This post talks about baby colic and gases and some useful tips and tricks to relive them and it also answers the simple questions like “balache gas sathi gharguti upay?” or “balala khup gas hot ahet mag kay karu?”
लहान बाळंमध्ये एक अगदी नवजात अर्भाकापासून थोडया मोठया मुलांपर्यंत एक समस्या असते ती म्हणजे बाळाचे गॅसेस. हो बऱ्याच अंशी बाळांना गॅसचा त्रास होतोच. आणि ते अगदी साहजिक देखील आहे.
लहान बाळांची पचन शक्ती ही पूर्णतः विकसित नसते. ती हळूहळू विकास पावते. त्यामुळे बाळांच्या पोटात गॅस तयार होतात. आणि बरेचदा ते बाहेर पडले नाहीत तर बाळाला infant colic म्हणून गॅस मुळे पोटात दुखण्याची शक्यता असते आणि त्याचा त्यांना त्रास होतों.त्यामुळे ती खुप वेळ रडू शकतात. दिवसातून बराच वेळ बाळ रडत असेल तर त्याला colic चा त्रास असू शकतो. तुमचं बाळदेखील असच गॅसमुळे रडतंय. तर काय उपाय कराल?
Table of content
📌 गॅसेस का होतात?
नवजात बाळांचे पचनतंत्र अजून परिपूर्ण विकसित झालेलं नसतं. दूध पिताना हवेसोबत गिळलेली हवा, आईच्या आहारातील काही गोष्टी, किंवा योग्य डकार न येणं यामुळे बाळाच्या पोटात गॅस होतो.
🔍 लक्षणं ओळखा:
- बाळ वारंवार रडतंय, विशेषतः जेवल्यानंतर
- पोट टंच वाटणं
- पाय वर ओढून घेणं (colic cry)
- रडताना चेहरा लाल होणे
- पोटात कुरकुर आवाज येणे
ह्यावर काय उपाय कराल??
ढेकर :
अंगावर असणारी बाळे दूध तोंडात ओढतांना,हवादेखील तोंडात घेतात. त्या हवेमुळे गॅस होऊ शकतात. तेव्हा दूध पिऊन झाल्यावर बाळाला उभे घेऊन त्याची ढेकर काढत जा.त्यामुळे गॅस होणं कमी होईल.
फायदा:
- पोटात अडकलेली हवा बाहेर जाते
- गॅसेसची शक्यता कमी होते
- बाळ शांत झोपते
मसाज :
colic वर उपाय म्हणजे बाळाला रोज संध्याकाळी तेलाने चोळताना बेंबी भोवती बोटाने गोल गोल फिरवत मसाज करा.ह्यामुळे गॅस सुटतील.
फायदा:
- पचनक्रिया सुधारते
- आतड्यांमधील हालचाल वाढते
- गॅस बाहेर पडण्यास मदत होते
व्यायाम –cycle
बाळाला आडवे दुपट्यावर ठेवून त्याच्या पायाचा सायकल सारखा व्यायाम करा ज्याने गॅस पटपट सुटतात. आणि बाळाला बरं वाटतं.बाळाला पोटावर थोडावेळ ठेवून पाहा. त्याने देखील गॅस सुटतील.
- गॅस सहज बाहेर पडतो
- पोटातील मसल्स सक्रिय होतात
- बाळात उत्साह आणि हलकं वाटतं
हिंगाचा लेप (Hing Paste)
थोडेसे हिंग पाण्यात मिक्स करुन त्याची पेस्ट बाळांच्या बेंबी भोवती लावा. व ती सुकू द्या. हा एक प्रभावी उपाय आहे ज्याने गॅस पटपट सुटतील आणि बाळाला बरं वाटेल.
फायदा:
- पचन सुधारतो
- पोटदुखी आणि गॅस कमी होतो
- दवाखान्याच्या औषधाशिवाय घरचा उपाय
🛑 टीप: हे फक्त बाहेरून लावायचं. बाळाला पाजू नका.
ओवा ओवा वरवंट्यावर वाटून किंवा खलबत्त्यात कुटून किंवा आईने तोंडात थोडा चावून बाळांच्या बेंबी भोवती लावा. ज्याने गॅसेस पटकन सुटतील.
ओवा पाण्यात उकळून त्याचे पाणी देखील पाजू शकता ज्याने पोट दुखणे थांबेल.
फायदे:
- पोटातील गॅस हलक्या पद्धतीने बाहेर पडतो
- बाळाच्या पोटदुखीमध्ये झपाट्याने आराम मिळतो
- थंड हवामानात पोट गरम राहते – आरामदायक वाटते
- औषध न देता नैसर्गिक उपाय
🛑 टीप: फक्त बाहेरूनच लावायचा, पाजायचा नाही.
आईने घेतलेलं बडीशेप पाणी
स्तनपान करणारी आई रोज एक कप बडीशेपाचं कोमट पाणी प्यावे.
फायदा:
- आईच्या दूधातून बाळाला आरामदायक घटक मिळतात
- बाळाचं पचन सुधारतं
- गॅसेसची तीव्रता कमी होते
Colicaid /gripe water
डॉक्टर च्या सल्ल्याने तुम्ही colicaid हे औषध किंवा बाजारात मिळणारे gripe water देऊ शकता. ज्याने गॅसेस पासून बाळाला आराम मिळेल.
काय असतं?
Colicade ही OTC ड्रॉप्स असतात ज्यामध्ये Simethicone नावाचा औषधी घटक असतो. याचा वापर गॅसेस व मुरडा कमी करण्यासाठी केला जातो.
फायदे:
✅ पोटात साचलेला गॅस बाहेर काढण्यास मदत
✅ बाळाला पोटदुखीपासून त्वरित आराम
✅ दुधानंतर आलेली अस्वस्थता, गॅसचे फुगणे कमी
✅ डॉक्टरांनी सुचवल्यास सुरक्षित आणि प्रभावी
काळजी:
⚠️ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, स्वतःहून देऊ नये
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
- सतत रडणं, आणि कोणताच उपाय लागू न पडणं
- उलटी, ताप, किंवा मल-मूत्र न होणं
- पोट खूप फुगणं
- बाळ फार थकलेलं / अस्वस्थ वाटणं
अशाच टिप्स साठी वाचत राहा आईपण!!!
❗ अस्वीकरण (Disclaimer):
वरील माहिती केवळ शैक्षणिक व सामान्य मार्गदर्शनासाठी दिली आहे. ही वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचाराचा पर्याय नाही. कोणतीही आयुर्वेदिक किंवा मसाज पद्धती अमलात आणण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
संदर्भ हे विश्वासार्हतेचं प्रतीक!
cleveland.org “Gassy Baby? Try These 9 Gas Relief Tips”
pampers.com “Gassy Baby: All About Helping Your Baby With Gas”
👶 🍼आईसाठी आणि बाळासाठी बाळंतपणाच्या काळातील आवश्यक वस्तू – Amazon वर उपलब्ध
नमस्कार मंडळी,
तुम्ही जर तुमच्या बाळासाठी किंवा पालकत्वाच्या प्रवासात उपयोगी येणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असाल, तर aaipan.com ही एक उत्तम वेबसाईट आहे! येथे तुम्हाला नैसर्गिक, सुरक्षित व उपयोगी Parenting Items मिळतील—तेही घरपोच!
मी येथे एक अॅफिलिएट लिंक शेअर करत आहे. या लिंकद्वारे तुम्ही खरेदी केल्यास, मला एक लहानसा कमिशन मिळतो. यामुळे तुमच्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही, मात्र तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.
🍼 1. गॅस व कोलिकसाठी औषधं
- ग्राइप वॉटर (Gripe Water)
उदा. Woodwards, LuvLap Naturals
– नैसर्गिक पद्धतीने बाळाच्या गॅससाठी वापरले जाते. - कोलिक ड्रॉप्स / गॅस रिलीफ ड्रॉप्स
उदा. Little Remedies, Colicaid
– Simethicone आधारित औषधं (डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावे).
🌿 2. हर्बल व नैसर्गिक उपाय
- हिंग युक्त टमी रोल-ऑन (Tummy Roll-On)
उदा. Mamaearth Tummy Roll-On
– घरगुती उपाय म्हणून वापरण्यास योग्य. - बेबी मसाज तेल (Baby Massage Oil)
उदा. Parachute Advansed Baby Massage Oil
– पचन सुधारते आणि गॅस कमी होतो.
👶 3. काळजी घेणारी उपकरणं व साहित्य
- बर्प क्लॉथ्स (Burp Cloths)
– दूध पिल्यानंतर डकार काढण्यासाठी वापरले जाते. - अँटी-कोलिक बॉटल्स (Anti-Colic Bottles)
उदा. Philips Avent, Dr. Brown’s
– बाळ दूध पिताना हवेसह दूध घेत नाही. - बेबी स्वॅडल किंवा बेबी कॅरिअर
– बाळाला सुरक्षित ठेवते आणि आराम देते. - बेबी वॉर्मिंग पॅड्स
– कोमट कपड्यांनी पोट शेकण्यासाठी.
👶 बाळांमध्ये गॅस – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
बाळाला गॅस होतो म्हणजे नेमकं काय होतं?
बाळ जेव्हा दूध पितं, रडतं किंवा श्वास घेतं तेव्हा पोटात हवा साचते. ही हवा अडकून राहिल्यास पोट फुगणे, कुरकुर होणे किंवा रडणे अशा त्रासदायक लक्षणं दिसू शकतात.
गॅस झाल्यावर बाळ कसं वागतं?
बाळ सतत रडतं, पोट टाईट होतं, पाय वाकवतो, कुरकुर करतं, झोप लागत नाही – ही लक्षणं गॅसची असू शकतात.
बाळाला गॅस होऊ नये म्हणून काय करावं?
दूध पाजताना बाळाचं डोकं उंच ठेवा
प्रत्येक फीडनंतर डकार काढायला मदत करा
ओव्हरफीडिंग टाळा
आईनेही आहारावर लक्ष द्यावं (गॅस वाढवणारे पदार्थ टाळावेत)
बाळाला वारंवार गॅस होतो, तर काळजीचं कारण आहे का?
. नाही, गॅस ही सामान्य समस्या आहे. पण जर खूप रडणं, उलटी, वजन न वाढणं, किंवा झोपेचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.