नवजात बाळाची झोप | How to establish baby sleep routine for newborn??

आई झालं कि सर्वात अवघड गोष्ट वाटते ती म्हणजे बाळाला झोपवावे कसे ???ह्या प्रश्नाचे उत्तर पूर्वीच्या बायका जेवढ्या सहजतेने करत होत्या तेवढं ते आत्मसात करणं सोपं नाही ह्याचा दृष्टांत पहिल्या काही दिवसांनी लगेच येतो .पहिल्या आठवड्यात बाळ खूप झोपतं पण पुढे पुढे जसं त्याला अवताल भवताल चे जग कळू लागते तसे फार अवघड होते .अगदी आपल्याला पाजून पाजून पाठ भरून आलेली असते ,किंवा जरा निवांतपणा असतो आणि तेव्हाच बाळाला खेळण्याचा मूड असतो ,किंवा कधी कधी ती झोपायला आलेली असतात तरी त्यांना कळत नाही आणि तेव्हा तर त्याचा रडण्याचा एक्दम कहर होतो.आई बिचारी मेटाकुटीला येते ,आजी गडबडीत असते तरी बाळू काही झोपायचं नाव घेत नाही .मग सुरु होतो प्रवास नवजात बाळाला झोपवायचं कसं??ह्या प्रश्नाचे उत्तर गूगल करायचा किंवा मैत्रिणींना फोन करायचा ?? पण घाबरू नका मी आहे ना तुमच्या नवजात बाळाची झोप ह्या विषयावरील प्रश्नांची ऊत्तरे द्यायला .
अशा काही खास टिप्स आणि tricks कि तुम्हाला तुमच्या बाळाला कसं झोपवायचं हे आत्मसात झालंच पाहिजे!!!!!!!!!!!मग नक्की वाचा माझे संपूर्ण पोस्ट!!!!!

नवजात बाळाची झोप कशी असते ?? | How much newborn sleep ??

नवीन जिवाचं करावे तितके लाड कमीच वाटतात. घरातल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते. बाळाला बघावं, खेळावं असं सगळ्यांनाच वाटतं. पण एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे नवजात बाळाची झोप . ती त्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे.

साधारण बाळं सुरुवातीला बराच वेळ झोपतात. मग जशी मोठी होतात तशी त्यांची झोप कमी कमी होयला सुरुवात होते. सुरुवातीला नुकतंच जन्मलेलं बाळ अगदी थोडाच वेळ जागं असतं. मग हळू हळू त्याचे झोपायचा कालावधी कमी होतो. तरीदेखील newborns साधारण दिवसातून 16 तास झोपतात. काही बाळ दिवसा जास्त झोपतात, रात्री जागतात. काही दिवसा जागतात आणि रात्री झोप घेतात. कधी कधी हा pattern बदलू ही शकतो. त्यांना झोपवणे देखील एक skill आहे.

आईच्या पोटातून नुकतंच जन्मलेलं बाळ तान्हं असतं. सुरुवातीला झोपेतच असतं. केवळ भूक लागली, शु शी झाली कि तेवढंच उठतं आणि परत झोपतं. मग हळू हळू जसे दिवस जातील तसं त्याची जागं राहण्याची जवळच्या गोष्टी बघण्याची क्षमता develope होते. मग झोप थोडी कमी होते. तरीदेखील बाळांना आपोआप झोपण्याची सवय नसते. त्यांना शांत झोपेत जायला देखील वेळ लागतो. आपल्यालाच त्यांना शांत करावं लागतं मग ती झोपतात. तर त्यांना झोपवावं कसं? मी आमच्या experience मधून काय शिकले ते मांडत आहे. थोड्याश्या tips आणि थोड्याशा tricks.

नवजात बाळाची झोप ह्याबद्दल काही महत्वाच्या टिप्स | How to establish baby sleep routine easily??

नवजात बाळाची झोप
  • बाळाची साधारण रात्रीची शांत झोप गरजेची आहे. काही बाळं रात्री जागवतात दिवसा झोपतात. ती त्यांची झोप पूर्ण करतात, तरीदेखील त्याला रात्री झोपवायची सवय लावण्यासाठी त्याचं body clock हे सेट करणं गरजेचं आहे. आईच्या पोटात त्याला दिवस आणि रात्रं ह्यातील फरक फारसा कळत नाही, बाहेरच्या जगात आल्यावर कदाचित ते त्यांच्या जुन्याच routine ला धरून असतात, तेव्हा तुम्ही त्याला दिवसाचा प्रकाश दाखवा. दिवसाचं चलनवलन दिसू दे. दिवसा झोपताना फार अंधार करु नका.हलका उजेड राहू दे. त्याला त्यातील कळणार नाही. पण आपोआप त्याला दिवस रात्रीतला फरक कळून ते दिवसा खेळायला आणि रात्री झोपायला शिकेल.
  • बाळाच्या शांत झोपेसाठी diapers लावणं देखील गरजेचं आहे. निदान रात्री झोपेच्या वेळी diapers लावण्यास हरकत नाही.
  • बाळाला रात्री झोपायची सवय करण्यासाठी bedtime routine तयार करा. त्याला मसाज करा. त्याचे diaper बदला. Nappy cream powder लावा. त्याचे कपडे बदला. हाता पायाचे व्यायाम करा. रामरक्षा म्हणा आणि झोपवण्या अगोदर त्याच्या room मधील lights मंद करा. फीडिंग द्या. आणि थोड्या वेळाने झोपवा. साधारण काही महिन्याने हे routine follow केल्यावर तुमच्या बाळाला तशी सवय लागेल.

Read More : बाळांसाठीच्या छान अंगाई

बाळाला कसे झोपवाल?? काही tricks. |Tips for Getting Baby to Fall Asleep Fast

  • गुंडाळणे /swaddle :बाळाला पोटात आईच्या उबेची सवय असते. तेव्हा बाळांना गुंडाळले कि लगेच छान झोप लागते. छान मऊ कॉटनच्या कापडात बाळाला गुंडाळा. ते लवकर झोपेल.
  • अंगाई :बाळाला छान अंगाई म्हणा. Soothing आणि soft गाण्यावर बाळं शांत होतात आणि झोपी जातात. आपल्याकडे पारंपरिक अंगाई गीते आहेच पण ती येत नसतील तरी latest movies मधील soothing songs पण चालतील. Mobile वर देखील soft songs प्ले करु शकता. आरत्यादेखील चालतील. फक्त soothing वाटलं पाहिजे इतकंच.
  • Shushing: तुम्ही बाळ रडत असेल किंवा त्याला झोपवायचं असेल तेव्हा shushh असा आवाज करु शकतात जसं कि लहान मुलांना वर्गात शांत करायचं असेल तर बाई शुक शुक करतात. काहीसा तसाच. जर तुम्ही rhythem मध्ये shush करत राहिलात तर काही मिनिटात बाळ शांत होइल आणि झोपेल.
  • White noise :आईच्या पोटात खरं तर अजिबात शांत नसतं, सतत तिच्या digestive system चे आवाज येत असतात. त्यामुळे बॅकग्राऊंड noise मध्ये बाळाला especially newborns ना झोपायची सवय असते. त्यामुळे अशा आवाजातदेखील ते गुंगतात. परदेशात तशी मशीन्स वापरायचं पद्धत आहे. आपल्याकडे amazon वर देखील अशी मशीन्स मिळतील. किंवा youtube वर देखील white noise audios उपलब्ध आहेत. पण आमचं अगदी नेहमीचं महाराष्र्टीयन घर असल्याने गोंदवलेकर महारांजाच्या रामनामाच्या machine चा मला उपयोग झाला.खरं तर त्या आवाजात तो झोपतो हे कळल्यावरच असं का होतं हे गूगल केल्यावर मला लक्षात आलं.ह्याचा आणखी एक उपयोग असा होयचा कि रस्त्यावरचे अचानक वाजणारे मोठे हॉर्न ज्याने बाळांना दचकायला होतं त्यानी माझ्या बाळाची झोपमोड होणं कमी झालं.
  • डोलवा : बाळाला मांडीवर अंगाई म्हणत डोलवा, किंवा उभं राहून दोन्ही हातात धरून डोलवा ह्याला रॉकिंग असंही म्हणतात. म्हणजे बाळ झोपेल. झोपाळा हा देखील चांगला ऑपशन आहे.
  • फेऱ्या मारा:बाळाला कडेवर घेऊन फेऱ्या मारा. अंगाई म्हणा.बाळ झोपेल. पण patience is the key.

लक्षात घ्या | Few Things that might affect baby sleep

बाळाला colic म्हणजे पोटदुखी होत असेल तर ते शांत झोपणार नाही.नवजात बाळाची झोप हि कॉलिक मुले affect होऊ शकते . तेव्हा 6 महिन्याचा होईस्तोवर स्तनपान म्हणजे breastfeeding वर भर द्या. शक्यतो formula feed नको. आईचे दूध पचायला हलके असते. त्याने पोटदुःखी होत नाही.आईचं अपचन बाळाला देखील होऊ शकतं तेव्हा आपल्याकडे आईने म्हणजे बाळंतिणीने ओवा खाऊन खोबरं खायचं आणि कोमट पाणी प्यायचं अशी पद्धत आहे. Try करुन बघा.

बाळाची ढेकर अडकली असेल तर ते रडेल आणि शांत झोपणार नाही तेव्हा झोपायच्या पूर्वी बाळाचे पोट नीट भरलेलं आहे.आईनी दूध पाजायला घेतलं कि पण बाळं झोपतात ती त्यांना हुक्की येते. आणि ढेकर आलेली आहे ह्याकडे लक्ष द्या. साधारण पिऊन झालं कि पाच मिनिटे बाळाला उभं घ्या. मग खाली ठेवा.

साधारण रात्री थोडया थोड्या अवधीने बाळ दूध प्यायला उठेल. पण ते नॉर्मल आहे. जर ते दिवसा खेळत असेल तर रात्री लगेच झोपेल. साधारण त्याचे routine develope करा. लगेच नाही पण तीन महिन्याने ते routine ला adjust करेल. त्याची झोप महत्वाची आहे. आणि ती नीट पूर्ण होइल ह्याकडे लक्ष द्या.

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

Reference : https://www.mayoclinic.org/healthy-lifestyle/infant-and-toddler-health/in-depth/baby-sleep/art-20045014

1 thought on “नवजात बाळाची झोप | How to establish baby sleep routine for newborn??”

  1. Pingback: तिसऱ्या महिन्याचे बाळ कसे असेल? – आईपण

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!