About Me

नमस्कार!!welcome to आईपण!!

माझं नाव निकिता. आणि मी 25th January 2020 मध्ये एका गोंडस छोटया बाळाची आई बनले आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या. पूर्वीची carefree मुलगी आता छोटया छोटया गोष्टींची काळजी घेऊ लागली. स्वच्छता, शिस्त व नियोजन ह्यात थोडेफार बदल होऊ लागले. आणि आपण प्रेग्नन्ट आहोत हे कळल्यापासून डिलीव्हरी आणि त्यानंतर विवानला मोठं करताना एका इमोशनल रोलर कोस्टर राईड मधून गेले.आणि रोज नवीन अनुभव घेतच आहे.आणि जे आई लहानपणी म्हणायची आई झालं की कळेल ते खरंच कळलं.

हा अनुभव मला तुमच्या सगळ्यांसोबत share करावासा वाटतो. आईपण हा नुसता प्रवास नाही हा एक दृष्टिकोन आहे गोष्टींकडे बघण्याचा. जो आई झालं की आपोआपच गवसतो. तोच आपण इथे शब्दात मांडत आहोत ज्यातून तुम्हालादेखील उपयोग होईल.

सो अशाच काही टिप्स, गमती जमती आणि माहितीसाठी वाचत राहा आईपण!!!

Dedicated to माझ्या आईस आणि जगातील सर्व आईंना…

Nikita Vaidya Kotnis

Connect With Us..

error: Content is protected !!