुपये employee ग्रुप इन्शुरन्स मधून मिळाले .

लक्षात ठेवा जसं तुमचं वय वाढत जाईल तसं मॅटर्निटी इन्शुरन्सचे प्रीमियम देखील वाढत जाते .त्यामुळे वेळच्या वेळीच निर्णय घ्या.

जेवढं प्लांनिंग चांगलं कराल तेवढा नक्कीच फायदा होईल !!!!!!!!!!!! So all the best !!!

लक्षात ठेवा तुम्ही आई होणार आहात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचादेखील विचार करणं तुम्हास गरजेचे आहे. आणि बाळाच्या बाबांप्रमाणे तुमचा देखील ह्यात active role असणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही सगळ्या दृष्टिकोनातून विचार कराल तेवढा तुम्हालादेखील फायदाच होईल.

तुम्हाला माझा blog जर आवडला असेल तर follow करायला विसरु नका. Notifications साठी खालील follow बटण वर click करा आणि तुमचा फक्त email id द्या. किंवा तुम्ही मला ट्विटर वर देखील follow करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या माहितीसाठी आणि माझे अनुभव आपण disscuss करणार आहोत.

तुम्हाला पडणारे प्रश्न आणि प्रतिक्रिया मला कळवा.तुम्ही त्या कंमेंट च्या माध्यमातून किंवा कॉन्टॅक्ट page वरून देखील कळवू शकतात .तुमच्या कडे अन्य माहिती उपलब्ध असल्यास ,ती देखील तुम्ही मला कळवू शकता .माझा ब्लॉग वाचत राहा आणि प्रतिक्रिया कळवत राहा .

अशाच माहितीसाठी वाचत राहा आईपण !!!!

Reference site :

Three Financial Aspects To Consider When Expecting A Baby (outlookindia.com)

5 Things to Know About Maternity Insurance in India (hdfcergo.com)

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!