ह्या पोस्ट मध्ये जाणून घ्या घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ???प्रेगा न्युज कसे वापरावे ??गर्भधारणा लक्षणे??गरोदर आहे हे कसे ओळखावे ??गरोदरपणाची लक्षणे आणि बरंच काही!!
Table of content
प्रेग्नन्ट होतानाचा माझा अनुभव | My First hand experience with Pregnancy
2018 मध्ये माझे लग्न झाले व मी आणि माझा जोडीदार एकत्र नव्या आयुष्याची स्वप्न रंगवू लागलो.
पहिली नवीन नवलाई एकमेकाना जाणून घेण्यात, सवयींची सवय होण्यात, सहवासात निघून गेली. मग नोकरीची घाई आणि खऱ्या आयुष्याचं बस्तान यात मी गडबडून गेले. यात मैत्रिणींच्या गप्पा आणि कामाच्या ठिकाणी चर्चा यातून आपल्या धकाधकीच्या जीवनात अपत्य हवं असेल तर चान्स कधी घ्यावा? अशा गोष्टी माझ्या कानी पडू लागल्या. रोजच्या अप डाउन मध्ये व बदलत्या जीवन शैलीत दिवस लगेच राहणार का? अशा चर्चा मला कानी येऊ लागल्या.
तेव्हा पेशाने मी प्राध्यापक व नवीन लग्नानंतर पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये लागलेली नोकरी. त्याबरोबरीने रोजचं निगडी ते स्वारगेट P.M.P.M.L नी येणं जाणं.
सकाळी सात वाजता जे घर सोडायचं ते संध्याकाळी साडेसातला परतणं. संध्याकाळचं जेवण आटपून थोडी काहीतरी दिनचर्या निभवायची हे रोजच. तेव्हा खरंतर लग्नाला केवळ सहा महीनेचं झाले होते. तेव्हा असं धकाधकीचं जीवन आणि माझं वय हे पाहून योग्यं वेळी आपण चान्स घेऊ हे मी व माझ्या जोडीदाराने ठरवलं. तसं आईच्या तोंडूनदेखील तिशीच्या आत साधारणपणे बाळंतपण झालं पाहिजे हे कानावर आलं होतं. तेव्हा पुढच्या येणाऱ्या वर्षात आपण चान्स घेऊन पहावा असं माझं आणि श्रीचं ठरलं. मनात आलं आपल्यालादेखील अंदाज येईल कि आपलं शरीर नीट रिस्पॉन्ड करतय का? आपली आत्ताची आहार सवय त्याला अनुकूल आहे का? का आपल्याला त्यात काही बदल करावे लागतील.
असं करत मी जेव्हा माझ्या आईकडे एकदा आले तेव्हाच मला माझ्यातील फरक जाणवू लागला. मासिक पाळी येण्याच्या दिवसात होणारी चिडचिड, सकाळच मळमळणं, थोडीशी पाठ दुखणं, मूड्समधील बदल वैगरे जाणवू लागले. हे नवीनच काय होतय हे मला कळेना व कदाचित पीरिअड्स लवकर येतील असंही वाटायला लागलं. म्हणून मी कधीनवं ते पीरिअड्सची वाट पाहू लागले. आईलातर कळून चुकलंच होतं पण तिनही तारखेला येत्ये कि नाही हे बघू व मग बोलू असा विचार केला.
अशा दिवसात आपल्याला शरीरात बरेच बदल होत असतात. स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्स नव्याने कार्यरत होत असतात. पण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार जाणवणारी लक्षणं ही वेगळी असतात. जसा त्रास तुमच्या बहिणींना किंवा मैत्रिणींना होईल तसाच तुम्हाला होईल असं नाही. बहुधा पहिल्या मुलाच्यावेळी होणारा त्रास दुसऱ्यावेळीचदेखील तसाच असेल असं नाही. म्हणूनच प्रत्येक मूल वेगळं असतं असं घरातल्या प्रौढ बायकांना म्हणताना तुम्ही ऐकलंही असेल. तेव्हा घाबरून जाऊ नका.
