गरोदरपणातील व्यायाम व विश्राम कसे असावेत ??|Pregnancymadhye karavayache vyayam

ह्या आर्टिकल मध्ये आपण गरोदरपणातील व्यायाम ,गरोदरपणात घ्यावयाची विश्रांती ,गरोदरपण असताना व्यायाम कसे करावे ??व त्याच बरोबर ‘garodarpanat vyayam kase karave ‘ व ‘garodarpanatil vyayam’ ह्या प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत .

साधारणपणे आपण गरोदर असलो कि आपल्याला भीती वाटते ,कि ताण विनाकारण शरीरावर नको यायला आणि मग आपण व्यायाम करायला घाबरतो जे कि साहजिक आहेच .पण एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते कि गरोदरपणात देखील आपल्या शरीराचे थोडेफार चलनवलन आणि रक्ताभिसरण चांगले ठेवण्याची खूप गरज आहे.अंग खूप अवघडून देखील चालणार नाही पण उगाच खूप काहीतरी व्यायाम करूनदेखील चालणार नाही मग आपण काय करू शकतो ??सगळ्यांनाच pregnancy yoga class जॉईन करणे शक्य नसते मग आपण घरच्या घरी आपल्या प्रकृतीला झेपेल ,कोणताही अपाय होणार नाही व आपल्याला प्रसन्न वाटेल असा कोणता व्यायाम प्रेग्नन्सी मध्ये करू शकतो ते मी माझ्या अनुभवातून खालील पोस्ट मध्ये मांडलेले आहे .आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटली म्हणजे गरोदरपणातील विश्रांती ती देखील तितकीच महत्वाची आहे .बरेचदा घाईघाईच्या आयुष्यात विश्राम पण गरजेचा असतो हे आपण विसरूनच जातो .आणि त्यातून प्रेग्नन्सी मधील विश्राम हा देखील खूप महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन त्यावर पण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी करत आहे तेव्हा नक्कीच वाचा माझे खालील पोस्ट!!मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल!!

कोणता गरोदरपणातील व्यायाम सर्वात चांगला ?? | Best exercise during pregnancy

तुम्ही प्रेग्नन्ट आहात म्हणजे तुम्ही आता अजिबातच हालचाल करू नका असा अर्थ होत नाही. अर्थातच हा सल्ला आपल्या प्रकृतीनुसार डॉक्टरांनी दिलेला असतो. म्हणजेच ह्याचा अर्थ तुम्हाला बेडरेस्ट सांगितलाय तरीदेखील तुम्ही व्यायाम करा असा नाही. बेडरेस्ट हा बेडरेस्टच असतो व डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तो तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केलाच पाहिजे. पण ज्यांना असा काही धोका नाहीये त्या स्त्रियांनी हलका व्यायाम ठेवण्यास हरकत नाही.

गरोदरपणातील व्यायाम

जसं की, तुम्ही रोज संध्याकाळी चालायला जाऊ शकता. हळूहळू दोन तीन आसपास चक्कर मारल्या तरि शरीरातील blood circulation सुधारते व त्याचा तुम्हास फायदाच होतो. तुम्ही तुमची घरातील कामं चालू ठेवू शकता जसं की स्वयंपाक करणं, कपडे आवरणं, डेली रुटीनमधील कामं.

गरोदरपणात काय टाळा ?? | What to avoid during pregnancy??

फक्त अवजड वस्तू उचलणं पूर्णपणे टाळा. पहिल्या काही महिन्यांमध्ये स्वतःला ह्याबाबतीत जपा. अजिबात वाकू नका. घरातील मोठया बायका व डॉक्टर तुम्हाला जाणीव करून देतीलच. काम करताना तुमचा पाय घसरणार नाही, तुम्ही पडणार नाही ह्याची पूर्ण काळजी घ्या. फार दगदग करणं, जिने सतत वर खाली करणं अशा गोष्टीदेखील टाळा व ह्याबाबत मोठ्यांचे ऐकणे नक्कीच योग्य ठरेल. नोकरी करणाऱ्या मुलींना फारकाही ऑपशन्स नसतात तरीदेखील ह्याकाळात कामाच्या ठिकाणी दगदग कमी होईल ह्याची काळजी घ्या व स्वतःला जपा.

ह्याबरोबरीनेच एक गोष्ट आणखी मला सांगावीशी वाटते ती म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये टॉयलेटला होताना कुंथणे टाळावे. काहींना तशी सवय असते पण अनुभवी बायकांना हे बोलताना तुम्ही ऐकलंदेखील असेल. तेव्हा ज्यांना अशी सवय असेल त्यांनी आहारात तुपाचा समावेश केला तर कुंथण्याची तुम्हास गरज पडणार नाही. तसेच two wheeler देखील टाळा हे डॉक्टरदेखील तुमच्या कानावर घालतील.

नॉर्मल डिलिव्हरीसाठी (नॉर्मल प्रसूती)काय प्रयत्न कराल ??? | What is best exercise for normal delivery??

गरोदरपणातील व्यायामा बद्दल सांगताना मला असे सांगावेसे वाटते कि ,त्याबरोबरीने थोडंफार active शरीर ठेवणंदेखील गरजेचं आहे. आपल्या प्रकृतीस झेपेल तेवढं चलनवलन करण्यास हरकत नाही. साधारण शेवटच्या काही महिन्यात नॉर्मल डिलिव्हरीसाठी दोन पायांवर बसून प्रौढ स्त्रियांच्या सल्ल्यानुसार अर्थातच डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर थोडीशी काम करण्यास हरकत नाही.

जसं की तुम्ही एक दोन खोल्यांचा तुम्हाला झेपेल तसा वाकून केर काढू शकता, वाकून एकेक भांडं ट्रॉलीत लावू शकता किंवा चार कपडे धुवू शकता. पण लक्षात ठेवा थोडेफार आपल्या प्रकृतीस झेपेल त्यानुसारच करा. ह्या दिवसात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळणेच योग्य. आणि प्रेग्नन्सी मध्ये काही महिने हे जपण्याचे असतात जसंकी आठवा महिना. हे घरातील तुमची आई किंवा सासूबाई तुम्हास सांगतीलच तेव्हा त्यांच ऐका.

लक्षात ठेवा व्यायामाइतका विश्राम देखील गरजेचा आहे. रात्रीची व जमत असल्यास दुपारची झोपदेखील अशा दिवसात खूप गरजेची असते हे डॉक्टरदेखील तुम्हास सांगतीलच.

गरोदरपणात विश्राम कसा घेणार ??गरोदरपणात कसे झोपावे | Garodarpanat kase zopave??

प्रेग्नन्सी दरम्यान झोपण्याची देखील पद्धत आहे. जसं की प्रेग्नन्सीच्या अवस्थेत शक्यतो कुशीवर झोपणे चांगले. व ते देखील डाव्या कुशीवर ज्याने गर्भास पोषकतत्वांचा पुरवठा वाढण्यास मदत होते. किमान दुपारी दोन तास तरी झोप काढावी.किमान दुपारी दोन तास तरी झोप काढावी.फार दगदग टाळावी.नोकरदार स्त्रियांना शक्य आहे असे नाही पण मग त्यांनी ह्या दिवसात बैठं किंवा कमी दगदग असणारे काम करावे .

माझा प्रेग्नन्सीमधील अनुभव(गरोदरपणातील व्यायाम) | My experience during Pregnancy

जसं की डॉक्टरांनी मला सांगितलं की बाळाचं डोकं आता खाली आलंय. आता तु थोडीशी वाकून किंवा दोन पायांवर बसून काम करण्यास हरकत नाही तेव्हा स्वतः ला जपत माझे माझे चार कपडे धुणं, वाकून एकेक भांडी लावणं अशी घरातील सोपी कामं मनावर घेऊन मीही करायला सुरुवात केली. रोज संध्याकाळी श्रीबरोबर चालायला जाणं, स्वयंपाक करणं अशी कामं मी शेवटपर्यंत चालू ठेवली. अर्थातच शरीरास झेपेल तेवढं शरीर active ठेवण्याचं व शरीरास गरजेइतकी विश्रांतीदेखील देण्याचं जसं की दुपारची कमीतकमी दोन तास झोप ह्या गोष्टी मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये कटाक्षाने पाळल्या.

Note : गर्भवती स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही व्यायाम मनाने करू नये .

कोणता प्रकारचा व्यायाम किंवा क्लास तुम्ही लावू शकता ?? | What type of exercises are beneficial for pregnancy??

ह्याबरोबरीने आजकाल योगासन हादेखील महत्वाचा व्यायाम बऱ्याच प्रेग्नन्ट स्त्रिया करतात. व तो शरिरास उपयुक्तदेखील असतो. कारण माईंड relaxation आणि muscles relaxation सारखे फायदे शरीरास देतो. पण तो मनाने किंवा कुठेतरी ऑनलाईन बघून न करता एखाद्या प्रोफेशनल ट्रेनरकडून शिकून करणे योग्य असं माझं मत आहे. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला तसा योग नाही आला पण तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन नक्कीच ह्याचा फायदा करून घेऊ शकता.

ह्या व्यतिरिक्त केगल व्यायाम सध्या नॉर्मल प्रसूतीसाठी खूप प्रचलित आहे.करायला सोपा व बसल्या बसल्या देखील करता येणारा केगल व्यायामाबद्दल मी माझ्या ब्लॉग मध्ये संपूर्ण माहिती मराठी मध्ये दिलेली आहे तेव्हा तुम्ही ती नक्कीच वाचू शकता .त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Read More : केगल व्यायाम व प्रेग्नन्सी

सारांश | Conclusion:

असा तुम्हीच तुमच्या lifestyle चा थोडा अभ्यास केला आणि तुमच्या जुन्या सवयीं बदलून नवीन सवयीं जोपासल्या तर फक्त होणाऱ्या बाळालाच नाही तर तुम्हालादेखील ह्याचा नक्कीच खूप फायदा होईल व तुम्ही ही फेज आणखी एन्जॉय कराल. तेव्हा टेन्शन घेऊ नका आणि छान डॉक्टरांना विचारून रोज आपल्या जोडीदारासह चालायला सुरुवात करा .संध्याकाळी एखादा जवळपास फेरफटका मारला तरी छान वाटेल .शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न होईल .

तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!

अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!!

Reference : https://www.healthline.com/health/pregnancy/pregnancy-workouts#benefits

लगेच खरेदी करा अमेझॉनवर आवश्यक सामान !!

योगा मॅट

प्रेग्नन्सी पिल्लो

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!