बाळ बाळंतीण मालीश, शेक शेगडी आणि बरच काही: बाळाची मालिश| Step by Step Guide to Indian Massage for Newborn

आईच्या अंगलावणीप्रमाणे बाळाची अंगलावणीदेखील म्हणजेच बाळाची मालिश महत्वाची आहे. खरंतर ह्या आपल्याकडे चालत आलेल्या पारंपरिक पद्धती आहेत. बाळाला जेवढे चांगलं मालिश व धुरी मिळेल तेवढे ते सुदृढ आणि निरोगी राहील. त्याची चांगली वाढ होइल. आणि त्याचे आरोग्य नीट जोपासले जाईल.

त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल ते परत एकदा बघू. | Must haves for indian massage

बाळाची मालिश
 • पॅराशूट खोबरेल तेल
 • डाळीचे पीठ
 • वेखंड पावडर
 • ओवाशोपा पावडर
 • कोळसा
 • घमेलं
 • कोळसा तापविण्यासाठीची जाळी
 • नेओस्प्रिन पावडर (डॉक्टर recommended )
 • बाळाचा पोटपट्टा (कॉटनचे मऊ फडके )
 • अंघोळीसाठीची बसण्यासाठीची स्टूल्स (दोन )
 • Babycare (बाळाच्या स्किनसाठी सूट होइल to साबण, सूट होइल ती baby पावडर )
बाळाची मालिश

आईप्रमाणे बाळाची अंगलावणीदेखील बाळाची मालिश, अंघोळ, धुरी अशा गोष्टींमध्ये विभागलेली आहे.| Important routines in indian massage for newborn

बाळाची मालिश | Simple Manual to baby massage

 • मालिश : (Simple Manual to baby massage)
  • आईप्रमाणे बाळालादेखील कोमट खोबरेल तेलाने मालिश केले जाते. त्यात बदामतेल वैगरे घालण्याची पद्धत आहे पण माझ्या बाळाला उष्ण प्रकृती जाणवल्याने आम्ही केवळ खोबरेल तेलाचा वापर केला.
  • मालिश हे पारंपरिक पद्धतीने म्हणजे दोन पायावर बाळाला घेऊन त्या बाई करत. सुरुवात हि बाळाच्या टाळूला हलक्या हाताने तेल भरून मालिश करण्यापासून होते .सुरुवातीला केलं कि तेल जास्त मुरतं.
   1. बाळाच्या दोन्ही पायांना, त्याच्या पावलांना, तळव्यांना हलक्या हाताने चोळून दिले जाई.
   2. बाळाचे दोन्ही हात, दंड, हाताचे पंजे चोळले जात.
   3. पोटाला हलक्या हातानी मसाज केला जाई.
   4. छातीला हळू हळू तेल लावून चोळले जाई.
   5. उपडे करुन बाळाची पाठ, दोन्ही कुल्ले हळू हळू चोळत.
   6. बाळाच्या मानेला मागून बोटांनी हळुहळु तेल लावून मसाज करत.
   7. कानामागे तेलाचे बोट अलगद फिरवतात.
   8. परत सरळ करुन बाळाच्या हातांचा व्यायाम.
   9. मग पाय थोडे वर करुन बाळाला शी जेथून होते तिथे तेल लावतात.
   10. मग बाळाच्या पायाचा व्यायाम. पाय सरळ करुन हळु हळु बाळाच्या चेहऱ्यापर्यंत नेत.
   11. बाळाच्या चेहऱ्याला हळुवार मसाज. नाक बाजूनी चोळलं जातं.
  • मालिश केल्याने बाळाला कॉलिकचा त्रास कमी होतो. गॅसेस सुटून जातात. बाळाच्या स्नायूना बळकटी येते. बाळाची चांगली वाढ होते. त्यास आरामदेखील मिळतो.

दक्षता : बाळाची मालिश करताना बाळाच्या नाकात, कानात आणि बेंबीत अजिबात तेल लावू नये.

अंघोळ | Simple step by step Manual for bathing a baby

 • अंघोळ : (Simple step by step Manual for bathing a baby )
  • बाळाला दोन पायावर आडवे घेऊन अंघोळ घातली जाते. ह्यासाठी दोन स्टूल्स वापरली जातात. एक स्टूल पाटासारखे बसके कमी उंचीचे बसण्यासाठी. आणि दुसरे देखील कमी उंचीचे चार पाय असणारे बसके स्टूल वापरतात.
  • बाळालादेखील दूधसाय घालून डाळीचे पीठ अंगाला लावले जाते. डाळीच्या पीठाने अंगावरची लव कमी होते असे मानले जाते.
  • पण माझ्यावेळेस नुसत्या डाळीच्या पीठाबरोबर babysoap चा वापर आम्ही तेलकटपणा जात नसल्याने केला.
  • तुमच्या बाळाला जो सूट होइल तो babysoap तुम्ही वापरू शकता.
  • अंघोळ घालताना बाळाची त्वचा भाजणार नाही आणि बाळाला सर्दी देखील होणारं नाही ह्यापद्धतीचे पाणी घ्यावे. खूप कडकडीत गरम नाही आणि एकदम खूप कोमट नाही.
  • आधी थोडेसे पाणी स्वतःच्या पायावर घेऊन तपासा. मग तुम्हाला ok वाटलं की बाळाच्या पायावर घालून त्याला सूट होतय का? ह्याची खात्री करा.
  • एकाने पाणी द्यायला थांबा. आणि एकाने बसून अंघोळ करा.
  • आमच्यावेळस आम्ही पाण्याचे दोन मग ठेवायचो. एक झाला की एक भरून अंघोळ घालणाऱ्या बाईला द्यायचा.
   1. पहिले बाळाला पालथे करुन त्याचे नाक बरोबर दोन पायांच्या फटीमध्ये येईल असे ठेवा. तिथून त्याला श्वास घेता येतो.
   2. मग त्याच्या कुल्ल्याना, पाठीला डाळीचे पीठ आणि त्यामागून साबण लावून धुवा.
   3. शीच्या ठिकाणची जागा धुवून स्वछ करा.
   4. मग बाळाच्या डोक्यावर हात ठेवून अलगद पाणी घाला. आणि हवे असल्यास सोपने डोके धुवा. एकाने डोके धुवा. एकाने पाणी घाला. बाळाच्या डोक्यावर direct कधीच पाणी ओतू नये. आपला हात मधे ठेवून ओतावे.
   5. पुढचं डोकं पाणी देणाऱ्या व्यक्तीस चोळायला सांगावे. कारण ती समोर उभी असते. पुढचा भाग तिला जवळ असतो.
   6. कानाच्या मागील भाग स्वछ करा.
   7. मग बाळाला सरळ करुन दोन मिनिट त्याला शांत होऊ दे.त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचा हात फिरवा. म्हणजे साबण ओघळला असेल तर निघून जाईल. मग सरळ आडवे ठेवा.
   8. आता बाळाचे पोट, पाय, हात डाळीचे पीठ, त्यामागून साबण असं धुवा.
   9. पाय वर करुन दोन्ही पायांना, खालच्या भागाला, पावलांना स्वछ करा.
   10. हाताची बोटं स्वछ करा.
   11. तुमचे हात पाण्यानी धुवून, त्याची जिभ तुम्हाला नुसत्या बोटांनी चोळून स्वछ करायला लागेल कारण नुसत्या दुधाने ती पांढरी पडते.
   12. चेहरा हलक्या हातानी धुवून स्वच्छ करा.
   13. शेवटी सगळं धुवून झालं की शेवटच्या मागातील थोडे पाणी बाळावर ओवाळून टाका. आपल्याकडे अशी पद्धत आहे.
   14. सगळे पाणी संपवू नका. शास्त्र म्हणून अगदी थोडेसे शिल्लक ठेवा.
   15. बाळाला अंगपुशीत गुंडाळून घेतलं की बाळाच्या दोन्ही कानात हळुवार फुंकर मारा. कान नाजूक आहेत हे विसरु नका.

Read More : बाळंतपणात बाळंतिणीचे मालिश कसे कराल ???

धुरी | Dhuri for newborn

 • धुरी :बाळाची धुरी ही तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने देऊ शकता.
  • बाळाची अंघोळ झाली की अंग पुसून, त्याला धुरी दिली जाते.
  • घमेल्यात मंद तापलेल्या कोळसावर त्या बाई धुरी देत.
  • धुरीत औषधी बाळंतशोपा पावडर घालतात.
  • त्यामुळे आधी आईला जेव्हा निखारा थोडा कडक असतो मग बाळाला, जेव्हा निखारा थोडा कमी होतो तेव्हा धुरी देतात.
  • हे काम त्या बायकाच छान करतात. बाळाची पाठ, छाती शेकवली जाते. त्याच्या संपूर्ण अंगाला धुरी देतात.
  • धुरीनी बाळास उब मिळते, सर्दी खोकला, कोणती infection होत नाहीत.
  • धुरी झाली की बाळाच्या उघड्या अंगाला वेखंड पावडर लावतात. पाठीला आणि खासकरून छातीला. वेखंडाचा नाकाला वास देतात.
  • मग बाळाच्या बेंबीवर नेओस्प्रिन पावडर घातली जाते. बाळाला नाळ असेल तेव्हा आणि पडल्यावर पण.
  • नाळ पडून गेली की बाळाची बेंबी वर येऊ नये म्हणून पोटपट्टा बांधतात. छोटया कॉटनच्या मऊ फडक्याचा.
  • आणि मग आम्ही बाळाला लंगोट बांधून अंग त्याचे गुंडाळून घ्यायचो.
  • अंघोळीची छान झोप बाळ काढते.
  • मग शु झाली की बाळ जेव्हा उठेल तेव्हा त्याला diaper आणि झबलं घालून परत बांधून घ्यायचो.

Note:बाळाची उष्ण प्रकृती असेल आणि उन्हाळा असेल तर धुरी देत नाहीत. बाळाला उष्णतेचे आजार होऊ शकतात. आणि द्यायची असल्यास सकाळी लवकर गारव्याला द्यावी. शक्यतो बाळ बाळंतिणीची अंगलावणी पहाटे किंवा सकाळी लवकर करण्याचीच पद्दत असते. सगळं उरकलं की बाळ बाळंतीणीस अंघोळीची छान झोप लागते ती दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेची आहे. तरीदेखील बाळाला धुरी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग देऊ शकता.

Corona मध्ये कसे कराल? | How to manage baby massage during covid??

 • आता कोरोनाच्या दिवसात बाई ठेवणे शक्य नसल्यास मोठया बायकांच्या सोबतीने वर सांगितल्यानुसार बाळाची मालिश करू शकता.
 • अंघोळदेखील आई बहिणीच्या मदतीने हळुवार घाला.
 • नाळ पडून गेल्यावर सोपी जाईल. तोसवर नुसते स्पंजींग करू शकता.
 • धुरी मात्र expert व्यक्तीचे काम आहे. निखारे गरम असल्याने बाळाला भाजू शकते तेव्हा उगाच risk घेऊ नका.
 • घमेल्यावर रोळी उपडी करुन पण धुरी दिली जाऊ शकते पण ते देखील risky आहे कारण रोळी तापते.
 • अगदीच वाटत असेल तर बाळाच्या खोलीत कोपऱ्यामध्ये आईच्या शेकाचे उरलेले कोळसे औषधी पावडर घालून मंद ठेवू शकता ज्याने वातावरण स्वछ होइल. धुरीचा वास सगळ्याला लागेल. आणि त्याचा बाळाला फायदा होइल.

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

References : maharashtratimes.com

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!