तरीदेखील तुमच्या माहितीसाठी आणि माझा अनुभव म्हणून बहुतांश स्त्रियांमधील साधारण प्राथमिक लक्षण मी नमूद करत आहे.
गर्भधारणेची लक्षणे | Early signs of pregnancy in marathi
- मळमळणं : काहींना कदाचित सकाळसकाळ किंवा काहींना दिवसभर असू शकतं. माझ्या वेळेस सुरुवातीस ही ऍसिडिटी आहे असं मला वाटत होतं.
- तोंडाला पाणी सुटणं, उलट्या होणं किंवा चक्कर येणं.
- मानसिक अस्वस्थता : कशातही मन न लागणं किंवा खूप चिडचिड होणं जसंकी मासिक पाळीच्या दिवसात होतं.
- अंग गळून गेल्यासारखं वाटणं किंवा खूप झोप येणं.
- वास सहन न होणं : कोणताही तीक्ष्ण वास सहन न होणं जसेकी तेलातल्या फोडण्या वैगरे. या दिवसात नाक अतिशय संवेदनशील होऊ शकतं. अगदी दूरवरचा वास देखील लगेच बारकाईने जाणवतो. जसं की माझ्यावेळी शेजारच्या घरातून येणारा औषधांचा वासदेखील मला जाणवत असे.
घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ? | How to perform Pregnancy test in Marathi??
आता ही लक्षणं आहेत म्हणजे दिवस गेलेत ही एक शक्यता असू शकते पण कॉन्फीर्मशन असणं देखील गरजेचे आहे. जाणून घ्या घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ???प्रेगा न्युज कसे वापरावे??
यासाठी बाजारात Pregnancy test kit मिळतात ज्याला home Pregnancy test असदेखील म्हणतात. सध्या बाजारात तशी वेगवेगळ्या कंपन्यांची उपलब्ध आहेत. त्यातील सर्वोपरिचित ‘Preganews ‘मी वापरून बघायचं ठरवलं. ह्याचे खात्रीशीर परिणाम तुमचे पेरिऑड्स चुकल्याच्या एका दिवसानंतर मिळतील पण खात्रीशीर निकालासाठी एका आठवड्याने ही टेस्ट करणं योग्य ठरेलं.
ही तपासणी कशी करावी? | How to use Prega News kit in Marathi

तुमच्या युरीनचे काही थेंब किटवर निर्दशवलेल्या जागी म्हणजे होलवर ठेवावे व काही वेळात परिणामांची वाट बघावी.

वरील फोटोमध्ये दाखवल्यानुसार दोन गुलाबी उभ्या रेषा पॉसिटीव्ह निकाल दर्शवतात म्हणजे काँग्रट्स !!तुम्ही प्रेग्नन्ट आहात. व एकच गुलाबी रेष असेल तर नेगेटिव्ह निकाल दाखवते. ह्याचा अर्थ तुम्ही प्रेग्नेंट नाहीत.

काही केसेस मध्ये दुसरी गुलाबी रेष ही पहिलीपेक्षा फिकट असू शकते. ह्याचा अर्थदेखील तुम्ही प्रेग्नेंट आहात पण टेस्ट लवकर केल्याने रेष फिकट दिसत आहे. जसंकी फोटोमध्ये टेस्ट मी खूप आधी केल्याने रेष थोडी फिकट दिसत्ये.
काहीवेळा पहिली रेष न दिसता केवळ दुसरी रेष येऊ शकते.ह्यां केसेस मध्ये किट हे invalid असते. दुसरी रेष ही हॉर्मोन hcg मुळे दिसते जे केवळ प्रेग्नन्ट बायकांच्या शरीरात स्त्रवत असतं. त्याच्या शरीरातील प्रमाणावर दुसऱ्या रेषेचा फिकट अथवा ठळकपणा अवलंबून आहे. त्यामुळे फिकट आली म्हणून घाबरू नका, परत काही दिवसांनी टेस्ट करून बघा. काही दुर्मिळ केसेस मध्ये ही किट्स फाँल्स पॉसिटीव्ह परिणाम देऊ शकतात पण त्याची संभावना अतिशय दुर्मिळच असते. त्यामुळेच डॉक्टरांकडून खात्री करून घेणे उत्तम कारण ते त्यांच्याकडील उपलब्ध किट बरोबर नाडीपरीक्षादेखील करतात.
असंच कॉन्फीर्मशन मी प्रेगान्युजच्या निकालानंतर डॉक्टरांकडे जाऊन केलं आणि मला आमच्या कुटुंबात येऊ घातलेल्या नव्या जिवाची चाहूल लागली व खूप आनंद झाला तसाच तुम्हालादेखील होईल.
लक्षात घ्या काही प्रेग्नन्सी किट फॉल्स पॉसिटीव्ह असू शकतात त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन अधिकृत प्रेग्नन्सी टेस्ट करणे कधीहि चांगले .आणि प्रेगा न्युज हे सर्वात उत्तम प्रेग्नन्सी टेस्ट किट आहे .ते कुठल्याही मेडिकल पासून ऑनलाईनदेखील मिळू शकते .जसे दिवस जातील तशी line डार्क होते .त्यामुळे काही दिवस थांबून प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता .तेव्हा काळजी करू नका !! आणि ह्या क्षणांचा आनंद घ्या .
तुमची टेस्ट पॉसिटीव्ह आली असल्यास तुम्हाला माझ्या प्रेग्नन्सी गाईड्स ची गरज पडणारे !!!!!!!तेव्हा खालील लिंक नक्की visit करा !!!अगदी गरोदरपणात काय खावे ??पासून हॉस्पिटलची बॅग कशी भरावी ??पर्यंत सगळं काही !!!!नक्की तुम्हाला फायदा होईल !!!!
Do Visit : My Complete Pregnancy blog for all those marathi moms out there !!
तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला subscribe करायला विसरू नका .तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स ,entertainment ,किस्से ,माझे अनुभव आणि माहिती घेऊन येत आहे मी आईपणच्या माध्यमातून ,मी निकिता जी एका गोंडस मुलाची आई बनले २०२० मध्ये आणि नॉर्मल प्रसूती अनुभवली .तुम्हाला काही शंका असतील ,प्रश्न असतील ,प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट page वरून फीडबॅक देऊ शकता किंवा कंमेंट करून प्रतिक्रिया कळवू शकतात .मी आणि aaipan.com तुमची संपूर्ण pregnancy साथ द्यायला आहोत आणि पुढच्या “आईपण ” साठी देखील आहोत !!
अशाच माहितीसाठी वाचा आईपण!!!!!!!!!!! All the Best !!!
संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!
WebMD – Pregnancy Test Guide
Mayo Clinic – Home pregnancy tests: Can you trust the results?
पालकत्वाशी संबंधित वस्तूंसाठी खास शिफारस! 👶🍼
नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!
मी येथे एक अॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.

👶 प्रेग्नंसी टेस्ट किट (Pregnancy Test Kit)
घरी बसल्या-बसल्या सहजपणे प्रेग्नंसी तपासण्यासाठी अत्यंत सोयीस्कर. अचूक निकाल, फक्त काही मिनिटांत. प्रत्येक महिलेसाठी एक विश्वासार्ह पर्याय.
शिफारस: सकाळी प्रथम युरिन सॅम्पल वापरा अधिक अचूकतेसाठी.

