आईपण Suggests: प्रेग्नन्सीमध्ये कोणती पुस्तके वाचाल? Which Marathi Books are good to read in Pregnancy??

This article covers which books to read during pregnancy?? गरोदरपणात कोणती पुस्तके वाचाल??| garodarpanat konti pustake vachal??

प्रेग्नन्सीमध्ये मन प्रसन्न ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे छान पुस्तकं कथा, कांदंबऱ्या वाचण्यास बरेच लोकं सांगतात. हा प्रेग्नन्ट बाईच्या मानसिक स्वास्थ जपण्याचा सोपा उपाय आहे आणि असं म्हणतात त्यानी गर्भावर चांगले संस्कारदेखील होतात.

Table of content

पुस्तक वाचनाचे फायदे विशेषतः गरोदरपणात (pregnancy during book reading) अधिक महत्त्वाचे ठरतात — मानसिक, भावनिक आणि बौद्धिक स्तरावर. खाली काही महत्त्वाचे फायदे दिले आहेत:


📚 गरोदरपणात पुस्तक वाचनाचे फायदे:

1. मानसिक शांतता व तणावमुक्ती:

  • चांगली पुस्तकं वाचल्याने मन शांत राहतं.
  • तणाव व भीती कमी होते, जे गर्भासाठी देखील फायदेशीर ठरतं.

2. सकारात्मक विचारसरणी:

  • प्रेरणादायी व आत्मशोधात्मक पुस्तकं मनाला उभारी देतात.
  • बाळावर सकारात्मक विचारांचे संस्कार होतात.

3. बौद्धिक विकास आणि कल्पनाशक्ती वाढते:

  • कथा-कादंबऱ्यांमुळे कल्पनाशक्ती समृद्ध होते.
  • भाषा कौशल्य आणि शब्दसंपदा वाढते.

4. भावनिक स्थिरता:

  • नात्यांवरील पुस्तकं वाचल्यामुळे भावनिक समज वाढते.
  • आईपणासाठी आवश्यक असलेली भावनिक तयारी होते.

5. गर्भावर होणारे प्रभाव:

  • संशोधनानुसार, आई शांत व आनंदी असेल तर बाळ अधिक स्वस्थ व भावनिकदृष्ट्या सुरक्षित जन्म घेतं.
  • काही संस्कृतिक मान्यतेनुसार वाचनातून चांगले संस्कार गर्भावर होतात.

6. स्वतःसाठी वेळ (Me-Time):

  • गरोदरपणात वाचन हा ‘स्वतःला समजून घेण्याचा व सुधारण्याचा’ एक सुंदर मार्ग असतो.

ह्यासाठी मी काही पुस्तकांचे reviews तुमच्यासोबत share करत आहे. वाचून पहा.

मनाला उभारी देणारी ‘Must-Read’ पुस्तकांची यादी

ही कांदबरी कर्ण ह्या महाभारतातील व्यक्तिरेखेवर आधारित आहे. कर्णाचे जीवन, त्याच्या डोळ्यातून पाहिलेलं जग, त्याची वीरता, महाभारतातील युद्धातील साहस आणि दानशूरता, मित्रप्रेम ह्या गोष्टी ह्यात जवळून पहायला मिळतात. वास्तविक सूर्यपुत्र असून वाट्यास आलेलं खडतर जीवन आणि त्यातही त्याने जपलेलं त्याचं अस्तित्व भाव खाऊन जातं. ज्यांना कर्ण आवडतो त्यांना तर प्रश्नच नाही पण ज्यांना तो माहित नाही त्यांना देखील त्याचा पराक्रम अपूर्व वाटेल. तेव्हा हे पुस्तकं वाचायला हरकत नाही. तुम्हाला होणार बाळं मुलगी असो वा मुलगा, दोघांना ते नक्की आवडेल. ज्यांना महाभारत आवडतं त्यांनी नक्की try करुन पहा.

