बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी ?बाळ बाळंतिणीची मालिश , शेक शेगडी | Step by Step guide to Postpartum Indian massage for New Mom

बाळंतपण म्हटलं की एक गोष्ट अगदी ओघाने येतेच ती म्हणजे अंगलावणी, शेक शेगडी, धुरी आणि बरंच काही. सगळ्याच आयांना आपल्या लेकीची बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न पडत असतो . एकदा मी हॉस्टेलवर रहात असताना बरं नाही वाटत म्हणून आजीकडे गेले होते आणि तेव्हा आजी स्वतः शेक घेत होती आणि मला पाहून तिनं मलापण शेक घेण्यासाठी उभे केले. त्यादिवशी हॉस्टेलवर परतले तेव्हा माझ्या अंगाला बाळंतिणीसारखा वास येतोय असं माझ्या roomates मला म्हणू लागल्या. हो बाळंतपण म्हणजे हीच शेक शेगडी. आणि खरंच अतिशय important भाग ह्यासगळ्यातला. बरेचदा जुन्या प्रथा आपल्याला outdated वाटतात पण हि प्रथा किंवा पद्धत अजिबात outdated नाही बरं का ??बाईची होणारी शारीरिक झीज भरून काढण्यासाठी अतिशय गरजेची आणि महत्वाची आहे आणि असं आजच्या काळातील देखील बऱ्याच मुली आपल्याला सांगतील .जर शक्य असेल करणं तर नक्कीच आपण काळजी घ्यायला काय हरकत आहे ??

डिलीव्हरीनंतर शरीर हे अतिशय थकल्यासारखं होतं. अंगात वात जाणवू शकतो. अंगावर bleeding जात असतं. परत नॉर्मल झाला असाल तरी टाके हे असतातच. तेव्हा ही सगळी झिज भरून काढण्यासाठी ह्या मालीश आणि शेक ह्या गोष्टींची बाळंतिणीस गरज असते. बाळाला देखील चांगली वाढ आणि उत्तम आरोग्य ठेवण्यास ह्याची अतिशय मदत होते. तेव्हा ह्या साठीची काय तयारी असणं गरजेचे आहे ते पाहू. आणि हे म्हणजे नक्की काय? ते जाणून घेऊ.

बाळ आणि बाळंतिणीस अंगलावणी करण्यासाठी बाई ठेवणे जरुरीचे आहे. निदान पहिला सव्वा महिना बाळाच्या आईसाठीतरी.आणि बाळासाठी तुम्ही पुढे तुम्हाला जसं सोयीचे वाटेल तशी ठेवू शकता. ह्या बायका सध्या फार demand मध्ये आहेत. आणि हो त्या अतिशय छान पद्धतीने बाळाचे आणि आईचे मालिश करतात. बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी??

त्यासाठीची काय आणि कशी तयारी कराल? | What to prepare for traditional indian postpartum massage for new mom??

aaipan.com:बाळ बाळंतीण मालीश, शेक शेगडी आणि बरच काही:आईची शेक शेगडी Step by Step guide for Postpartum Indian massage for Mom

लागणाऱ्या गोष्टी | Must haves for traditional indian postpartum massage

 • पॅराशूट खोबरेल तेल
 • डाळीचे पीठ
 • ओवाशोपा पावडर
 • कोळसा
 • घमेलं
 • कोळसा तापविण्यासाठीची जाळी
 • आईचा पोटपट्टा (शक्यतो कॉटनची वापरलेली मऊ साडी )
 • एक जुनी सतरंजी

आता अंगलावणी म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ?| How traditional indian massage is carried exactly??

Read More : बाळाची मालिश आणि धुरी

आई साठीची अंगलावणी | Indian postpartum massage for mom

ह्यात आईच्या अंगाचे मालिश, मग तिची अंघोळ, त्यानंतर शेक आणि मग पोटपट्टा ह्या गोष्टी include आहेत.

मालिश | massage routine for new mom

 • मालिश :
  • आईचे थकलेले अंग आणि स्नायु ह्यांना मसाज करुन आराम देण्याचा प्रयत्न ह्यात केलेला असतो. खास करून कंबर ही पुन्हा पहिल्यासारखी भक्कम करणं जरुरीचे असते. तेव्हा साधारण आई ला कोमट खोबरेल तेलाने मसाज करतात. संपूर्ण अंग रगडून देतात. आणि खरंच घ्या. कारण तुम्हालादेखील बरं वाटेल.
  • मला सतरंजीवर आडवे करुन त्या बाई आधी कोमट तेलाने मसाज करत.त्यात दोन्ही हात, पाय, खांदे, मांड्या, पोट आणि मुख्य म्हणजे पाठ आणि कंबर मालिश करून दिले जाई.
  • छाती मळून दिली जाते. बाळ अंगावर दूध पिते आणि सुरुवातीला त्याला संपूर्ण दूध ओढता येत नाही तेव्हा तुमच्या स्तनांमध्ये दुधाच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे ह्या बायका छाती चोळून उरलेलं दूध काढून टाकतात. त्यामुळे गाठी होत नाहीत. परत दुधाचा पान्हा नीट फुटण्यासाठी, दुधाच्या शिरा मोकळ्या होण्यासाठी छाती मळून घेणे गरजेचे आहे. निप्पल्सला देखील त्या बाई बाळाला दूध नीट ओढता यावं ह्या दृष्टीने मसाज करतात. हा आईच्या अंग मालिश मधील महत्वाचा भाग आहे. ह्याकडे नीट लक्ष द्या.
  • नंतर माझ्यासाठी येणाऱ्या बाई डाळीचे पीठ त्यात दूधसाय घालून त्याचा हात मसाज झाल्यावर परत फिरवायच्या ज्याने डबल मालिश होत असे.

