बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय Marathi Guide to breastfeeding

बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय

आई झालात, डिलीव्हरी पार पडलीये, गोंडस बाळ बघायला बरं वाटत असेल. एका मोठ्या exam मधून पार पडलात. पण आता एक गोष्ट नवीन असेल. ती म्हणजे breastfeeding. पूर्वी बाळ झालं म्हणजे ओघाने चालून आलेली गोष्टी. बऱ्याच बायकांना सर्रास लोकल ट्रेन मध्ये कोपऱ्यात बसून करतांना पाहिलं असेल. त्यामुळे फार काय जमून जाईल किंवा तितका विचारही मनात आला नसेल. पण आता करताना जरा नवीन आणि हे काहीतरी भलतंच प्रकरण आहे असं वाटत असेल. त्यातून दूध आलं का? कधी येईल? वैगरे असे प्रश्न आसपासच्या बायकामुळे आपल्याला पडत असतील. बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय काय बरं करावा असं मनात येत असेल .

काळजी करु नका. ह्याच अशा सगळ्यांना प्रश्नांची उत्तर मी तुमच्यासमोर ठेवत आहे. मलापण अशा सगळ्याच गोष्टी तेव्हा नवख्या वाटल्या. त्यातून मला काय कळलं ते मी तुमच्या समोर ठेवत्ये म्हणजे तुम्हाला सोपं जाईल.

बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय आणि ब्रेस्टफीडिंग पोजिशन्स व बराच काही सापडेल तुम्हाला .एका आईचा अनुभव आणि संपूर्ण स्तनपान गाईड .

बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय

स्तनपानाबद्दल तुम्हाला पडणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे

 1. दूध कधी येईल?
  • डॉक्टरांच्या सांगण्यानुसार साधारण दूध डिलीव्हरी नंतर चार दिवसानी यायला सुरुवात होते. शरीर अतिशय थकल्यामुळे अंगात तितकी ताकद नसते. त्यामुळे साधारण चार दिवसांनी दूध येईल. काळजी करु नका.
 2. दूध केव्हा पाजायला सुरुवात कराल?
  • पहिले घट्ट चीक येतो तो आवर्जून बाळाला पाजा. त्यानी बाळाची immunity boost होते. हे तुम्ही जाहिरातीतदेखील पाहिले असेल. मग चीकानंतर दूध यायला लागेल.
 3. दूध येस्तोवर बाळाला काय द्याल?
  • डॉक्टर तुम्हाला formula reccomend करतील. तो फॉर्मुला देत राहा. साधारण किती द्यायचा हे डॉक्टर सांगतील.
 4. दूध येण्यासाठी काय कराल?
  • बाळाला सतत अंगाला लावत रहा. बाळ थोडंसं रडेल तरीही.जोसपर्यंत बाळ ओढत नाही तोसपर्यंत दूध येणार नाही. बाळाचं ओढणं हा आपल्या शरीराला signal असतो. त्याने ओढले की शरीर दुधाची निर्मिती चालु करते.
  • Breastfeeding pump चा वापर देखील करु शकता. Medical मध्ये मिळतो. Pumping केल्यानंतर देखील दूध येण्यास मदत होइल.
 5. निप्पल्सची टोके पुढे आली नसल्यास काय कराल?
  • साधारण शेवटच्या महीन्या अंघोळ करताना निप्पल्स ओढले की बाळाला दूध पिण्यास त्याची टोके naturally पुढे येतात. मग बाळाला दूध पिण्यास सोपे जाते.
  • जर तुमच्या निप्पल्स ची टोके तशी पुढे आली नसतील तर खाली दाखवलेल्या syringe चा वापर करु शकता.
  • सिरिंजचे तोंड पुढे कापलेले असते. ते तोंड निप्पल्सच्या टोकावर ठेवून, syringe मागे ओढली की sucction निर्माण होऊन, टोक naturally पुढे येईल.
  • माझ्यावेळेस मला ह्याचा उपयोग झाला. डॉक्टरांनी सांगितल्या नुसार मेडिकल मधून विकत आणुन आम्ही पहिले काही दिवस अशी syringe वापरली आणि नंतर टोके पुढे आली.
  • दुसरा उपाय म्हणजे breast feeding pump चा वापरदेखील करता येईल.
  • आणखी एक गोष्ट म्हणजे अंगाला लावायला ज्या बायका येतात. त्या सुद्धा निप्पल्सना मसाज करून टोके पुढे आणतात.
  • एकदा टोके पुढे आली की breastfeeding चे निम्मे काम सोपे झाले म्हणजे समजा.

Note:अशी सिरिंज वापरणार असाल तर ती स्वच्छ ठेवा. वापरण्या आधी स्वच्छ धुवून घ्या ज्याने infection होणार नाही. ब्रेअस्टफीडिंग पंप देखील वापरत असाल तर धुवून स्वच्छ ठेवा.

Read More : अळिवाची खीर

बाळाला पाजायला घ्यायच्या पोझिशन :

सुरुवातीला बाळाला पाजायला घेताना अनेक प्रश्न नव्याने पडायला सुरुवात होते. तशा बाळाला पाजायला घेतानाच्या अनेक पोझिशन्स आहेत. तरीदेखील सर्वात सोपी पद्धत म्हणजे मांडीवर घेऊन दूध पाजणे. सुरुवातीला हीच योग्य पद्धत आहे असे मला वाटते. तुम्ही nursing चा पहिला अनुभव घेत आहात. तर सुरुवात ह्याचा पद्धतीने करा आणि त्याची प्रॅक्टिस ठेवा. कमीत कमी काही महिन्याचे बाळ होत नाही, नीट अंग धरत नाही तोपर्यंत झोपून पाजणे योग्य ठरणार नाही.

मांडीवर घेऊन पाजण्याची पद्धत :आईने पाठीला टेकायला तक्क्या घेणे. आणि मांडीवर उशा घेणे. कदाचित सुरुवातीला दोन उशा एकावर एक ठेवून म्हणजे तुम्हाला पाठीत वाकायला लागणार नाही. तुम्ही डिलिव्हरीतुन आत्ताच उठला आहात. त्यामुळे तुमची पाठदेखील नाजूक आहे. ज्या स्तनावर पाजायचे त्याचे निप्पलचे टोक दुसऱ्या बाजूच्या हाताने स्तन उचूलन धरत दोन बोटांमध्ये पकडून बाळाच्या तोंडात द्या. म्हणजे स्तनाला सपोर्ट मिळेल आणि बाळाला दूध ओढणे सोपे जाईल. जवळच्या हाताने बाळाला सपोर्ट द्या. ही सर्वात सोपी पद्धत आहे. घरातील उशांच्या जागी तुम्ही breastfeeding pillows आजकाल मिळतात ते वापरू शकतात.

झोपून दूध पाजण्याची पद्धत :बाळ मोठं झालं, त्यानी चांगलं अंग धरलं. काही महिन्यांचे झाले की तुम्ही ही पद्धत वापरू शकता. दिवसातून कधीतरी असं पाजायला घेउ शकता. पण शक्यतो ह्या मध्ये बाळ गुदमरणार नाही ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे बाळ जरा मोठे झाले तुम्हाला ब्रेअस्टफीडिंग चांगले जमले की कधीतरी घ्यायला हरकत नाही पण काळजी घेणे गरजेचे आहे. एका कुशीवर बाळाच्या तोंडात निप्पल देऊन दूध पाजतात.

aaipan.com:बाळंतपण आणि स्तनपान Marathi Guide to breastfeeding for new moms

इतर महत्वाच्या गोष्टी

साधारण दूध केव्हा व किती वेळा पाजला? माझ्या बाळाच्या डॉक्टरांनी सुरुवातीला दर एक ते दीड तासांनी साधारण 20 मिनिटे एका स्तनावर मग पुढच्या खेपेस दुसऱ्या स्तनावर आलटून पालटून पाजण्याचा सल्ला दिला. म्हणजे एकेका बाजूंचे पोटभर दूध मिळते. सुरुवातीला बाळांना काही समजत नाही. ती आपली ओढतच राहतात. तर साधारण 20 मिनिटे पाजून त्यांचे पोट भरले की पुढे एक दीड तासांनी 20 मिनिटे पुढच्या स्तनावर घ्यावे. हे training आपण बाळाला देणे गरजेचे आहे. मग एकदा सवय झाली की आपोआप त्यांना देखील कळायला लागते. मग जरा मोठे झाले कि एका वेळी दोन्ही स्तनावर पाजू शकता.

ढेकर काढणे :प्रत्येक वेळेस बाळाचे दूध पाजून झाले कि ढेकर काढणे अतिशय गरजेचे आहे. बाळ अंगावर दूध पितात तेव्हा दूध ओढताना हवा तोंडात जाते. त्यामुळे दूध पाजून झाले कि ढेकर काढावी लागते. त्यासाठीची सर्वात योग्य पद्धत म्हणजे पाठीवर उभे घेऊन हळुवार बाळाच्या पाठीवर हात फिरवत ढेकर काढा. किमान बाळाला पाजून झाले कि 5 मिनिटे उभे घ्या म्हणजे दूध खाली जाईल.व बाळाला त्रास होणारं नाही.

बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय
ढेकर अशी काढा

बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय म्हणजे अंगावर दूध येण्यासाठी आहार :

खिरी :खसखशीची खीर, खारकेची खीर, बदामाची खीर, अळिवाची खीर

लाडू :डिंकाचे लाडू, आळीवाचे लाडू, मेथीचे लाडू

पाण्यात भिजवलेले बदाम

दूध :शतावरी कल्प घालून दिवसातून दोनदा तीनदा

माझ्यावेळेस आईने मला खसखशीच्या वड्यादेखील दिल्या. दिवसातून अधूनमधून तोंडात टाकायला जेणेकरून अंगावर चांगले दूध येतच राहील.

स्तनांची स्वछता :ब्रेअस्टफीडिंग करणाऱ्या आयांना ह्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. रोज अंघोळ करताना गरम पाण्याने आणि साबणाने स्तन स्वछ धुवा. जेणेकरून बाळाला कोणतेही infection झाले नाही पाहिजे. एरवी पाजायला घेताना फडक्याने पुसून घ्या जेणेकरून घाम वैगरे असेल तर निघून जाईल.

स्तनांची काळजी :सुरुवातीला बाळांना कळत नसल्याने ती चावतात. त्यांच्या हिरड्या टणक असतात. त्यांचे असे करणे स्वाभाविक आहे व तोपर्यंत शिरादेखील मोकळ्या होत नाहीत. पण त्यामुळे थोडा त्रास होत असल्यास तुम्ही निप्पल बटर म्हणून जे क्रीम मिळते ते डॉक्टरच्या सल्ल्याने वापरू शकता.

ब्रेअस्टफीडिंगचा ताप :स्तनपानाचा सुरुवातीला आईला ताप येऊ शकतो. असे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण अशावेळेस बाळाला अंगावर घेऊ का? असा प्रश्न पडतो. तर माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले कि जरूर घ्या. अशावेळेस जे दूध अंगावर येते ते antibodies नी समृद्ध असते जेणेकरून आईचे infection बाळाला होऊ नये म्हणून निसर्गाने केलेली तरतूद आहे. तरीदेखील सध्या कोरोनासारखे आजार असल्यामुळे डॉक्टरांना विचारून मग ठरवा. मी फक्त माझा अनुभव सांगत आहे.

इतर काळजी :

 • आपल्याकडे असं म्हणतात बाळाची टाळू स्तनांना नाही लागली पाहिजे नाहीतर स्तन कडक होतात.
 • सुरुवातीला स्तनांमध्ये उरलेल्या दुधामुळे गाठी होतात. तेव्हा रोज सकाळी अंघोळ करताना सुरुवातीला ज्यादाचे दूध काढून टाका. अंगाला लावणाऱ्या बायका छाती मळून देतात जेणेकरून गाठी होत नाही. सुरुवातीला ही काळजी घेणे गरजेचे आहे.

स्तनपानामुळे बाळाला अनेक फायदे होतात. त्याचे आरोग्य चांगले राहते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि आईचे दूध हे अतिशय पौष्टिक असते. व पचायला हलके असते त्यामुळे बाळाला colic सारखा त्रास फार होत नाही.

मी आशा करते कि हे आर्टिकल तुम्हाला फायद्याचे ठरेल. अशा बऱ्याच गोष्टी मी घेऊन येणारे. तोपर्यंत happy nursing!!!!

Reference : Getting Started With Breastfeeding: How-To Video (webmd.com)

1 thought on “बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय Marathi Guide to breastfeeding”

 1. Pingback: पहिल्या महिन्याचे बाळ कसे असेल??read आईपण Guide to newborn baby first month – आईपण

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!