Know Everything about Postpartum
काँग्रट्स काकू !!!तुम्ही आजी झाला आहात, तुमची लेक /सून बाळंतीण झालीये तुम्हाला गोंडस नातवंड झालय.किती आनंद होतो ऐकताना. मन अगदी भरून येतं. “नातवंड म्हणजे दुधावरची साय.”हे आपल्या आईचं वाक्य आठवतं आणि त्याची सार्थता पटते. आपल्या मुलांना नाही देता आलं ते सगळं काही ह्या जीवाला मिळावं असं भरभरून वाटतं. जेव्हा “ज्या चुका आपण आपल्या मुलांच्या बाबतीत अनवधानाने केल्या, त्या तुम्ही अजिबात करु नका “असं आपल्याला त्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं, तेव्हा तुमच्या मनाशीच तुम्ही खऱ्या अर्थानं आजी झाल्या आहात ह्याची खूणगाठ पटते आणि आनंद होतो. असं काही भावविश्व असतं आजीचं. आजीपण हे देखील आईपण आहे. Rather ती आईपणाची second inning आहे. मुलीला देखील आपल्या आईला आपण किती आयुष्यभर गृहीत धरत असतो ह्याची जाणीव होते. तिचं बाळंतपण येऊन ठेपतं आजीवर.जरा जवाबदारीचं वाटलं तरी हवहवसं वाटणारं प्रोजेक्ट तुमचं चालु होतं. हे बाळंतपण तुम्ही नक्कीच छान पार पाडाल.. ह्यासाठी पूर्वतयारी ही महत्वाची. ती तुम्ही कशी कराल? अर्थातच बऱ्याच होऊ घातलेल्या आई-आज्यांना आमच्या अनुभवांची मदत व्हावी एवढाच हेतू.. थोडासा अनुभवांचा हातभार…

You can always start with our popular posts

indian postpartum diet
Pregnancy exercise
Pregnancy exercise
बाळंतपण आणि आचरण:आहार simple post delivery indian diet
Image is not available

Congrats !!!तुम्ही आई झालात आणि तुमची डिलीव्हरी सुखरूप पार पडली. मनातून खूप बरं वाटत असेल पण थकवा जाणवत असेल. टाके दुखत असतील जरा अंग आमल्यासारखा वाटत असेल. बाळाला घ्यावसं वाटत असेल पण दमला देखील असाल.

बाळ बाळंतीण मालीश, शेक शेगडी आणि बरच काही :बाळाचं मालीश Indian massage for Newborn
Image is not available

आईच्या अंगलावणीप्रमाणे बाळाची अंगलावणीदेखील महत्वाची आहे. खरंतर ह्या आपल्याकडे चालत आलेल्या पारंपरिक पद्धती आहेत. बाळाला जेवढे चांगलं मालिश व धुरी मिळेल तेवढे ते सुदृढ आणि निरोगी राहील. त्याची चांगली वाढ होइल. आणि त्याचे आरोग्य नीट जोपासले जाईल.

Slide 2
बाळंतपण आणि स्तनपान Marathi Guide to breastfeeding for new moms
Image is not available

आई झालात, डिलीव्हरी पार पडलीये, गोंडस बाळ बघायला बरं वाटत असेल. एका मोठ्या exam मधून पार पडलात. पण आता एक गोष्ट नवीन असेल. ती म्हणजे breastfeeding. पूर्वी बाळ झालं म्हणजे ओघाने चालून आलेली गोष्टी. बऱ्याच बायकांना सर्रास लोकल ट्रेन मध्ये कोपऱ्यात बसून करतांना पाहिलं असेल. त्यामुळे फार काय जमून जाईल किंवा तितका विचारही मनात आला नसेल. पण आता करताना जरा नवीन आणि हे काहीतरी भलतंच प्रकरण आहे असं वाटत असेल

Slide 2
बाळंतपण :कपड्यांची काय तयारी कराल? Baby & mom clothing
Image is not available

बाळ आलं म्हणजे त्याच्या मागे बरेच कपडेदेखील आले. बाळाची आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची हौस मौज आली. त्याला ह्या नवीन जगात आल्यावर ऊबदार वाटावं ह्या दृष्टीने आपण त्याच्या कपड्यांची तयारी करतो.तेव्हा बाळंतपण म्हणजे साधारण नववा लागून गेला आणि डिलीव्हरी जवळ आली म्हणजे बाळ बाळंतिणीला लागणारे कपड्यांची तयारी तुम्हाला आई आजी म्हणून करून ठेवावी लागेल. कशी …

previous arrowprevious arrow
next arrownext arrow

Check out our all posts on Postpartum

error: Content is protected !!