बाळाच्या नाळेची कशी काळजी घ्याल?

जन्मजात बाळाला नाळ असते. नाळ म्हणजे आईकडून बाळाला पोषण देणारी रचना. निसर्गाने बाळ पोटात असताना त्याला पोषण देण्यासाठी केलेली एक तरतूद. ही नाळ आई आणि बाळाला जोडून ठेवते. आणि बाळ बाहेरच्या जगात जेव्हा येतं तेव्हा डॉक्टर ही नाळ कापतात. परदेशात ती बाळाच्या वडिलांनी कापायची वैगरे पद्धत आहे असं तुम्ही ऐकलंही असेल. तर ह्या कापलेल्या नाळेचा थोडा भाग बाळाच्या बेंबीला तसाच असतो. तेव्हा ह्याची काळजी कशी घ्यायची ते पाहू.

बाळाच्या नाळेची काळजी कशी घ्याल??

साधारण बाळाची नाळ ही चवथ्या किंवा सातव्या दिवशी गळून पडते. तोवर ती नाळ आणि त्याला डॉक्टरांनी लावलेला चिमटा बाळाच्या पोटावर बेंबीच्या ठिकाणी असतो. तोपर्यंत बाळाला थोडं नाजूक पणेच आपण हाताळतो. तसं त्याला त्याचा त्रास होत नाही पण त्यात कोणते infection होणार नाही, पाणी शक्यतो आत राहणार नाही अंघोळीनंतर ह्याची काळजी घेणे गरजेचे असते. साधारण बाळांना अंघोळ घालणाऱ्या बायकांना त्याची सवय असते. पण तुम्ही घरी अंघोळ घालणार असाल तर ह्याची काळजी घ्या.अथवा नाळ गळेपर्यंत sponjing करु शकता.

नाळेच्या ठिकाणी कोणते infection होऊ नये म्हणून doctor नेओस्प्रिन powder लिहून देतात. प्रत्येक डॉक्टर नुसार तिचा ब्रँड किंवा नाव थोडंफार बदलू शकतं पण ही तुमच्या डॉक्टरांनी recommend केलेली powder नाळेसाठी वापरणं गरजेचे आहे. अंघोळी नंतर किंवा sponjing नंतर ही powder बाळाच्या बेंबीच्या ठिकाणी नाळेभोवती घालत जा. दिवसातून दोनदा सकाळ संध्याकाळ वापरण्यास हरकत नाही.

नाळ गळून गेल्यानंतर बाळाच्या बेंबी ची काय काळजी घ्याल?

बाळाची बेंबी नाळ गळल्यावर स्पष्ट दिसेल. त्यावर सुद्धा अंघोळी नंतर साधारण महिनाभर तरी नेओस्प्रिन पावडर लावत जा. अंघोळी नंतर पाणी राहणार नाही ह्याची काळजी घ्या. आता बाळाला अंघोळ घालणाऱ्या बायका नाळ गळून गेली कि बाळाला अंघोळी नंतर पोटपट्टा बांधतात. हा पोटपट्टा फार घट्ट नसतो. केवळ वर येणारी बाळाची बेंबी वर येऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. हा पोटपट्टा कॉटनच्या मऊ फडक्याचा असतो. अंघोळ झाली कि धुरी घेऊन झाल्यावर साधारणपणे बांधतात. व पहिली शु होऊन ओला झाला कि काढून टाकतात.

नाळेविशेष :आपल्याकडे नाळ गळून गेली कि तुळशी मध्ये किंवा घरातील एका झाडाखाली किंवा गावाबाहेर वडाखाली पुरायची पद्धत आहे.

आजकाल stem cell preservation ची पद्धत आहे, ज्यात नाळे मधील पेशीचे preservation होते ज्याने भविष्यात गरज पडल्यास बाळाचे आजार बरे करण्यास मदत होते. बऱ्याच संस्था सध्या पैसे घेऊन ह्या service देतात. त्याचे annual चार्जेस आकारले जातात.हा उपाय अवलंबताना खात्रीशीर संस्थेची निवड करा.

आणखी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. Email id खाली देतं आहे.

ई-मेल id :aaipanblog2@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!