अंघोळ | Bathing a new mom

 • अंघोळ :
  • आईची अंघोळ ही कडकडीत गरम पाण्याने घातली जाते. ज्याने अंग चांगलं शेकून निघेल. खासकरून आईच्या पाठीवर आणि कंबरेवर कडकडीत पाणी घातले जाते, ज्यामुळे तेथील भागाला आराम मिळेल.
  • गरम पाण्याने टाके देखील शेकवले जातात. ज्याने टाक्यांना आराम मिळतो आणि दुखणं कमी होतं.
  • बाकी अंघोळ करताना खासकरून तुमची छाती आणि निप्पल्स साबण लावून स्वछ रोज धुवा कारण बाळ अंगावर दूध पित असल्याने तो भाग रोज स्वछ ठेवणे गरजेचे आहे म्हणजे बाळाला infection होणारं नाही. पुढेदेखील ही सवय continue ठेवाल.

शेक /धुरी | shek shegdi routine for new mom

 • शेक /धुरी :
  • पूर्वी बाळंतिणीस खाटेवर झोपवून खालून पाठ वैगरे शेकवायची पद्धत होती. पण माझ्यावेळेस घमेल्यातील तापवलेल्या कोळशावर उभे करून मला शेक दिला गेला.
  • दोन पायांच्या मध्ये घमेलं ठेवून व त्यात साधारण तापलेले कोळसे ठेवण्यात येत.व साधारण अंगाच्या खालील भागाला शेक दिला जाई. जेणेकरून तेथील टाके लवकर भरून निघतील आणि वात अंगात शिरणार नाही मोकळा होऊन जाईल.
  • तापलेल्या निखाऱ्यात बाळंतशोपा पावडर घातली जाते ज्याने औषधी धुरी आपणास मिळते. खालील अंग नीट शेकवून घ्या.
  • छाती बसून शेकवून घ्या, जेणेकरून सर्दी खोकला तुम्हाला होणारं नाही व तुमचे आरोग्य चांगले राहील. हात,पायाचे तळवे शेकवा. आणि थोडीशी नाका तोंडात देखील धुरी घ्या. आराम मिळेल आणि infection पासून दूर राहाल.

पोटपट्टा | Indian traditional postpartum belly belt

 • पोटपट्टा :
  • प्रेग्नन्सीमध्ये वाढलेले पोट एकदम कमी होत नाही. ते कमी करण्यासाठी आपल्याकडे पोटपट्टा बांधायची पद्धत आहे.
  • मी देखील पहिले दीड महिना पोटपट्टा बांधून घेतला आणि मला ह्याचा चांगला अनुभव आला.
  • अंगालावणी करणाऱ्या बायका साधारण वापरलेल्या कॉटनच्या साडीचा पोटपट्टा बांधतात. धुरी झाल्यानंतर हा पोटपट्टा बांधला जातो. साधारण पहिले काही तास ठेवावा. मग जेवणाच्यावेळेस सैल करून काढून ठेवला तरी चालतो. तुम्हाला झेपेल तेवढा वेळ घ्या. तुम्हाला नक्की फायदा होइल.

Corona मध्ये कसे कराल म्हणजे बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी?? | How to carry postpartum massage during covid??

 • कोरोनामधील दिवसात अशी बाई ठेवणे शक्य नसल्यास तुमच्या आई कडून किंवा कोणाकडून अंगाला साधारण मसाज करून घ्या. अगदी प्रोफेशनल नाही जमला तरी शरीराला थोडा आराम मिळेल.
 • स्वतःची स्वतः छाती मळून घ्या. अंघोळीच्या आधी स्वतः दाबून दूध मोकळं करा. तुमचं तुमचं निप्पल्सना ओढून सरळ करा. म्हणजे दुधाच्या गाठी होणार नाहीत आणि निप्पल्सची बाळाला दूध ओढण्यासाठी टोके पुढे येतील.
 • अंघोळ वर सांगितल्यानुसार तुम्ही आई बहिणीच्या मदतीने पहिले काही दिवस, मग टाके जरा सुटले कि स्वतःची स्वतः easily करू शकता. फक्त गरम गरम पाण्यानी कंबर आणि पाठ शेकवणं गरजेचे आहे.
 • वर सांगितल्या नुसार धुरी घेणं सोपे आहे. घरातील बायकांच्या मदतीने घेऊ शकता.
 • पोटपट्टा readymade वापरू शकता.

Note:एरवीदेखील अंगलावणी करणाऱ्या बाईंना आधी डेटॉलने हात स्वच्छ धुऊन सुरुवात करायला सांगा. आजकाल बऱ्याच बायका आपणुन दक्ष असतातच. तरीदेखील सांगावेसे वाटले.

ही झाली आईची अंगलावणी. बाळासाठीची देखील महत्वाची आहे ती पुढील पोस्ट मध्ये पाहू.

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

Reference : https://www.nutritioncareofrochester.com/

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!