प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ??|How to confirm pregnancy through pregnancy test?

प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ??

ह्या पोस्ट मध्ये जाणून घ्या घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ???प्रेगा न्युज कसे वापरावे ??गर्भधारणा लक्षणे??गरोदर आहे हे कसे ओळखावे ??गरोदरपणाची लक्षणे आणि बरंच काही!!

This blog post talks about Pregnancy test kit use in marath and how to confirm pregnancy through pregnancy test in marathi. It also answers the questions like pregnancy test kashi karavi??pregnancy test sathi prega news kase vaprave?? and garbhadharnechi lakshane!!!

प्रेग्नन्ट होतानाचा माझा अनुभव | My First hand experience with Pregnancy


2018 मध्ये माझे लग्न झाले व मी आणि माझा जोडीदार एकत्र नव्या आयुष्याची स्वप्न रंगवू लागलो.
   पहिली नवीन नवलाई एकमेकाना जाणून घेण्यात, सवयींची सवय होण्यात, सहवासात निघून गेली. मग नोकरीची घाई आणि खऱ्या आयुष्याचं बस्तान यात मी गडबडून गेले. यात मैत्रिणींच्या गप्पा आणि कामाच्या ठिकाणी चर्चा यातून आपल्या धकाधकीच्या जीवनात अपत्य हवं असेल तर चान्स कधी घ्यावा? अशा गोष्टी माझ्या कानी पडू लागल्या. रोजच्या अप डाउन मध्ये व बदलत्या जीवन शैलीत दिवस लगेच राहणार का? अशा चर्चा मला कानी येऊ लागल्या.

तेव्हा पेशाने मी प्राध्यापक व नवीन लग्नानंतर पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये लागलेली नोकरी. त्याबरोबरीने रोजचं निगडी ते स्वारगेट P.M.P.M.L नी येणं जाणं.

सकाळी सात वाजता जे घर सोडायचं ते संध्याकाळी साडेसातला परतणं. संध्याकाळचं जेवण आटपून थोडी काहीतरी दिनचर्या निभवायची हे रोजच. तेव्हा खरंतर लग्नाला केवळ सहा महीनेचं झाले होते. तेव्हा असं धकाधकीचं जीवन आणि माझं वय हे पाहून योग्यं वेळी आपण चान्स घेऊ हे मी व माझ्या जोडीदाराने ठरवलं. तसं आईच्या तोंडूनदेखील तिशीच्या आत साधारणपणे बाळंतपण झालं पाहिजे हे कानावर आलं होतं. तेव्हा पुढच्या येणाऱ्या वर्षात आपण चान्स घेऊन पहावा असं माझं आणि श्रीचं ठरलं. मनात आलं आपल्यालादेखील अंदाज येईल कि आपलं शरीर नीट रिस्पॉन्ड करतय का? आपली आत्ताची आहार सवय त्याला अनुकूल आहे का? का आपल्याला त्यात काही बदल करावे लागतील.

असं करत मी जेव्हा माझ्या आईकडे एकदा आले तेव्हाच मला माझ्यातील फरक जाणवू लागला. मासिक पाळी येण्याच्या दिवसात होणारी चिडचिड, सकाळच मळमळणं, थोडीशी पाठ दुखणं, मूड्समधील बदल वैगरे जाणवू लागले. हे नवीनच काय होतय हे मला कळेना व कदाचित पीरिअड्स लवकर येतील असंही वाटायला लागलं. म्हणून मी कधीनवं ते पीरिअड्सची वाट पाहू लागले. आईलातर कळून चुकलंच होतं पण तिनही तारखेला येत्ये कि नाही हे बघू व मग बोलू असा विचार केला.

अशा दिवसात आपल्याला शरीरात बरेच बदल होत असतात. स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्स नव्याने कार्यरत होत असतात. पण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार जाणवणारी लक्षणं ही वेगळी असतात. जसा त्रास तुमच्या बहिणींना किंवा मैत्रिणींना होईल तसाच तुम्हाला होईल असं नाही. बहुधा पहिल्या मुलाच्यावेळी होणारा त्रास दुसऱ्यावेळीचदेखील तसाच असेल असं नाही. म्हणूनच प्रत्येक मूल वेगळं असतं असं घरातल्या प्रौढ बायकांना म्हणताना तुम्ही ऐकलंही असेल. तेव्हा घाबरून जाऊ नका.

तरीदेखील तुमच्या माहितीसाठी आणि माझा अनुभव म्हणून बहुतांश स्त्रियांमधील साधारण प्राथमिक लक्षण मी नमूद करत आहे.

गर्भधारणेची लक्षणे | Early symptoms of pregnancy in marathi

  • मळमळणं : काहींना कदाचित सकाळसकाळ किंवा काहींना दिवसभर असू शकतं. माझ्या वेळेस सुरुवातीस ही ऍसिडिटी आहे असं मला वाटत होतं.
  • तोंडाला पाणी सुटणं, उलट्या होणं किंवा चक्कर येणं.
  • मानसिक अस्वस्थता : कशातही मन न लागणं किंवा खूप चिडचिड होणं जसंकी मासिक पाळीच्या दिवसात होतं.
  • अंग गळून गेल्यासारखं वाटणं किंवा खूप झोप येणं.
  • वास सहन न होणं : कोणताही तीक्ष्ण वास सहन न होणं जसेकी तेलातल्या फोडण्या वैगरे. या दिवसात नाक अतिशय संवेदनशील होऊ शकतं. अगदी दूरवरचा वास देखील लगेच बारकाईने जाणवतो. जसं की माझ्यावेळी शेजारच्या घरातून येणारा औषधांचा वासदेखील मला जाणवत असे.

घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ? | How to perform Pregnancy test in Marathi??

आता ही लक्षणं आहेत म्हणजे दिवस गेलेत ही एक शक्यता असू शकते पण कॉन्फीर्मशन असणं देखील गरजेचे आहे. जाणून घ्या घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ???प्रेगा न्युज कसे वापरावे??

यासाठी बाजारात Pregnancy test kit मिळतात ज्याला home Pregnancy test असदेखील म्हणतात. सध्या बाजारात तशी वेगवेगळ्या कंपन्यांची उपलब्ध आहेत. त्यातील सर्वोपरिचित Preganews मी वापरून बघायचं ठरवलं. ह्याचे खात्रीशीर परिणाम तुमचे पेरिऑड्स चुकल्याच्या एका दिवसानंतर मिळतील पण खात्रीशीर निकालासाठी एका आठवड्याने ही टेस्ट करणं योग्य ठरेलं.

प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी
Preganews kit

ही तपासणी कशी करावी? | How to use Prega News kit in Marathi??

तुमच्या युरीनचे काही थेंब किटवर निर्दशवलेल्या जागी म्हणजे होलवर ठेवावे व काही वेळात परिणामांची वाट बघावी.

प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ?

वरील फोटोमध्ये दाखवल्यानुसार दोन गुलाबी उभ्या रेषा पॉसिटीव्ह निकाल दर्शवतात म्हणजे काँग्रट्स !!तुम्ही प्रेग्नन्ट आहात. व एकच गुलाबी रेष असेल तर नेगेटिव्ह निकाल दाखवते. ह्याचा अर्थ तुम्ही प्रेग्नेंट नाहीत.

 प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ?

काही केसेस मध्ये दुसरी गुलाबी रेष ही पहिलीपेक्षा फिकट असू शकते. ह्याचा अर्थदेखील तुम्ही प्रेग्नेंट आहात पण टेस्ट लवकर केल्याने रेष फिकट दिसत आहे. जसंकी फोटोमध्ये टेस्ट मी खूप आधी केल्याने रेष थोडी फिकट दिसत्ये.

काहीवेळा पहिली रेष न दिसता केवळ दुसरी रेष येऊ शकते.ह्यां केसेस मध्ये किट हे invalid असते. दुसरी रेष ही हॉर्मोन hcg मुळे दिसते जे केवळ प्रेग्नन्ट बायकांच्या शरीरात स्त्रवत असतं. त्याच्या शरीरातील प्रमाणावर दुसऱ्या रेषेचा फिकट अथवा ठळकपणा अवलंबून आहे. त्यामुळे फिकट आली म्हणून घाबरू नका, परत काही दिवसांनी टेस्ट करून बघा. काही दुर्मिळ केसेस मध्ये ही किट्स फाँल्स पॉसिटीव्ह परिणाम देऊ शकतात पण त्याची संभावना अतिशय दुर्मिळच असते. त्यामुळेच डॉक्टरांकडून खात्री करून घेणे उत्तम कारण ते त्यांच्याकडील उपलब्ध किट बरोबर नाडीपरीक्षादेखील करतात.

डॉक्टरांकडे केलेली टेस्ट :पॉसिटीव्ह निकाल

असंच कॉन्फीर्मशन मी प्रेगान्युजच्या निकालानंतर डॉक्टरांकडे जाऊन केलं आणि मला आमच्या कुटुंबात येऊ घातलेल्या नव्या जिवाची चाहूल लागली व खूप आनंद झाला तसाच तुम्हालादेखील होईल.

लक्षात घ्या काही प्रेग्नन्सी किट फॉल्स पॉसिटीव्ह असू शकतात त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन अधिकृत प्रेग्नन्सी टेस्ट करणे कधीहि चांगले .आणि प्रेगा न्युज हे सर्वात उत्तम प्रेग्नन्सी टेस्ट किट आहे .ते कुठल्याही मेडिकल पासून ऑनलाईनदेखील मिळू शकते .जसे दिवस जातील तशी line डार्क होते .त्यामुळे काही दिवस थांबून प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता .तेव्हा काळजी करू नका !! आणि ह्या क्षणांचा आनंद घ्या .

तुमची टेस्ट पॉसिटीव्ह आली असल्यास तुम्हाला माझ्या प्रेग्नन्सी गाईड्स ची गरज पडणारे !!!!!!!तेव्हा खालील लिंक नक्की visit करा !!!अगदी गरोदरपणात काय खावे ??पासून हॉस्पिटलची बॅग कशी भरावी ??पर्यंत सगळं काही !!!!नक्की तुम्हाला फायदा होईल !!!!

Do Visit : My Complete Pregnancy blog for all those marathi moms out there !!

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!! All the Best !!!

Reference : https://timesofindia.indiatimes.com/life-style/parenting/getting-pregnant/the-right-way-to-read-a-pregnancy-test/articleshow/68107424.cms

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!