आईपण सोपं करूयात

 One stop for all practical help about pregnancy,postpartum and child care in marathi for new moms.

आम्ही तुमच्या मदतीसाठीच आहोत.जाणून घ्या प्रेग्नन्सी,बाळंतपण आणि पालकत्वाबद्दल…गरोदारपणातील माहिती ,बाळंतपणाची तयारी ,स्तनपान गाईड आणि बाळाची काळजी साध्या सरळ सोप्या शब्दात आणि प्रॅक्टिकल टिप्स .

Nikita

Parenting Blogger

Making Motherhood easy for all new moms

पहिल्यांदा आई होताना बरेच प्रश्न पडतात .अगदी प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ?पासून, गरोदरपणातील आहार ,व्यायाम ,डिलिव्हरी नंतर घ्यावयाची काळजी,प्रसूती कळा ,स्तनपान कसे करावे? ,नवजात बाळाची काळजी आणि नंतर त्याला वाढवताना कराव्या लागणाऱ्या 
गोष्टी.

आज्यांना देखील पहिल्यांदा बाळंतपण करण्याची वेळ असेल तर बरेच प्रश्न पडतात. बाळंतपणाची तयारी ,बाळंतिणीचा आहार ,बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय ??.घरात कोणी मोठं सांगणारे नसेल तर मग बऱ्याच मावशी ,काकवांना फोन होतात.परत आजकाल बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत जसेकी diper पासूनच घ्या ना.परत एकट्याने सांभाळणाऱ्या new moms ची तर
कसरतच  असते .

ह्या सगळ्यांसाठी एक Help Guide आहे आईपण .

आईपण हा एक मराठी प्रेग्नन्सी आणि पॅरेंटिंग blog आहे.माझ्या प्रेग्नन्सी नोट्स ,बाळंतपणातील अनुभव, बाळाला मोठं करताना मला पडलेले प्रश्न आणि त्याची मी शोधलेली उत्तरे हे सर्व काही माझ्या सारख्या new moms सोबत share करत आहे जेणेकरून त्यांना शून्यातून सुरु करावं लागणार नाही आणि नक्कीच ह्याचा त्यांच्या पॅरेंटिंग साठी फायदा होईल  व  त्यांची motherhood  journey सोपी होईल. 

 

 

Featured Articles

You can start with our popular posts. A lot of people find these posts useful.

बाळ बाळंतीण मालीश, शेक शेगडी आणि बरच काही indian massage for newborn and mom:बाळाचं मालीश

आईच्या अंगलावणीप्रमाणे बाळाची अंगलावणीदेखील महत्वाची आहे. खरंतर ह्या आपल्याकडे चालत आलेल्या पारंपरिक पद्धती आहेत. बाळाला जेवढे चांगलं मालिश व धुरी मिळेल तेवढे ते सुदृढ आणि निरोगी राहील. त्याची चांगली वाढ होइल. आणि त्याचे आरोग्य नीट जोपासले जाईल.

प्रेग्नन्सी आणि धार्मिक आचरण

पल्याकडे सगळ्याच गोष्टींना अनुसरून त्यानुसार वळण पडावं ह्यादृष्टीने एक संस्कृती पूर्वापार बनलेली आहे.

ह्यातील काही गोष्टी काळानुसार वेगळ्या असतील तरीही काही गोष्टींना थोडेफार शास्त्रीय संदर्भ आहेत. तशाच काही गोष्टी आपल्या प्रेग्नन्सीशी देखील निगडित आहेत. अर्थातच त्यातील कोणत्या गोष्टी पाळवायच्या व कोणत्या नाही हे संपूर्णतः तुमच्या आस्थेवर अवलंबून आहे. आणि ह्यातील काही गोष्टी तुमच्या घरातील कुळाचारानुसार थोड्याफार बदलू शकतात तरीदेखील त्यातील काही संदर्भ द्यावेसे वाटतात.

प्रेग्नेंसी आणि आचरण: आहार Simple Pregnancy Diet

तुम्ही प्रेग्नन्ट आहात ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पण कदाचित तुम्ही काळजीतदेखील असाल की मी माझं पथ्य नीट पाळते आहे ना? माझ्याकडून काही चुकीचं नाही होत ना?सगळं नीट होईल ना?