ह्या पोस्ट मध्ये आपण प्रेग्नन्सीच्या नवव्या महिना लागलाय तर बाळंतपणाची काय तयारी करणार आहोत ??आणि नवव्या महिन्यातील काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ,जेणेकरून तुमचा प्रेग्नन्सीचा नववा महिना सुलभ जाईल .
आता तुमची डिलिव्हरी जवळ आलीये. डिलीव्हरी म्हणजेच प्रसूती ही आईची आणि बाळाची सहीसलामत सुटका असते. थोडा त्रास तुम्हाला सोसावा लागेलच. पण काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी काहीतरी सोसावं लागतं तसंच आहे हे. तुम्ही पोटात वाढवलेलं तान्हं बाळ तुमच्या कुशीत येईल तेव्हा त्या सगळ्या त्रासाचा विसर पडेल. ह्या तुमच्या आयुष्यातील पहिल्याच वेदना अशा असतील कि त्रास तर खूप होइल पण डोळ्यातून पाण्याचा एक थेंब नाही येणार. माझी आई मला हे सांगायची पण अनुभव घेतला तेव्हा कळलं.
This post talks about what preparations should be done before delivery?? this talks about useful tips in 9 th month and answers the question like ” deliverychi kay tayari karavi?” ,” hospital la janyapurvi kay tayari karavi?”etc.
Table Of Content
- तर ह्या डिलीव्हरी साठी तुम्ही आई म्हणून काय तयारी कराल? | What to prepare for delivery in Ninth month of pregnancy for newmoms?
- डिलीव्हरीसाठीची मानसिक तयारी | Mental preparation for delivery
- प्रेग्नन्सीचा नववा महिना आणि खरेदी | Ninth month pregnancy shopping
- ह्याशिवाय तुम्ही होणाऱ्या बाळासाठी काय तयारी आई म्हणून स्वतः करू शकता? | Few important things to learn before baby comes
- डिलीव्हरीसाठीची हॉस्पिटल बॅग:what to pack in hospital bag for delivery?
- संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
तर ह्या डिलीव्हरी साठी तुम्ही आई म्हणून काय तयारी कराल? | What to prepare for delivery in Ninth month of pregnancy for newmoms?
डिलीव्हरीसाठीची मानसिक तयारी | Mental preparation for delivery
डिलीव्हरीसाठी तुम्हाला तुमचं थोडंफार mental preparation करण्याची आवश्यकता आहे. नववा महिना लागलाय त्यामुळे तुम्ही डिलीव्हरी बद्दल थोडंसं जाणून घेऊ शकता. म्हणजे ‘delivery contractions’काय असतात? साधारण त्याची सुरुवात कधी पासून होते? ‘Water break’म्हणजे काय? अंगावर पाणी जायला सुरुवात म्हणजे waterbreak. त्यात आणि युरीन मध्ये काय फरक आहे? Bleeding असू शकतं का?त्यात बाळाची शी देखील असू शकते.असं असेल तर त्वरित डॉक्टरांना कळवणे गरजेचे आहे. ह्या साऱ्या गोष्टींची साधारण चर्चा तुमच्या जवळील experienced व्यक्तीशी जसं कि मैत्रीण, बहीण किंवा नणंद इत्यादी. तुम्ही करू शकता. जेणेकरून त्यांचा अनुभव recent असेल आणि तुम्ही घाबरून न जाता तुम्हाला त्याची माहिती होइल आणि त्या गोष्टीं साठी तुम्ही prepared असाल.
पण लक्षात ठेवा ही अगदी routine process आहे निसर्गासाठी आणि डॉक्टरांसाठीदेखील. तेव्हा घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. ह्या process ला आपण पूर्णच blind नको म्हणून ही काळजी आपण घेत आहोत एवढंच.
प्रेग्नन्सीचा नववा महिना आणि खरेदी | Ninth month pregnancy shopping
लक्षात ठेवा डिलिव्हरीच्या वेळेस व डिलीव्हरीनंतर हॉस्पिटल मध्ये तुम्हाला आई म्हणून काही गोष्टींची तयारी करुन ठेवावी लागेल. साधारण आपल्याकडे आधी तयारी करावयाची नाही वैगरे अशा समजुती आहेत. पूर्वी चाळ संस्कृती नांदायची. लोकांचा घरोबा असायचा. शेजारधर्म असायचा. एकत्र कुटुंब, घरात खूप सारी माणसं व आधीच बरीच लहान बाळं. त्यामुळे घरी सगळं काही असायचंच व ते निभवून जायचं. पण आता वातावरण तसं नाही. तेव्हा सगळं काही आलबेल असेल तर थोडीफार तयारी तुम्ही करावयास हरकत नाही.
तेव्हा तुम्ही हॉस्पिटल मध्ये व नंतर घालवायचे maternity wears ची खरेदी करायला हरकत नाही.
बाळाच्या आईसाठी कोणते मॅटर्निटी कपडे खरेदी कराल ?? | List of Useful Maternity clothes to buy for new moms
- Maternity gowns:डिलिव्हरी नंतर टाके असल्यामुळे काही दिवस तरी तुम्हाला इतर काही घालण्यापेक्षा गाउन घालणे सोपे जाईल.
- Maternity kurtis :नंतर च्या दिवसात वापरायला किंवा कुठे बाहेर जायला breast feeding kurtis आणायला हरकत नाही. त्यावर comfortable leggings किंवा पँट्स match करुन तुम्ही वापरू शकता.
- Nursing bras :एरवी काही दिवस बाळ झाल्यानंतर ब्रा न वापरणंच योग्य ठरेल. कारण बाळ अंगावर दूध पित असेल. पण गरज पडल्यास बाहेर जाताना किंवा हॉस्पिटलमध्ये लागली तर नर्सिंग ब्रा खरेदी करणं गरजेचे आहे. दोन तीन चा एक सेट तरी आणून ठेवा.
- Inner wears :एक्सट्रा जे जोड आणून ठेवा.
- Socks :बाळंतीणीस काही दिवस तरी गारवा लागू नये म्हणून काळजी घेणं गरजेचे आहे. त्यामुळे पायात घालायला सॉक्सचे (मोजे )जोड आणून ठेवा.
- Slipers:बाळंतीणीस फरशी गार लागू नये म्हणून पायात स्लीपर्स लागतात.
- Maternity sanitary pads:डिलीव्हरीनंतर खूप ब्लीडींग अंगावर जातं. नंतरदेखील बाळंतिणीस अंगावर ब्लीडींग जातच राहतं तेव्हा सॅनिटरी पॅड्स आणुन ठेवा.
बाळासाठी काय खरेदी कराल? |List of Baby clothes to buy online
- बाळाचे कपडे :वापरलेलं आणणार असाल तर कोणाला तरी आधीच सांगून ठेवा
- Newborn baby diaper :हॉस्पिटलपुरतं एखादं पॅक तरी
- Baby wipes: शी साफ करायला उपयोगी येतात. एखादं पॅक हॉस्पिटल मध्ये वापरायला तरी
ह्या व्यतिरिक्त आईचे कपडे व बाळाचे कपडे पाण्यातून काढण्यासाठी dettol आणुन ठेवा. ह्या व्यतिरिक्त बाळंतपणासाठी बरीच तयारी करणे गरजेचे आहे. ते सर्व डिटेल्स मी बाळंतपण सदरात आज्यांसाठी सांगणार आहे.
ही झाली साधारण खरेदी जी नवव्या महिन्यात तुम्ही करुन ठेवू शकता.
Read More : बाळंतपणात कपड्याची काय तयारी कराल ??
ह्याशिवाय तुम्ही होणाऱ्या बाळासाठी काय तयारी आई म्हणून स्वतः करू शकता? | Few important things to learn before baby comes
स्तनपान प्रशिक्षण | Breastfeeding training:
माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगावेसे वाटले. Breast feeding म्हणजेच स्तनपान दिसते तेवढं सुरुवातीला सोपं नाही. बाळाला आणि तुम्हाला देखील ते सगळं नवीनच असतं. त्याला ओढायला जमाव लागत. त्यात तुमची पण नुकतीच डिलीव्हरी झाल्यामुळे तब्येत थोडी तोळामासाच असते. आसपासच्या बायका जसं कि आई, सासूबाई तुम्हाला दाखवतीलच तरी देखील जमेजमेस्तोवर जरा त्रासाचं जातं. तेव्हा बाळ कसं पकडावं? हात कुठे ठेवावा? निप्पलचं टोक त्याच्या तोंडात कसं द्यावं? हे सगळं तुम्ही साधारण बघून ठेवा. तुमच्या बहीणी किंवा नणंदेशी ह्यावर चर्चा करा. त्यांचा अनुभव ताजा आहे तेव्हा त्या खुलून समजावतील. Youtube वर देखील ह्या संबंधित थोडेफार videos आहेत ते बघून ठेवा. म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही थोडंफार prepared असाल.
बाळाला कसं गुंडाळावं? | Baby swaddling :
:बाळ झाल्यानंतर बरेच महिने त्याला कापडात गुंडाळण्याची पद्धत आहे. हॉस्पिटलमध्येदेखील nurse गुंडाळूनच बाळाला तुमच्या ताब्यात देतात. गुंडाळलंकी बाळ चांगलं छान झोपतं. त्याला आपण आईच्या पोटातच आहोत असं वाटतं आणि ती उब आवडते. तेव्हा त्याला कसं गुंडाळायचं हे साधारण शिकून ठेवा.आज्यांना जरी येत असलं तरी तुम्हीपण बघून ठेवा तुमचं अडायला कुठे नको. Youtube वर ह्यांचे videos आहेतच.जवळच्या मैत्रीण, बहीण किंवा नणंदेला विचारा.अंगालावणारी बाई तुम्हाला नंतर शिकवेल. पण तुम्हाला आधी माहित असेल तर थोडं सोपं जाईल.
बाळाला झोपवायच्या /शांत करायच्या tricks | Tricks to make baby sleep:
नवजात बाळ जरा रडू शकतात. पहिले काही दिवस त्यांच रडणं हेच त्यांचं communication असतं. तेव्हा ते का रडतायेत? त्यांना भूक लागलीये का? नॅपी खराब झालीये का? ढेकर काढायची आहे का? हे सगळं अनुभवांनी कळतच तरीदेखील हे पण जरा बघून ठेवा. कोणत्या पोझिशन मध्ये लगेच शांत होतात? ढेकर कशी काढायची? त्याला burping असंदेखील म्हणतात. हे पण एक जरा गम्मत म्हणून आईने बघून ठेवायला हरकत नाही. अनुभवी आज्या मदतीला येतीलच तरी.
हॉस्पिटल बॅग | Hospital bag packing for delivery :
डिलीव्हरीसाठी तुम्हाला हॉस्पिटल मध्ये जावं लागेल. कमीत कमी दोन दिवस बाळाला घेऊन राहावं लागेल. तुमची डिलीव्हरी डेट साधारण डॉक्टरनी सांगून ठेवली असेल तरी काही गोष्टी ह्या निसर्ग ठरवत असतो तेव्हा तुम्हाला पुढे मागे कधीही जावं लागू शकतं.तेव्हा डिलीव्हरीसाठीची हॉस्पिटल बॅग भरून ठेवा.
डिलीव्हरीसाठीची हॉस्पिटल बॅग:what to pack in hospital bag for delivery?
👩🍼 आईसाठी कपडे
- मॅटर्निटी गाउन्स – 2 ते 3
- टॉवेल – 1
- नर्सिंग ब्रा व इनर्सचे 2 ते 3 जोड
- स्वेटर
- डोकं बांधायला स्कार्फ – 2
- मोजे – 2 जोड
- नॅपकिन्स चे जोड
- एक्स्ट्रा रुमाल
- हॉस्पिटलमधून निघताना घालण्यासाठी सैलसर ड्रेस (गाउन चालेल)
टीप: आईसाठीचे सर्व कपडे डेटॉलच्या पाण्यात काढून स्वच्छ करावेत.
🧴 आईसाठी वैयक्तिक स्वच्छता (Personal Hygiene)
- साबण
- टूथब्रश व टूथपेस्ट
- कंगवा
- फेस पावडर
- केस बांधायचे क्लचर्स – एक्स्ट्रा
- केसासाठी रबर बँड – एक्स्ट्रा
- मॅटर्निटी सॅनिटरी पॅड्स (XL)
- जुने पेपर्स – पॅड्स wrap करण्यासाठी
- कानात घालायला मेडिकेटेड कापूस
- स्लीपर्स
👶 बाळासाठी आवश्यक वस्तू
- गुंडाळी कापडे – 6
- दुपटी – 6
- ड्राय मॅट
- टोपडी/कॅप – 2 ते 3
- सोपे व उबदार कपडे (ऋतूनुसार)
- लंगोट
- हँड ग्लोव्हस – 2 जोड
- बेबी ब्लॅंकेट
- न्यूबॉर्न डायपर पॅक
- बेबी वाइप्स
- बेबी पावडर आणि तेल
- एक वाटी व चमचा
टीप: बाळासाठीचे सर्व कपडे डेटॉलमध्ये धुवून, स्वच्छ करून पॅक करावेत.
🧑🤝🧑 बरोबर राहणाऱ्या व्यक्तीसाठी
- रात्रीचे कपडे
- इनर्स चे जोड
- टॉवेल
- रुमाल/नॅपकिन
- पर्सनल हायजिन किट
🧾 इतर महत्त्वाच्या गोष्टी
- सर्वांचे मोबाइल
- चार्जर्स
- एक्स्ट्रा ब्लॅंकेट्स / पांघरूण (आईसाठी आणि सोबतच्या व्यक्तीसाठी)
- बेडशीट (आवश्यकतेनुसार)
- हँड सॅनिटायझर
- कपडे धुण्याचा ब्रश
- साबण / सर्फ पावडर पाकिटं
- एक्स्ट्रा प्लास्टिक पिशव्या
- डॉक्युमेंट्स:
- इंशुरन्स कार्ड
- केस पेपर फाईल
- आधार कार्ड
- निघताना जुनं गाउन घालून जाणं (ब्लीडिंगमुळे खराब होण्याची शक्यता असते)
नववा महिना लागला कि थोडीफार अशी तयारी करुन ठेवली तर तुम्हाला थोडं सोपं जाईल. आणि तुमचा प्रेग्नन्सी प्रवास सुलभ पार पडेल.
तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!
अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!
संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!
Pampers.com “Preparing for Baby: 21 Things to Do Before Giving Birth”
momandhome.com “51 Things To Do Before The Baby’s Arrival”
🌸 गर्भधारणेदरम्यान वापरता येणाऱ्या उपयुक्त वस्तूंसाठी खास शिफारसी -Pregnancy Essentials
नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!
मी येथे एक अॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.
👶 बाळंतपासाठी हॉस्पिटल बॅगमध्ये ठेवावयाच्या आवश्यक वस्तू:
- प्रसूती ड्रेस (Maternity Gown)
- स्तनपानासाठी खास ब्रा (Nursing Bra)
- मॅटर्निटी सॅनिटरी पॅड्स (Maternity Pads)
- बाळाचे कपडे
- नवजातासाठी झबले (Onesies)
- हातमोजे (Mittens)
- डोके झाकण्यासाठी टोपडी (Caps)
- बाळासाठी स्वॅडल बॅग (Swaddle Bag)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
Q1: नवव्या महिन्यात बाळंतपणाची कोणती लक्षणं दिसतात?
पोटात वारंवार खालच्या बाजूला दुखणं, पाठदुखी, पाण्याचा फुटाव, गर्भपिंड हलचाली कमी होणं, अशा लक्षणांमुळे बाळंतपण जवळ आलं आहे हे समजू शकतं.
Q2: हॉस्पिटल बॅग कधी तयार ठेवावी?
आठव्या महिन्याच्या शेवटी किंवा नवव्या महिन्याच्या सुरुवातीला हॉस्पिटल बॅग तयार ठेवावी, जेणेकरून अचानक प्रसंगात धावपळ होणार नाही.
बाळंतपणासाठी मानसिक तयारी कशी करावी?
उत्तर: श्वासोच्छ्वासाचे व्यायाम, सकारात्मक विचार, जन्मपूर्व (prenatal) वर्ग, आणि पती/कुटुंबाचा भावनिक आधार ही मानसिक तयारीसाठी खूप महत्त्वाची आहेत.
Q4: स्वॅडल बॅग काय आहे आणि ती का उपयोगी आहे?
स्वॅडल बॅग म्हणजे बाळाला गुंडाळण्याची मऊ चादर/झोळी असून ती बाळाला सुरक्षित, उबदार वाटण्यासाठी वापरली जाते, जे त्याच्या झोपेसाठी उपयुक्त ठरते.
Q5: बाळाच्या जन्मानंतर लगेच काय काळजी घ्यावी?
उत्तर: त्वचा-त्वचेचा स्पर्श (skin-to-skin contact), स्तनपानाची सुरुवात, बाळाचे तापमान व श्वासोच्छ्वास यावर लक्ष ठेवणे – ही प्राथमिक काळजी आवश्यक असते.
Very well explained.. 👍👍