ही कांदबरी श्रीकृष्णावर आधारित आहे. आपल्याकडे पूर्वी प्रेग्ग्नन्ट बायकांना ‘हरिविजय’ वाचण्यास सांगायचे. त्यात कृष्णाच्या पराक्रम कथा आहेत. ह्या पुस्तकात श्रीकृष्णाचे संपूर्ण आयुष्यचं लेखकाने आपल्यासमोर मांडलंय.साक्षात दैवी गुण असून माणूस म्हणून वाट्याला आलेली सुखदुःख, त्याच्यापलीकडे जाऊन प्रसंगांना सामोरे जाण्याची त्याची भूमिका,आणि संपूर्ण महाभारत घडवून आपण त्यातून अलिप्त राहणं ह्या सगळ्याच गोष्टी मनाला भावतात. देव म्हणून जन्माला आला तरी सुख दुःखाचे प्रसंग त्याला ही चुकत नाहीत आणि म्हणूनच त्याने सांगितलेलं गीतेचं तत्वज्ञान. सारंच खूप सुंदर लिहिलंय. जेवढा कृष्ण दैवी वाटतो तितकाच एक माणूस म्हणून अपल्याला आवडतो. एक बालक, युवक, सवंगडी,भाऊ, पुत्र, सखा,पती, पिता आणि नेता ह्या रूपात एक युगपुरुष आपल्या डोळ्यासमोर लेखकाने उभा केलाय. खूप छान वाटतं वाचायला. माझ्या प्रेग्नन्सी मध्ये हे पुस्तक मी वाचलंय. नक्की वाचून पहा. फक्त खूप मोठं आहे. वाचायला जरा वेळ घेईल. पण its worth it.

हे देखील खूप सुंदर पुस्तक आहे.माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई ह्याचं आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. जेवढे माधवराव मनात घर करतात संपूर्ण पुस्तकभर.. तेवढ्याच रमाबाई शेवटच्या काही पानात त्यांचा ठसा उमटवून जातात. दोघेही त्यांच्या जागी भाव खातात.माधवरावांची कर्तबगारी आणि त्यांच्या ठायी आलेलं कमनशिबीपण. आणि रमाबाईंचे प्रेम आणि शेवटचे दिवस.दोघा नवराबायकोंची जबाबदाऱ्या पेलवताना थेऊरच्या घाटावर बघितलेली आणि अर्धवट राहिलेली स्वप्न… दोघांचंही खासकरून रमाबाईंचे वाईट वाटते. आज अशी माणसे होणे नाही असं वाटतं.हे देखील पुस्तक बरेच जण प्रेग्नन्सी दरम्यान वाचावयास सांगतात. नक्की तुम्हाला आवडेल. छान आहे.

शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप।असच सांगणारे हे खूप सुंदर पुस्तक आहे. शिवरायांचे संपूर्ण चरित्र ह्यात वर्णन केलेलं आहे. त्यांचे पराक्रम, गनिमी कावे आणि व्यक्तीमत्व आपल्या मनात ठासून भरते. काळाच्या पुढे जाऊन पाहण्याची त्यांची वृत्ती अपल्याला भावते. हे देखील छान पुस्तक आहे. राजे आपल्या सगळ्यांनाच माहीत्येत. पण त्यांचं शौर्य ह्या पुस्तकात अनुभवायला मिळते.

नवीन शिफारसीत पुस्तके :

फायदे: अध्यात्मिक दृष्टिकोन, मानसिक शांतता, निर्णयक्षमता वाढवते. बाळावर शांत, स्थिर विचारांचे संस्कार होतात.

फायदे: विनोदबुद्धी, सौम्यता, आणि हलकंफुलकं वातावरण निर्माण होतं. स्ट्रेस कमी करण्यास उपयुक्त.

फायदे: सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा, आणि आत्मविश्वास वाढवतो. मातृत्वाची मानसिक तयारीस मदत करते.

दी ब्यूटीफुल ब्रेन – लेखक: हॅना हॉम्स (इंग्रजी, पण साध्या भाषेत)

फायदे: गर्भधारणेदरम्यान होणारे मेंदूतील बदल समजून घेण्यास मदत. इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यास उपयोगी.

तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारची पुस्तके वाचवायची हे जाणून घ्यायचं असेल तेर खालील ब्लॉग वाचा .ह्या मध्ये तुम्हाला गरोदरपणात वाचवायचा पुस्तकांची चांगली माहिती मिळेल.

>>>> Best Books To Be Read During Pregnancy In Marathi|गरोदरपणात कोणती पुस्तके वाचावीत ? (palkatvainfo.com)

आणखी काही book reviews मी घेऊन येणारे. तो पर्यंत happy reading!!!!enjoy your प्रेग्नन्सी !!!

3 thoughts on “आईपण Suggests: प्रेग्नन्सीमध्ये कोणती पुस्तके वाचाल? Which Marathi Books are good to read in Pregnancy??”

  1. Pingback: कोरोना विशेष : लहान मुलांची आणि स्वतः ची काळजी कशी घ्याल? Covid-19 Special:how to take care of urself and kids pandemic?? – आईपण

  2. Pingback: प्रेग्नन्सी आणि बेडरेस्ट :कसा वेळ घालवाल?? – आईपण

  3. Pingback: Best Books To Be Read During Pregnancy In 2022 In Marathi|गरोदरपणात कोणती पुस्तके वाचावीत ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *