गरोदरपणात काय खावे आणि टाळावे? | Simple Maharashtrian Diet Tips for Pregnancy

Marathi Pregnancy diet

This article covers simple pregnancy diet tips to follow during pregnancy in marathi for all those marathi moms out there looking for practical and simple pregnancy diet !!!

ह्या पोस्ट मध्ये आपण गरोदरपणात काय खावे???गरोदरपणातील आहार कसा असावा ???हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत .एक साधा सरळ पूर्वापार आपण करत आलेलो गरोदरपणातील आहार तक्ता!!एक सिम्पल आणि प्रॅक्टिकल डाएट.जे मी केलं आणि मी त्यातून काय शिकले ??आणि सहज सरळ कोणालाहि करता येईल असे …मग वाचा माझे ब्लॉग पोस्ट आणि जाणून घ्या गरोदरपणात काय खावे ??

Table of content

प्रेग्नंसी डाएटबद्दल माझा अनुभव – जे खरंच उपयोगी ठरलं

तुम्ही प्रेग्नन्ट आहात ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पण कदाचित तुम्ही काळजीतदेखील असाल की मी माझं पथ्य नीट पाळते आहे ना? माझ्याकडून काही चुकीचं नाही होत ना?सगळं नीट होईल ना?

हो अगदी सगळं व्यवस्थितच आहे. जसं की म्हटलं, मूळत :च “Pregnancy is not a disease.”तेव्हा काळजी करू नका.

ही तुमच्या आयुष्यातील एक सुंदर फेज आहे जी वारंवार नाही येणार त्यामुळे ती एन्जॉय करा. स्वतःच्या जीवनशैलीचा विचार करा. चांगल्या सवयी लावा. आहार नीट ठेवा. मनस्थिती जपा व खुशाल आयुष्य अनुभवा.

आपली जीवनशैली म्हणजेच lifestyle बऱ्यापैकी बदलेले आहे. काही बदल हे नक्कीच चांगले आहेत पण काही बदल हे थोडेसे आरोग्यासाठी घातक जरूर आहेतच. आपल्याला प्रेग्नेंसीमध्ये ह्यां घातक सवयींवरच थोडेफार काम करावं लागेल.

जसेकी आपल्यातील बऱ्याच जणींना ऑफिसमध्ये, ऑफिसनंतर, संध्याकाळी बाहेर पडल्यावर पाणीपुरी, दाबेली, वडापाव, भेळ अशा गोष्टी खाण्याची सवय असते. काही लोक तर रोज ऑफिस सुटलंकी किंवा संध्याकाळी बाहेर पडताना काही ना काही थोडंसं तोंडात टाकू असं म्हणत खातातच. तो गरम तव्यावरील बटरचा वास खूप काही खुणावणारा असतो किंवा चिंचेचं पाणी बघून आपलं तोंड हे सुखावतंच. पण ह्या दिवसांमध्ये अशा काही cravings ना न भुलणं व ती आटोक्यात ठेवणं हेच आपणासाठी योग्य आहे. आपल वीकएंडचं हॉटेलिंगदेखील कमी करणं गरजेचे आहे. खरंतर फास्टफूड हा तुमच्यासारखाच माझादेखील आवडीचा विषय. पण ते पौष्टिक नसून फक्त जिभ सुखावणारे असते व ह्यातून शरीरास फार काही उपयोग न होता infection सारखा अपाय होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे ह्या दिवसात अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणंचं योग्य.

अशा गोष्टींवर आळा घालण्यासाठी जे तुम्ही सततच बाहेर खात होतात ते सध्या कमीतकमी सत्तर टक्के तरी कमी करणे गरजेचे आहे. ह्यावर उपाय म्हणून त्यातील काही गोष्टीं तुम्ही घरी देखील बनवू शकता की जेणेकरून ते घरच्या घरी बनवलेलं ताजं व hygenic असेल आणि त्यातून तुमच्या cravings ही पूर्ण होतील. बाहेर खाण्याची वेळ आलीचतर जिथे तुम्ही खाणार आहात ते प्लेस hygenic आहे ह्याची दक्षता घ्या. खाणारे पदार्थ उष्ण नाहीतना किंवा त्यातून आपणास infection किंवा सर्दी खोकल्यासारखे आजार होणार नाहीतना ह्याची काळजी घ्या. अगदी कधीतरीच चांगल्या ठिकाणी आपल्या आवडीचं खाल्लं तर चालेल पण शक्यतो अशा सवयी टाळणे हेच हितकर. कारण कोणत्या पदार्थात काय अपायकारक ठरू शकतं ह्याचं संपूर्ण ज्ञान आपल्याकडे नसतंच.

जसं की, बहुधा chinese food मध्ये जे की भारतीय रेस्टॉरंट्समध्ये व फूड ऑउटलेट्समध्ये सर्व्ह केलं जातं त्यात अजिनोमोटो हा वादातीत पदार्थ असतो.काही तज्ज्ञांच्यामते त्याने गर्भास अपाय होण्याचीदेखील शक्यता असते त्यामुळे अशा गोष्टीं टाळणं हेच योग्य.

गरोदरपणात काय खावे?? ज्याचा तुम्हास फायदा होईल. ह्यावर बोलण्यास हरकत नाही.

गरोदरपणातील आहार | What is healthy to eat during pregnancy??

किंबहुना आपले डॉक्टर्सदेखील पहिल्या अपॉइंटमेंटमध्ये गरोदरपणात काय खावे?? ह्या गोष्टीं तुमच्यासोबत डिसकस करतील. गरोदरपणात पाळवायच्या झाल्यातर आहाराच्या भरपूर नवीन गोष्टीं आहेत. आयुर्वेदानुसार आपण आपल्या आहारात भरपूर नवीन बदल करू शकतो.

तरिही डॉक्टर व घरातील अनुभवी स्त्रिया जसं की तुमची आई, सासूबाई, मावशा, काकवा, बहीणी, नणंदा, आज्या ह्यांनी सांगितलेल्या गोष्टींनुसार आहारातील साधारण बदल | Few useful and valuable food to eat during Pregnancy

  • दररोज सकाळी व रात्री एकेक ग्लास दूध प्यावे. आता दुधाचा समावेश शक्यतो तुमच्या आहारात असावा. साधारण तुमच्या प्रकृतीस सूट होईल त्यानुसार एक कपभर तरी दूध तुम्ही घेण्यास हरकत नाही. त्यात तुम्ही कधी शतावरी कल्प ज्याने तुम्हाला शक्ती येईल , कधी नाचणी सत्त्व, कधी केशर (उष्ण असल्याने एकच छोटीसी पाकळी )अशा गोष्टीं आलटून पालटून घेऊ शकता.
  • अंशेपोटी पंचामृत घेण्याची सवयदेखील चांगली.
  • नेहमीच्या जेवणात कधी हिरव्या पालेभाज्या, कधी कडधान्ये असणं उत्तम.
  • दुपारच्या जेवणानंतर किंवा दिवसा अधूनमधून फळे खाण्याची सवय चांगली. फळे ही सर्दी खोकला न होणारी, सिझनल व लोकल असली तर उत्तम. तरीदेखील आंबा उष्ण आहे हे विसरु नका.
  • अधूनमधून सफरचंद व शहाळयाचे पाणी खासकरून शेवटच्या महिन्यात पिणे चांगले.
  • सुकामेवा त्यात कधीतरी काळ्या मनुका, भिजवलेले दोनचार बदाम शक्यतो रोज, खारीक, अक्रोड, अंजीर अधून मधून खावा.
  • आपल्या प्रकृतीनुसार पोटभर जेवण करावे. जमल्यास जेवणानंतर अधून मधून शतपावली करण्यास हरकत नाही.
  • अधून मधून ताक दूध भात देखील खावा. असं म्हणतात आहार जेवढा सात्विक तेवढं बाळदेखील सात्विक निपजेल.

अशा व तुम्हास आणखी काही माहित असलेल्या सवयीं तुम्ही अंगी बाणू शकता. ह्याबरोबर दिवसातून भरपूर पाणी( उकळलेलं )देखील पिणे गरजेचे आहे ज्या सवयीवर मला खासकरून काम करावं लागलं कारण माझे पाणी पिण्याचे प्रमाण कमी आहे. पण पाणी हे जीवन असल्याने महत्वाची भूमिका पार पाडते हे विसरू नका.

याचे नक्की आरोग्याला कोणते फायदे आहेत?

1. दररोज दूध पिणे (सकाळी व रात्री)

फायदे:

  • शरीराला कॅल्शियम, प्रोटीन, आणि व्हिटॅमिन D मिळते – हाडे, दात आणि स्नायूंना बळकटी मिळते.
  • झोप सुधारते, तणाव कमी होतो.
  • शक्तिवर्धक व पोषणदायक.

2. शतावरी कल्प, नाचणी सत्त्व, केशर

फायदे:

  • शतावरी – स्त्रियांसाठी विशेष पोषणदायक, गर्भाशय व हार्मोन्ससाठी उत्तम.
  • नाचणी सत्त्व – आयर्न आणि कॅल्शियमचा भरपूर स्रोत; हिमोग्लोबिन वाढवतो.
  • केशर – उष्णतादायक; त्वचा उजळवते, मूड चांगला ठेवते. मात्र अल्प प्रमाणातच.

3. अंशेपोटी पंचामृत घेणे

फायदे:

  • पचन सुधारते, मन प्रसन्न राहते.
  • आत्मिक शांती आणि शरीरसुद्धा ऊर्जावान राहते.
  • पंचामृतात असलेले दूध, दही, तूप, मध आणि साखर हे शरीरासाठी पोषणदायक.

4. हिरव्या पालेभाज्या व कडधान्यांचा समावेश

फायदे:

  • आयर्न, फायबर, फॉलिक अ‍ॅसिड मिळते – रक्त वाढवते, पचन सुधारते.
  • कडधान्ये प्रोटीनचा उत्तम स्रोत.

5. फळांचे सेवन (सिझनल आणि लोकल)

फायदे:

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • सर्दी-खोकल्याची शक्यता कमी होते.(सिझनल आणि लोकल)

6. सफरचंद व शहाळ्याचे पाणी (शेवटच्या महिन्यात)

फायदे:

  • सफरचंद – पचन सुधारते, आयर्न वाढवते.
  • शहाळ्याचे पाणी – शरीर थंड ठेवते, नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स देतं.

7. सुकामेवा (काळ्या मनुका, बदाम, अक्रोड, अंजीर)

फायदे:

  • उर्जा वाढवतात, मेंदू व हाडांसाठी लाभदायक.
  • बदाम व अक्रोड मेंदूच्या विकासासाठी.
  • मनुका रक्तवाढीसाठी.
  • अंजीर – पचनासाठी उत्तम.

8. प्रकृतीनुसार पोटभर जेवण व शतपावली

फायदे:

  • जेवणानंतर हलकी चाल रक्तसंचार सुधारते, पचन चांगले होते.
  • शरीर हलकं राहतं.

9. ताक-दूध भात खाणे

फायदे:

  • अग्निशामक, शांत करणारा आहार.
  • पचनासाठी हलका आणि फायदेशीर.
  • शरीरात उष्णता कमी करतो.

10. सात्विक आहाराचे फायदे

फायदे:

  • मनशांती, सौम्य स्वभाव, बाळाचंही आरोग्य चांगलं.
  • गर्भवती स्त्रीचा मानसिक व शारीरिक समतोल राखतो.

Read More : गरोदरपणातील साधा व सोपा व्यायाम

गरोदरपणात काय खाणं टाळाल??? | What to avoid eating during Pregancy??

मला एक सांगावसं वाटतं ते म्हणजे ह्या काळात कोणतंही औषध मनाने वाटलं म्हणून घेऊ नका. अगदी चेहऱ्यावर पुरळ येतं म्हणून लावायच्या क्रीमपासून( तुम्ही आधीपासून लावत असाल तरीही) ते इतर किरकोळ वाटणारी औषधंदेखील डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेणं टाळावे. खाण्यापिण्याबाबतदेखील घरातील अनुभवी व्यक्तींना विचारून करणं योग्य. डोहाळ्यांनादेखील फार बळी पडू नये. व उपास शक्यतो टाळावेत.

ह्या व्यतिरिक्त मोठ्या बायकांच्या सल्ल्यानुसार पथ्यपाणी करणं. उष्ण पदार्थ (जसं की पपई, वांगी, शेवगाच्या शेंगा, अननस, खरवस ह्यासारखे )टाळणं व डॉक्टरांचा सल्ला पाळणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर सध्याच्या काळात प्रेग्नन्सीमध्ये शुगर डिटेक्ट होण्याच्या केसेस दिसतात तेव्हा अशी शक्यता असणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टरांचा आहारविषयक सल्ला घेणें उत्तम तशी साधारण कल्पना डॉक्टर तुम्हाला पहिल्या अपॉइंटमेंटमध्ये देतीलच. ह्याबरोबर महिन्यानुसार आहाराची माहिती हवी असल्यास बालाजी तांबे ह्यांचे ‘गर्भ संस्कार’ पुस्तक तुम्ही वाचू शकता, ज्यात आहार व इतर गोष्टीसंबंधी एक मार्गदर्शन लाभू शकतं.

गर्भधारणेत टाळावयाचे पदार्थ:

उष्णतेचे अन्नपदार्थ

ज्यामुळे शरीरात उष्णता वाढते:

  • पपई (विशेषतः कच्ची पपई)
  • वांगी
  • शेवग्याच्या शेंगा
  • अननस
  • खरवस (कोलोस्ट्रम)

प्रक्रियायुक्त (Processed) अन्न:

  • पॅकेज केलेले स्नॅक्स, कुरकुरे, चिप्स
  • कोल्ड ड्रिंक्स
  • प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ

जास्त तेलकट, तळलेले पदार्थ:

  • भजी, समोसे, पुरी, चकली इ.
  • हे अपचन आणि ऍसिडिटी वाढवू शकतात

अतिशीत पदार्थ / थंडपेये:

  • आइस्क्रीम (अतिप्रमाणात)
  • फ्रिजमधील पाणी
  • कोल्ड कॉफी/थंड दूध (रात्रीच्या वेळी)

कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांसाहार (जर मांसाहार घेत असाल):

  • कच्चे अंडे, अर्धवट भाजलेले मांस
  • यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो

अतिमात्रेत कॅफीन:

  • चहा, कॉफी (मर्यादित घ्या)
  • एनर्जी ड्रिंक्स टाळावेत

उपास करणं:

  • शक्यतो टाळावे, कारण बाळाला पोषण मिळणं महत्त्वाचं आहे

ह्यातील काही सवयीं तुम्हास तुमच्या पुढील आयुष्यातदेखील नक्कीच उपयोगी ठरतील. !!!लक्षात ठेवा खूप काही हार्ड अँड फास्ट असं करायची गरज नाहीये किंवा खूप घाबरून राहायचं कारण नाहीये फक्त आपल्या प्रकृतीनुसार आपल्यासाठी पौष्टिक आणि योग्य ठरेल असं जेवण घेणं गरजेचं आहे.

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!

बालाजी तांबे – गर्भसंस्कार
प्रकाशक: सुश्रुत पब्लिकेशन्स
– ह्या पुस्तकात गर्भधारणेदरम्यान आहार, दिनचर्या, योग, मानसिक आरोग्य याविषयी सखोल मार्गदर्शन दिलं आहे.

पाश्चात्त्य वैद्यकीय दृष्टिकोनातून आहाराचे महत्त्व आणि टाळावयाच्या गोष्टी.

पालकत्वाशी संबंधित वस्तूंसाठी खास शिफारस! 👶🍼

नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!

मी येथे एक अ‍ॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.

शतावरी कल्प by Sharangdhar Pharmaceuticals

शरंगधर शतावरी कल्प हा एक आयुर्वेदिक पोषक द्रव्य असून तो स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो. यामध्ये शतावरी, इलायची व केशर यांचा समावेश असतो. हे टॉनिक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास, थकवा कमी करण्यास व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी दूध वाढवण्यास मदत करतो. तसेच, हार्मोन्सचे संतुलन राखून मासिक पाळीतील तक्रारी कमी करण्यास सहाय्यक ठरतो.

सूचना: वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. कोणत्याही आजारावर उपाय म्हणून वापर करू नये.

📖 प्रेग्नंसी जर्नल / प्लॅनर (Pregnancy Journal / Planner)

तुमच्या खास 9 महिन्यांच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाची नोंद ठेवण्यासाठी हा प्लॅनर उपयोगी ठरतो. आठवड्याने अपडेट्स, भावनांचे नोंदी, आणि वैद्यकीय तपासण्यांचं आयोजन एका ठिकाणी.
शिफारस: आठवड्याला एक वेळ अपडेट करा आणि आठवणी संजोवून ठेवा.

काही शंका आहेत का? आम्ही आहोत ना! |FAQ

How much weight gain is normal during pregnancy?

English: Gaining about 10–15 kg (22–33 lbs) during pregnancy is usually considered healthy. It may vary based on body type and health conditions.


Marathi: गर्भधारणेदरम्यान अंदाजे १० ते १५ किलो वजन वाढणे हे सामान्य मानले जाते. मात्र, प्रत्येक स्त्रीच्या प्रकृतीनुसार हे प्रमाण वेगळं असू शकतं. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

When and how much fruit should be consumed during pregnancy?

English: Seasonal, local fruits should be eaten in the morning or afternoon. Avoid intake of mangoes or heat-inducing fruits.

हंगामी व स्थानिक फळं सकाळी किंवा दुपारी खाणं योग्य. आंबा व उष्णता वाढवणारी फळं खाऊ नयेत

How much water and fluids should a pregnant woman drink?

A pregnant woman should drink at least 8-10 glasses of water daily to stay hydrated.
ताजेतवाने राहण्यासाठी रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *