नवजात बाळाला कावीळ असण्याची शक्यता असते. साधारणपणे जन्माला येणाऱ्या 60 ते 70 टक्के मुलांना कावीळ ही असू शकते आणि जे अतिशय नॉर्मल आहे त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका. Mostly आई आणि बाळाच्या blood group मधील difference मुळे बाळाला कावीळ होऊ शकते. ह्या व्यतिरिक्त इतर कारणे देखील असू शकतात ती तुम्हाला डॉक्टर सांगितलंच. पण घाबरून जाऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि काळजी घ्या.
नवजात बाळाची कावीळ ही त्याच्या शरीरातील वाढलेल्या बिलरुबीन मुळे होते. त्यामुळे बाळाचे डोळे आणि त्वचा पिवळसर दिसू लागते. साधारणपणे बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बाळाची कावीळ जाणवू शकते. तसं बाळ झाल्यानंतर साधारण तिसऱ्या किंवा चवथ्यादिवशी डॉक्टर बाळाची तपासणी करतात आणि बाळाला कावीळ असल्या नसल्याची खात्री करुन घेतात.
बऱ्याचदा बाळाची असणारी कावीळ सामान्य असते. त्यामुळे डॉक्टर औषधं लिहून देतात आणि रोज सकाळी 9च्या सुमारास 10 ते 15 मिनिटे ऊन द्यायला सांगतात. आणि बाळाच्या स्तनपानाची काळजी घेण्यास सांगतात.
जर थोडी अधिक प्रमाणात असल्यास फोटोथेरपीचे उपचार केले जातात.बाळाला डॉक्टरांच्या देखरेखी खाली एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाशात ठेवले जाते जेणेकरून त्याचे बिलरुबीनचे प्रमाण कमी होईल.
कावीळ गंभीर स्वरूपाची असल्यास डॉक्टर कशा पद्धतीचे उपचार करतात ते खालील link मध्ये पाहू.https://www.thehealthsite.com/marathi/diseases-conditions/when-should-you-worry-about-your-infants-jaundice-r0717-505116/
घाबरू नका.मी ही ह्या अनुभवातून गेले आहे.आपली पहिली वेळ असेल तर आपण घाबरतो. पण ह्यात काळजी करण्याचे फारसे कारण नाही. नवजात बाळांना कावीळ होणे हे सामान्य आहे. आपण वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार केले आणि काळजी घेतली तर ही कावीळ सहज बरी होते.तेव्हा डॉक्टरांना follow करा. आणि बाळाची काळजी घ्या.
तुम्हाला पडणारे प्रश्न आणि प्रतिक्रिया तुम्ही मला email करु शकता.
Email id👉aaipanblog2@gmail.com