📖 प्रेग्नंसी जर्नल / प्लॅनर (Pregnancy Journal / Planner)
तुमच्या खास 9 महिन्यांच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाची नोंद ठेवण्यासाठी हा प्लॅनर उपयोगी ठरतो. आठवड्याने अपडेट्स, भावनांचे नोंदी, आणि वैद्यकीय तपासण्यांचं आयोजन एका ठिकाणी.
शिफारस: आठवड्याला एक वेळ अपडेट करा आणि आठवणी संजोवून ठेवा.
⚠️ डिस्क्लेमर (Disclaimer):
वरील माहिती ही केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कृपया कोणतेही वैद्यकीय उत्पादन वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आम्ही वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार पुरवत नाही.
काही शंका आहेत का? आम्ही आहोत ना! |FAQ
1. When is the best time to take a pregnancy test?
Answer:
The best time is in the morning with your first urine of the day — it has the highest concentration of hCG (pregnancy hormone) for accurate results. Testing is usually reliable from the first day of a missed period.
उत्तर (मराठीत):
प्रेग्नन्सी टेस्टसाठी सकाळी उठल्यावरची पहिली मूत्र (युरीन) सर्वोत्तम असते, कारण त्यात hCG हार्मोनची मात्रा जास्त असते. पाळी चुकल्याच्या पहिल्या दिवशी टेस्ट केली तर अधिक अचूक असते.
2. Can I take a pregnancy test at night?
Answer :
Yes, but results might be less accurate, especially in early pregnancy. Try not to drink too much water before testing.
उत्तर:
हो, रात्री टेस्ट घेता येते, पण ती फार सुरुवातीच्या टप्प्यावर असल्यास कमी अचूक असू शकते. टेस्ट घेण्यापूर्वी खूप पाणी पिऊ नका.
3. How soon can I get a positive result after ovulation?
Answer :
Some tests detect pregnancy as early as 7–10 days after ovulation, but for best results, wait until your missed period.
उत्तर:
ओव्ह्युलेशननंतर ७–१० दिवसांत काही टेस्ट पॉझिटिव्ह दाखवू शकतात, पण योग्य अचूकतेसाठी पाळी चुकण्याची वाट पाहावी.
4. What are the signs I should take a pregnancy test?
Answer:
Missed period, fatigue, nausea, tender breasts, and frequent urination are common signs to test.
उत्तर:
पाळी न येणं, थकवा, उलटीचा त्रास, छातीत जडपणा, वारंवार लघवी होणं — ही सर्व प्रेग्नन्सीची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
5. Which is the most accurate home pregnancy test kit?
Answer:
Clearblue, First Response, and Prega News are reliable kits with high accuracy.
Clearblue, First Response, आणि Prega News ही चांगली आणि अचूक किट्स आहेत.
6. Can I get a false negative on a pregnancy test?
Answer:
Yes, testing too early or using diluted urine may show a false negative.
उत्तर:
हो, खूप लवकर टेस्ट केल्यास किंवा diluted युरीन असल्यास टेस्ट false negative येऊ शकते.
7. How to read pregnancy test results correctly?
Answer:
Usually, one line = negative, two lines = positive. Always check within the recommended time.
उत्तर:
सामान्यतः एक रेघ = निगेटिव्ह, दोन रेषा = पॉझिटिव्ह. प्रत्येक टेस्टच्या सूचनांनुसार वेळेतच रिझल्ट वाचा.
8. What should I do after a positive pregnancy test?
Book a doctor’s appointment to confirm with a blood test or scan. Start taking prenatal vitamins.
उत्तर:
तत्काळ डॉक्टरांकडे भेट घ्या. रक्त चाचणी किंवा सोनोग्राफीने प्रेग्नन्सीची खात्री करा. फॉलिक अॅसिड वगैरे घेणं सुरू करा.
9. How long should I wait before testing again?
Answer:
If negative but no period, wait 2–3 days and test again.
उत्तर:
जर टेस्ट निगेटिव्ह आली आणि पाळी आली नसेल, तर २–३ दिवसांनी पुन्हा टेस्ट करा.