Contact

We would love to hear from you!!Feel free to say "hello"!!!
तुम्हाला काही प्रश्न असतील ,फीडबॅक कळवायचा असेल आणखी काही नवी माहिती जाणून घ्यायची असेल तर संपर्क साधा.

SAY HI!!!

aaipanblog2@gmail.com

Stay Connected
Send A Message

  Nikita Vaidya Kotnis

  Parenting Blogger

  About Me

  नमस्कार!!welcome to आईपण!!

  माझं नाव निकिता.माझा जन्म रायगड मधील कर्जत ह्या गावी झाला.दहावीपर्यंतच शिक्षण मी कर्जतमधूनच पूर्ण केलं.मग पुण्यातील एस .पी कॉलेज मध्ये science शाखेत प्रवेश घेतला .त्यानंतर MSc in Computer Science पर्यंतच शिक्षण पुण्यात झालं.नंतर lectureship  करत मी SET परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि लग्न झाल्यानंतर lectureship करत असताना मला दिवस गेले.

  आणि मी 25th January 2020 मध्ये एका गोंडस छोटया बाळाची आई बनले आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या. पूर्वीची carefree मुलगी आता छोटया छोटया गोष्टींची काळजी घेऊ लागली. स्वच्छता, शिस्त व नियोजन ह्यात थोडेफार बदल होऊ लागले. आणि आपण प्रेग्नन्ट आहोत हे कळल्यापासून डिलीव्हरी आणि त्यानंतर विवानला मोठं करताना एका इमोशनल रोलर कोस्टर राईड मधून गेले.आणि रोज नवीन अनुभव घेतच आहे. जे आई लहानपणी म्हणायची आई झालं की कळेल ते खरंच कळलं.

  हा अनुभव मला तुमच्या सगळ्यांसोबत share करावासा वाटतो. आईपण हा नुसता प्रवास नाही हा एक दृष्टिकोन आहे गोष्टींकडे बघण्याचा. जो आई झालं की आपोआपच गवसतो. तोच आपण इथे शब्दात मांडत आहोत ज्यातून तुम्हालादेखील उपयोग होईल.

  सो अशाच काही टिप्स, गमती जमती आणि माहितीसाठी वाचत राहा आईपण!!!

  Dedicated to माझ्या आईस आणि जगातील सर्व आईंना…

  About आईपण aaipan.com

  मी आई झाल्यानंतर किंवा प्रेग्नन्सी दरम्यान बऱ्याच गोष्टीबद्दल मला नव्याने जाणीव झाली. अगदी सिनेमा, कादंबऱ्यामध्ये दाखवल्या  जाणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्षातील अनुभव किती वेगळे आहेत ह्याचा मला अनुभव येऊ लागला. पूर्वी काय स्वयंपाकाबाबतीत जसं वाटायचं की कितीजणं करतात, फार थोडीना rocket science आहे  तसंच जमून येईल parenting आपोआप. निभवून नेऊ आईपण आपण असंच वाटायचं. पण प्रत्यक्ष पाण्यात पडल्यावर हे दिसतं त्यापेक्षा नक्कीच खुप खोल आहे ह्याची जाणीव झाली. अगदी breastfeeding ला सुरुवात केल्यावर ट्रेन मध्ये इतर बायका जेवढ्या सहजपणे पाजताना दिसतात तितकं हे आज पहिल्यांदा तरी सहज नक्कीच वाटत नाहीये ह्याचा अनुभव आला. रात्रंभर टाके दुखत असताना मी विवानला लावत होते आणि त्याला ते नेमकं ओढणं म्हणावं तसं जमत नव्हतं. आमच्या दोघांचीही कसोटीच लागत होती. बरं त्याला लावलं नसतं तर पान्हा ही फुटणार नाही त्यामुळे ते करणंही तितकंच गरजेचं आहे हे जाणवत होतं. आई सतत “असं घे ,असं धर “हे सांगत होती पण ह्या सगळ्याची आधी थोडी practice असती तर किती  बरं झालं असतं  असच  त्या रात्री मनात कितीदा आलं . मग इथूनच माहिती शोधायला सुरुवात झाली

   

  बरं आपल्याकडे Antenatal classes वैगरे फार मोठया प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशी माहिती मिळवण्यासाठी कमी sources आहेत. त्यातील डॉक्टर्स हा पर्याय खात्रीशीर असला तरी त्यांना वेळेचं नक्कीच बंधन आहे. त्यातून आपल्याला पडणारे अगदी बारीक सारीक प्रश्न आपण नक्कीच त्यांना विचारू शकत नाही. (त्यांना रोजचेच असल्याने फालतू वाटू शकतात )अनुभवी स्त्रिया ह्या कॅटेगरी मध्ये बऱ्याच जणी असल्या तरीआता आम्हाला होऊन बरेच दिवस झाले बाई, तेव्हा ओघात ते होऊन गेलंअसं सांगणाऱ्या बऱ्याच असतात. मग एकच हक्काचा आधार म्हणजे internet. त्यावर ह्या विषयावरील blogs ची कमतरता नाही. पण त्यातील बरेच foreign based.काही गोष्टी त्यात उत्तम explained आहेत पण काही आपल्या कडील परिस्थितीला suitable नाहीत किंवा आपल्यासाठी त्या तितक्या प्रॅक्टिकल नाहीत असं जाणवलं.

  मग ज्या result oriented वाटल्या त्या कुठे तरी note केल्या. काही आज्यांनी सांगितलेले घरगुती उपाय आणि पद्धती देखील उपयुक्त वाटले ते पण note केले गेले. काही tricks स्वतः हुन शोधल्या गेल्या आणि उपयोगातही आल्या त्या पण note झाल्या. मग मनात आलं आपण कुठल्या तरी माध्यमावर ह्या इतरांसाठी share केल्या पाहिजेत म्हणजे त्यांना सोपं होईल.आपल्याकडील आजींनी सांगितलेल्या पारंपरिक गोष्टी देखील फायदेशीर आहेत .त्या पण फक्त त्यांच्याच नातीपर्यंत मर्यादित नको राहिल्या. कुठेतरी सगळ्यांना समजल्या पाहिजेत किंवा preserve ही झाल्या पाहिजेत.

  त्यातून जन्म झाला आईपण aaipan.com चा. मग इंटरनेट वर ह्या विषयावरील माहितीचं भांडार जरी असलं तरी त्यातील आपल्या सारख्या मुलींसाठी फायदेशीर ठरलेली , sorted आणि अतिशय प्रॅक्टिकल वाटणारी माहिती आपण सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवावी ह्या उद्देशाने blog पोस्ट लिहायला सुरुवात केली.आणि वर्षभरात स्वतः domain purchase करून aaipan.com ची नवीन मराठी वेबसाईट उभी केली जेणेकरून सगळ्यांना तिचा access सुलभ असावा. Parenting च्या प्रत्येक phase साठी dedicated पेज आणि त्या विषयावरील मला पडलेले प्रश्न, त्याची मी शोधलेली उत्तरे आणि मला प्रॅक्टिकल वाटलेले सोपे उपाय, माझे अनुभव, आईपण जोपासताना कराव्या लागणाऱ्या गोष्टी, आपल्या संस्कृतीमधील पारंपरिक वळण आणि आजीचे घरगुती उपाय हे सारं काही मांडायला सुरुवात केली. अशी माहिती जिचा single moms ना,नोकरीसाठी परगावी राहत एकट्याने सांभाळणाऱ्या आयांना, एरवीसुद्धा ज्यांचा पहिला अनुभव आहे त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच फायद्याची ठरेल.

  तेव्हा ह्या माझ्या initiative ला तुमचा प्रतिसाद मिळावा, आणि तुम्हाला पडणारे प्रश्न, तुमचे अनुभव देखील माझ्यासोबत share करावे की जे इथेही आपण मांडू शकू हे ह्या initiative साठी माझे goals आहेत. सगळया new moms साठी आईपण हे एक help guide ठरावं आणि त्यांना ते जवळचं वाटावं असा माझा प्रयत्न राहिल .

  error: Content is protected !!